जिजामाता पब्लिक स्कूल ज्यु.कॉलेज मध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
जिजामाता पब्लिक स्कूल ज्यु.कॉलेज मध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.सोनपेठ येथील नामांकित जिजामाता पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला, याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य गणेश जयपाल,प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा. प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, वर्गशिक्षिका सौ. अश्विनी चव्हाण, शेख सर , दिलीप कोलते, गांगर्डे सर, वृशाली मुदगलकर, आळसे सर, तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.अश्वीनी मॅडम यांनी प्रस्ताविक केले. नववी वर्गातील विद्यार्थिनी अंजली कदम, कल्याणी पोपळघट आणि शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्राप्ती दांबे व श्रद्धा सूर्यवंशी या विद्यार्थिनी जिजाऊ वंदनेचे घेतली.दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना कोरोना यासारख्या वाईट परिस्थिती मध्ये सुद्धा नाईट क्लास च्या माध्यमातून चार महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व शिक्षकांनी अतिशय परिश्रमाने परीक्षेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे , प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे यांनी सोनपेठ आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि गुणवत्तेसाठी शाळा सदैव कटिबद्ध असल्याचे मत प्रकट केले.अध्यक्षीय समारोप करताना शाळेचे प्राचार्य गणेश जयतपाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा आणि जीवनातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर आभार प्रदर्शन नववी वर्गातील विद्यार्थी श्रीकांत कदम यांने मानले.



No comments:
Post a Comment