धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी जिल्हाचा पालकमंत्र्याचा पदभार सुपूर्त
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी धनंजय मुंडे यांची नियुक्ती व्हावी,असा सूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत काही नेते मंडळींनी व्यक्त केला होता,अपेक्षेप्रमाणे गुरुवारी रात्री धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी पालकमंञ्याचा पदभार सुपूर्त करण्यात आला.
राज्याचे अल्पसंख्यांक राज्यमंत्री नवाब मलिक यांची परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यापासून महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना व काँग्रेस हे दोन्ही पक्ष नाराज आहेत.विशेषतः राष्ट्रवादी अंतर्गतसुध्दा धूसफूस सुरुच आहे.मुंबईतील मलिक यांनी परभणी जिल्ह्याचे पालकत्व स्विकारल्यापासून कधीच पुरेसा वेळ दिला नाही.ध्वजारोहनाचे शासकीय कार्यक्रम अपवाद आपत्तीच्या काळातसुध्दा ते कधी वेळेवर फिरकले नाहीत.जिल्ह्यांतर्गंत आघाडी अंतर्गत नेते मंडळीं बरोबर सुध्दा त्यांचे फारसे सख्य राहीले नाही किंवा ते असो,नेतेमंडळींनी सुध्दा जूळवून घ्यावयाचे प्रयत्नसुध्दा केले नाहीत.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अंतर्गत आमदार बाबाजानी दुर्राणी यांनीच मलिक यांच्या विरोधात खुलेआमपणे नाराजीचा सूर व्यक्त केला होता.त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती.मलिक यांनी त्या स्थितीत सुध्दा हेकेखोरपणा कायम राखला,राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी दुर्राणी विरुध्द मलिक या वादात दोघांनाही सबुरीचा सल्ला दिला.त्यामुळे त्या दोघातील ते मतभेद त्याचवेळी निवळले खरे,गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मलिक यांच्या विरोधात राष्ट्रवादी अंतर्गत स्थानिक नेतेमंडळींनी उघडपणे श्रेष्ठींकडे सूर आवळण्यास सुरुवात केली.ज्येष्ठ नेते शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी अंतर्गत नेते मंडळींनी मलिक यांच्या ऐवजी धनंजय मुंडे यांच्याकडेच पालकत्व दिले जावे,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून ईडीने केलेल्या कारवाईनंतर मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत. चांगलेच अडचणीत सापडले आहेत.मलिक यांचा राजीनामा घ्यावा,यासाठी विरोधी पक्षाने रान उठवले आहे.त्यामुळे मलिक कमालीचे संकटात सापडले असून या स्थितीत त्यांच्यावर मंत्रीपद गमाविण्याची टांगती तलवार आहेच.या पार्श्वभूमीवर मलिक यांचा राजीनामा आघाडी सरकारद्वारे घेण्याऐवजी धनंजय मुंडे यांना परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा पदभार सुपूर्त केला.मलिक यांच्या कडील खातीही अन्यत्र वळवण्यात येणार आहेत असा अंदाज आहे.

No comments:
Post a Comment