दिल्ली मॅराथॉन स्पर्धेत परभणीच्या मराठवाडा एक्सप्रेस ज्योती गवते प्रथम
परभणी / सोनपेठ (दर्शन) : -
नवी दिल्ली येथील मॅराथॉन स्पर्धेत महिला गटात परभणीच्या मराठवाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणार्या ज्योती गवते हीने बाजी मारुन प्रथम क्रमांक पटकाविला.
नवी दिल्लीतील एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स या कंपनीद्वारे न्यू दिल्ली मॅराथॉन - 2022 या स्पर्धांचे रविवारी आयोजन केले होते. महिला गटात ज्योती गवते हीने 42.195 किलो मीटर अंतर 3 तास 1 मिनीट 20 सेकंदात पार केले. त्याद्वारे तीने विजेतेपद पटकाविले. गवते हीला या कंपनीद्वारे 1 लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. दरम्यान, ज्योती गवते हीने गेल्या काही महिन्यातच मुंबई मॅराथॉन, पुणे मॅराथॉन स्पर्धांपाठोपाठ नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.

No comments:
Post a Comment