सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयास राष्ट्रीय मुल्यांकन आणि अधीस्वीकृती समितीने ( नॅक ) परिक्षणानंतर 'ब' दर्जा बहाल केला आहे. पहिल्या वेळी असणाऱ्या 2.03 सीजीपीए पेक्षा यावेळी 2.43 सीजीपीए मिळवत प्रगती केली आहे . या मूल्यांकन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. मुरूगन कृष्णपिल्लई, समन्वयक सदस्य प्रा. डॉ. बलविंदर सिंग व प्रा. डॉ. के. अनिरूद्धन यांचा समावेश होता.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या मुल्यांकनासाठी राष्ट्रीय मुल्यांकन समितीने दोन दिवस विविध विभाग व समितीची पाहणी करून परिक्षणाचा अहवाल घोषीत केला आहे. या अहवालात त्यांनी महाविद्यालयाच्या परिक्षणास 'ब' दर्जा बहाल करत महाविद्यालयातील सकारात्मक उपक्रमाची नोंद घेतली.
या पुनर्मूल्यांकनवेळी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम व संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सर्व माजी विद्यार्थी- पालक आणि सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांच्यासह परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी या परिक्षणासाठी विशेष प्रयत्न घेतले होते. त्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळून महाविद्यालयास 'ब' दर्जा पुन्हा प्राप्त झाला आहे. याबद्दल महाविद्यालयाशी संबंधित सर्वांकडून समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment