Saturday, March 1, 2025

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सोनपेठ तालुका स्तरावरील उद्घाटन श्रीकांत विटेकर यांच्या हस्ते संपन्न

सोनपेठ (दर्शन) :- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 तालुकास्तरीय उद्घाटन कार्यक्रम पी.एम.श्री.केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ येथे उद्घाटन ॲड.श्री श्रीकांत भैय्या विटेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. याचवेळी महारष्ट्र राज्य राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विशेष मोहीम या सोहळ्याचे महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांच्या हस्ते पुणे येथे पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विठ्ठल कराड, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रदीप गायकवाड मुख्याध्यापक तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री अजितराव देशमुख, डॉ.स्वप्निल जोशी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव, डॉ.भारत चव्हाण बालरोग तज्ञ, आणि तालुक्यातील सी. एच.ओ.,आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहाय्यक तथा आर बी एस के चे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार यांनी सांगितले की राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील शाळा व अंगणवाडी मधील सर्व बालकांची आरोग्य तपासणी केली जाते.अंगणवाडी मधील बालकांची वर्षातून दोन वेळा तपासणी केली जाते आणि शाळेतील विद्यार्थ्यांची वर्षातुन एक वेळा तपासणी केली जाते.2013 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम च्या पहिल्या टप्प्यात अतिशय उल्लेखनीय काम सोनपेठ तालुक्यातून झाले असल्याचे डॉ.पवार यांनी नमूद केले.24 बालकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया आणि 142 बालकांवरील इतर किरकोळ शस्त्रक्रिया ज्यामध्ये वाचा दोष निवारण, हर्निया, अपेंडीक्स सारख्या शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात आल्या असे सांगितले.त्यामुळे आर बी एस के चे वैद्यकीय अधिकारी डॉ.मृदुला देशमुख, डॉ.मन्मथ महाजन, डॉ.बालाजी इप्पर तसेच इतर स्टाफ यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरोवोद्गार डॉ.पवार यांनी काढले.अध्यक्षीय समारोप करताना श्री गायकवाड सर महणाले की आजची बालके उद्याची युवक आहेत आणि देशाचे भवितव्य युवकांच्या हातात असते.म्हणून युवक निरोगी राहण्यासाठी हा उपक्रम अतिशय चांगला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बालाजी इप्पर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ.मन्मथ महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालय सोनपेठ व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सोनपेठ तर्फे सर्वोतोपरी सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment