सोनपेठ (दर्शन) : - माणसांचे वर्तन आणि स्वभाव यांच्यात विविधता आढळते, अतिशय सहजपणे कोणत्याही व्यक्तीला आपण ओळखू शकत नाही, तरी माणसांची खरी ओळख होण्यासाठी समाजामध्ये मिसळले पाहिजे,माणसे पारखन्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे हे शिबिर महत्त्वाचे आहे, असे मत हशिप्रमंचे अध्यक्ष मा.परमेश्वर कदम यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून उपस्थित राहुन व्यक्त केले.
कै.र.व.महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराचे उद्घाटन दिनांक ०१ मार्च २०२५ शनिवार रोजी मौजे विटा बु ता.पाथरी येथे संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील सदाशिवराव आरबाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार सतीशराव देशमुख, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, सरपंच लताबाई आरबाड, पोलिस पाटील ज्ञोनोबा आदत, मदनराव शेंडगे, गोपाळराव आरबाड, पंडितराव आरबाड,भरत हारकाळ,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बापुराव आंधळे,प्रा.डॉ.अंगद फाजगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सदरिल शिबिरात "युथ फॉर माय भारत,युथ फॉर डिजिटल लिटरसी " या थिमवर आधारित पुढील सहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.नवीन शैक्षणिक धोरण, डिजिटल लिटरसी, वाचन कौशल्य, कौशल्य विकास, आरोग्य शिबीर आदी विषयांवर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यक्रमात स्वागत गीत निकिता राजभोज, सविता तुपसमिंद्रे यांनी गायले.सुत्रसंचालन प्रा.डॉ.मुक्ता सोमवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा संचालक प्रा.डॉ.गोविंद वाकणकर यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment