सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळास मानाचा तुरा कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ जि.परभणी येथे हिन्दी विभागात कार्यरत असलेले व स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हिन्दी अभ्यास मंडळ सदस्य प्रा.डाॅ.शिवाजी वडचकर यांची महाराष्ट्र राज्य उच्च व तंञ शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंञज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने "करिअर कट्टा" या उपक्रमांतर्गत परभणी जिल्हा समन्वयक पदी 2025-30 पाच वर्षा करीता निवड करण्यात आली आहे.परभणी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना रोजगारांच्या , व्यवसायाच्या आणि नोकरीच्या संधी पासून वंचित राहू नयेत, यासाठी चाललेला हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी हा उपक्रम शासन राबवत आहे.यासाठी परभणी जिल्हा समन्वयक म्हणुन प्रा.डाॅ. शिवाजी वडचकर यांचे संस्था अध्यक्ष मा.श्री.परमेश्वर कदम, प्राचार्य वसंत सातपुते, अंर्तगत गुणवता चेअरमन डाॅ.मुकुंदराज पाटिल, डाॅ.मारोती कच्छवे, डाॅ.वनिता कुलकर्णी यांनी अभिनदंन केले.या निवडीबद्यल सर्व स्तरामधुन त्याचे अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment