सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ, संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट जि.लातुर व महात्मा फुले महाविद्यालय किनगाव जिल्हा लातूर यांच्या सामंजस्य करारा अंतर्गत संयुक्त विद्यमाने समाजशास्त्र विभाग आयोजित समाज माध्यमांचा समाजावर होणारा परिणाम या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. मोबाईल हे आजच्या व्यक्तीला लागलेले एक व्यसन आहे. एक वेळेस शूज शिवाय व्यक्ती बाहेर पडतील पण मोबाईल शिवाय व्यक्ती बाहेर पडणार नाहीत.मोबाईल हा व्यक्तीच्या स्टेटस चा एक भाग बनलेला आहे. कोणत्याही गोष्टीची आजची तरुण पिढी प्रायव्हसी ठेवत नाहीत.प्रत्येक गोष्ट स्टेटसला ठेवून समाजाच्या समोर आणली जाते आणि यामुळे सायबर गुन्हे वाढलेले आहेत.हे सांगत असताना त्यांनी सोशल मीडियामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि त्या चांगल्या गोष्टीवर सर्वांनी फोकस करणे आवश्यक आहे. मोबाईल मध्ये पूर्ण जग सामावलेले आहे. मोबाईल म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे. यावर भर न देता व्यक्ती एकलकोंडा होत चाललेला आहे. आपल्यासमोर अनेक व्यक्ती असताना तो इतर डिजिटल माध्यमांनी जोडलेल्या व्यक्तींशी जास्त बोलत असतो. यामुळे लाईक, शेर, कमेंट याकडेच त्याचे जास्त लक्ष आहे. आणि हे एक व्यसन बनलेले आहे. याचा व्यक्तीच्या मेंदूवर आणि मनावर परिणाम होतो. यामुळे झोप येत नाही, एकाच वेळी व्यक्ती अनेक कामे करतो त्यामुळे एका कामावर लक्ष केंद्रित होत नाही. त्यासाठी सोशल मीडियाचं फ्युचर काय असेल यावर सुद्धा त्यांनी चर्चा केली व विविध सोशल मीडियाच्या कंपनीने व सरकारनी यावर काम करून काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले. या चर्चासत्रासाठी लाभलेल्या विशेष मार्गदर्शिका प्राध्यापिका अर्पिता चटर्जी, बी.एड. कॉलेज कल्याणी, वेस्ट बेंगाॅल, यांनी सोशल मीडियाचे चांगले परिणाम आणि वाईट परिणाम समाजावर कशा पद्धतीने होत आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. समाज माध्यम हे चांगली माहिती देतात आणि चुकीची पण माहिती देतात याचा राजकारणावर मोठा परिणाम होत असतो. असे मत व्यक्त केले. सोशल मीडियाचा वापर किती प्रमाणामध्ये करावा हे ठरवणे गरजेचे आहे. याचा वापर जर आपण मर्यादित केला तर याच्यासारखा चांगला मार्गदर्शक दुसरा नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. या चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट जिल्हा लातूर, अध्यक्षीय समारोप करत असताना म्हणाले की, सोशल मीडियाने खूप मोठी क्रांती केली आहे. समाजामध्ये खूप चांगले बदल होत आहेत. परंतु त्याच बरोबर नकारात्मक बदल सुद्धा होत आहेत. प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर करत असताना जागृती, नीतिमत्ता व सदसद विवेक बुद्धीचे भान ठेवून वापर करावा.याप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ जिल्हा परभणी .प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांनी आपले मत मांडताना असे म्हटले की समाज माध्यमांनी समाजातील व्यक्ती एकत्र आणल्या, संभाषण आणि व्यक्त होण्यासाठी संधी दिल्या असल्या तरी कुठेतरी आपल्या आयुष्यात अडथळे तयार केले आहेत. वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी, डोळ्यांचे आजार, लोप पावणारी माणुसकी या गोष्टी एका बाजूला पण आपल्या मेंदूला आणि मनाला या समाज माध्यमांमुळे जी कीड लागते आहे.आज ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही उक्ती खरी करताकरता ही समाज माध्यमे आपल्याला आपल्या बाजूच्या माणसाला विसरण्यास भाग पाडत आहेत.
वास्तववादी जीवन जगण्याची एक प्रकारे गरज भारतीयांना असताना, समाज माध्यमांमुळे एक प्रकारे आभासी जीवन अनेक भारतीय आपलेसे करू लागले आहेत असे मत मांडले.तसेच प्राचार्य डॉ. बबन बोडके महात्मा फुले महाविद्यालय किनगाव जिल्हा लातूर यांनीही सोशल मीडियाच्या सकारात्मक व नकारात्मक परिणामावर चर्चा केली. व परिषदेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या प्रास्ताविक पर मनोगतांमध्ये प्रा. डॉ. अल्का सोमवंशी सोशल मीडियामुळे समाजाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान व्यक्तीला घरी बसून होत आहे. यातूनच जगामध्ये खूप मोठी क्रांती झालेली आहे. आज सोशल मीडियाचे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. फेसबुक, युट्युब, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट , टीकटाॅक , टेलिग्राम इत्यादीच्या माध्यमातून जग जोडलेले आहे. आजची तरुण पिढी सोशल मीडियावर व्यस्त आहे. आपला टाईम, टॅलेंट वेस्ट करत आहेत. हे भारतासह पूर्ण जगाला परवडणारे नाही असे मत मांडले डॉ. सुनिता टेंगसे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय दिला. सदरील चर्चासत्रामध्ये जगामधील विविध देशातून 600 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. झुम व युट्युब लाईव्ह या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सदरील चर्चा सत्र पार पडले. यामध्ये श्रीलंका, नेपाळ, चीन, जपान, कोरिया ,युक्रेन ,ग्रीस,रशीया इत्यादी देशाबरोबरच भारतातील वेस्ट बेंगॉल, आसाम ,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू इत्यादी राज्यातील व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता. सदरील चर्चासत्रात विविध सहभागिनी पेपर वाचन केले. यामध्ये मंजुला आर -बेंगलोर विद्यापीठ, श्रेया सील- कलकत्ता वेस्ट बेंगाॅल, डॉ. अनुजा जैन- जबलपूर मध्य प्रदेश, डॉ. विनोद कुमार -मंडी हिमाचल प्रदेश, अनुराधा पाटील- अंबाजोगाई, महाराष्ट्र महानंदा राऊत खेडकर- नांदेड, डॉ.कालिदास भांगे -छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र यांनी प्रतिनिधिक स्वरूपात विविध विषयावर पेपर वाचन केले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा देशपांडे, व डॉ.एन. पी. कुडकेकर यांनी केले तर आभार डॉ.अल्का सोमवंशी यांनी मानले. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ. अल्का सोमवंशी डॉ. सुनिता टेंगसे, डॉ. बळीराम पवार,डॉ. शरद सुरनर, प्रा. नप्ते एस. यु, डॉ. मनीषा देशपांडे, डॉ. एन. पी. कुडकेकर, डॉ देवराये यांनी परिश्रम घेतले
No comments:
Post a Comment