सोनपेठ (दर्शन) :- हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ संचलित कै.र.व.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनपेठ येथे शैक्षणिक वर्ष 2024 - 25 यावर्षी आपल्या महाविद्यालयात नॅक पुनर्मूल्यांकनास सामोरे जात आहे या निमित्याने नॅकचे परीक्षक आपल्या महाविद्यालया दिनांक 17 व दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी प्रत्यक्ष येऊन पाहणी करणार आहेत, दिनांक 17 फेब्रुवारी 2025 सोमवार रोजी माजी विद्यार्थी आणि पालक यांची बैठक आयोजित केली आहे, या भेटीत आपल्याला या महाविद्यालयातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी व त्या अनुषंगाने आपण केलेली वाटचाल याची मांडणी करून महाविद्यालयाचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सूचना कराल ही अपेक्षा तरी सर्व माजी विद्यार्थी व पालक आपण नविसरता दिनांक 17 फेब्रुवारी 2025 सोमवार रोजी ठीक दुपारी 12:30 वाजता उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ द्यावा अशी विनंती प्राचार्य डॉ.वसंत सातपुते व सर्व प्राध्यापक मंडळी आणि माजी विद्यार्थी समन्वय समिती तसेच कै.र.व.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय माजी विद्यार्थी प्रतिष्ठान सोनपेठ आदींनी केली आहे.
No comments:
Post a Comment