सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरात प्रथमच जय मल्हार मित्र मंडळ दहिखेड सोनपेठ आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 299 वा सार्वजनिक जन्मोत्सव 2024 विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे, यामध्ये पहिले पुष्प रक्तदान शिबिर दिनांक 30 मे 2024 गुरुवार रोजी सकाळी 10.30 वाजता, महिला व्याख्यान सायंकाळी 7 वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, कार्यक्रमांच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर (माजी अध्यक्षा जिल्हा परिषद परभणी) कार्यक्रमाच्या उद्घाटक सौ.जिजाबाई राठोड (माजी नगराध्यक्षा)प्रमुख पाहुण्या सौ. ज्योतीताई कदम (उपाध्यक्षा हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ), प्रमुख उपस्थिती प्रा.डॉ.मुक्ता सोमवंशी, प्रा.डॉ.सुनीता टेंगसे, प्रा.डॉ.वनिता कुलकर्णी, प्राचार्या डॉ.शेख शकीला, प्रा.आरती बोबडे,सौ.पुष्पाताई इंगोले, मंगलताई कोटलवार डॉ.सुनिता फड, डॉ.प्रमिला पवार, डॉ.अमृता काकडे आदिंची उपस्थीती राहणार आहे तसेच दुसरे पुष्प दिनांक 31 मे 2024 शुक्रवार रोजी सकाळी ठीक 10 वाजता प्रतिमा पूजन व मानवंदना, ध्वजारोहण आणि भव्य मोटर सायकल रॅली राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथे उद्घाटक राजेश दादा विटेकर (संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी), प्रमुख उपस्थिती सूर्यमोहन बोलमवाड (पोलीस निरीक्षक), सुनील अंधारे (सा.पो.नि), दत्ताराव कदम (माजी उपनगराध्यक्ष), सुमित पवार (युवा नेते) अॕड श्रीकांत विटेकर (माजी नगरसेवक), परमेश्वर कदम (अध्यक्ष हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ), सतीश देशमुख (जेष्ठ पत्रकार), प्रभाकर सिरसाठ (सामाजिक कार्यकर्ते तथा सदस्य जिल्हा दक्षता सनियंत्रण समिती परभणी), दिनकर तिथे (जिल्हा परिषद सदस्य), विश्वंभर गोरवे (तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना), किरण स्वामी (संपादक साप्ताहिक सोनपेठ दर्शन) आदींसह अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी सायंकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रा श्री सोमेश्वर मंदिर येथून सुरुवात होणार आहे नियोजन श्री सोमेश्वर मित्र मंडळ सोनपेठ, जय भवानी मित्र मंडळ सोनपेठ, छत्रपती संभाजी मित्र मंडळ सोनपेठ, गणेश नगर मित्र मंडळ सोनपेठ, भीमगड मित्र मंडळ सोनपेठ व लहुजी नगर मित्र मंडळ सोनपेठ तर आयोजक जय मल्हार मित्र मंडळ दहिखेड सोनपेठ आदी राहणार आहेत तरी सर्व जनतेने या दोन दिवसीय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.




No comments:
Post a Comment