परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100 % पीक विमा मिळुन देणार - आ. सुरेश वरपुडकर
परभणी /सोनपेठ (दर्शन) : -
परभणी येथे दि .10 जुन 2024 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी, परभणी यांच्या कार्यालयात विमा कंपनी च्या प्रतिनिधी व जिल्हा अधीक्षक कृषी यांच्या सोबत बैठक संपन्न झाली, याप्रसंगी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपुडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली 2023 - 24 मधे जिल्ह्यातील 52 मंडळात सलग 21 दिवस पाऊस न पडल्यामुळे बाधित घोषित केलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन ला 25 % सरसगट अग्रिम दिला असून उर्वरित 75 % का दिला नाही तसेच कापूस व इतर पिकाचा 100 % विमा का दिला नाही ? 70 हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी का रद्द का केल्या ? असा जाब विचारला.त्यावेळी कंपनीच्या व कृषी विभागाच्या अधिकाऱ्याना या बाबत उत्तर देता आले नाही, त्यामुळे गतवर्षी दुष्काळ असल्यामुळे विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 100 % विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .सरसकट कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन,ऑफलाईन फोनवर तक्रार केली असेल आणि कोणत्या शेतकरी बांधव यांनी पिक विमा भरला आहे आणि यांनी वरच्या कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नाही यांना पण खरीप व रबी पिकाचा 100 % लाभ देण्यात यावा अन्यथा लवकर मार्ग नाही काढला तर आम्ही सर्व जण कोर्टात धाव घेऊन यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे ठामपणे सांगितले याला अधिक्षक कृषी अधिकारी गवळी साहेब यांनी तत्वात: सहमती दिली व कंपनीच्या प्रतिनिधी ना तश्या सूचना दिल्या आहेत.यावेळी आमदार आदरणीय सुरेशराव वरपुडकर साहेब, प्रा .रामभाऊ घाटगे घाटगे, सोनपेठ कांग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. मुंजाभाऊ धोंडगे , रंगनाथ भोसले , सचिन जंवजाळ, सुदर्शन कदम, सुरेश यादव , अशोकराव जाधव परभणी बाजार समितीचे उपसभापती चव्हाण साहेब मोठ्या संख्येने शेतकरी बांधव आणि कल्याण लोहट मांडाखळीकर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment