समस्त वीरशैव समाज बांधव यांच्या वतीने क्रांतीसुर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवाचे आयोजन
सोनपेठ (दर्शन) :-
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी समस्त विरशैव समाज सोनपेठ च्या वतीने क्रांतीसुर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
प्रथम पुष्प
दिनांक : १० मे २०२४ शुक्रवार, अक्षय तृतीया, रोजी सकाळी १०.०० वा. क्रांतीसुर्य जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची प्रतिमापुजन ठिकाण : जगज्योती महात्मा बसवेश्वर चौक, सोनपेठ
दुसरे पुष्प
दिनांक : १० मे २०२४ शुक्रवार, अक्षय तृतीया, रोजी दुपारी ०५.०० वा. क्रांतीसुर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची भव्य दिव्य मिरवणुक
प्रस्थान : जगज्योती महात्मा बसवेश्वर चौक, सोनपेठ
समारोप : जुनी श्री महालिंगेश्वर विद्यालय, सोनपेठ
मिरवणुक नंतर अल्पोहार
ठिकाण : जुनी श्री महालिंगेश्वर विद्यालय, सोनपेठ
तरी आपण सर्व बसवप्रेमी बांधवांनी या भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.अशी विनंती समस्त विरशैव समाज सोनपेठ बांधवांनी केली आहे.

No comments:
Post a Comment