Monday, February 27, 2023

श्रीहरीकोटा शैक्षणिक सहलीसाठी केंद्रस्तरीय अकरा विद्यार्थ्यांची निवड परीक्षा शांततेत

श्रीहरीकोटा शैक्षणिक सहलीसाठी केंद्रस्तरीय अकरा विद्यार्थ्यांची निवड परीक्षा शांततेत

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुका 6 केंद्रावर शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद परभणी श्रीहरीकोटा थुंबा म्युझियम,विश्वेश्वरय्या म्युझियम येथील शैक्षणिक सहलीसाठी केंद्रस्तरीय निवड परीक्षा दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 ते 12 या वेळेत संपन्न झाल्या,सोनपेठ शहरातील केंद्र कन्या येथे एकूण विद्यार्थी 853 तर केंद्रीय कन्या शाळेत एकूण 333 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली,सोनपेठ तालुक्यातील प्रत्येकी 6 केंद्रातून परीक्षा होत आहेत या प्रत्येक केंद्रातून 11 विद्यार्थी यामध्ये मुली लोंढे मधुरा विश्वांभर,भोसले श्रावणी संदिप,रुद्राणी शिवलिंग राजमाने,भोसले भक्ती विलास,कोरडे भावना दत्तात्रय तर मुलं धबडे विवेक अजय,पोपळघट शुभम किसनराव,कसपटे ओमकार देवानंद, मस्के ओमकार महादेव,पवार विशाल दत्ता,कराळे आदित्य अंकुश आदिंजन पात्र ठरले आहेत.हेच तालुका स्तरावरील परीक्षा देऊन 10 विद्यार्थ्यांची पुन्हा जिल्हास्तरावर परीक्षेतून पुन्हा 3 विद्यार्थ्यांची निवड होणार आहेत, 9 तालुक्यातून 27 विद्यार्थी श्रीहरीकोटा थुंबा म्युझियम, विश्वेश्वरय्या म्युझियम येथील शैक्षणिक सहलीसाठी पात्र होणार आहेत या परीक्षा गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण यांच्या मार्गदर्शनात सोनपेठ तालुक्यातील 6 केंद्रप्रमुखांच्या देखरेखित संपन्न झाल्या आहेत.





No comments:

Post a Comment