सोनपेठ गोदाम किपर व नायब तहसीलदार पुरवठा यांच्यावर कारवाईची मागणी
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ गोदाम किपर व नायब तहसीलदार पुरवठा यांच्यावर कारवाई करा स्वस्त धान्य दुकानदार यांचे मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन, निवेदनात सोनपेठ तालुक्यात स्वस्त धान्य पुरवठा करणारे शासकिय गोदामचे गोदाम किपर हे प्रत्येक दुकानदारास 45 ते 46 किलो वजनाचा (धान्यांचा) कट्टा देतात.वजन का कमी दिली असे विचारले असता नायब तहसीलदार पुरवठा प्रकाश गायकवाड यांना फोन करतात व नायब तहसीलदार आम्हाला कमी वजनाची कट्टे घेण्यासाठी धमकावतात.नाही घेतले तर तुमचे दुकान तपासणी करून दुकान रद्द करण्याची धमकी देतात त्यामुळे कोणताही दुकानदार तक्रार देण्यास पुढे येत नाही पण आता खूप अडचणीत दुकानदार असल्यामुळे आम्ही तक्रार करत आहोत.तसेच दुकान तपासणी फीस 3000/-(तीन हजार रुपये) तसेच कमिशन 10% मागितले जात आहे नाही दिले दुकान उडविण्याची धमकी देतात तसेच मुंबईचे पथक गोदाम तपासणीसाठी आले होते त्याबद्दल प्रत्येक दुकानदाराकडून नायब तहसीलदार पुरवठा प्रकाश गायकवाड यांनी 1000/- (एक हजार रुपये) घेतले तसेच कमी वजनाचे कट्टे (धान्याचे) घेण्यासाठी दुकानदार यांची मीटिंग घेऊन बैठकीत नायब तहसीलदार पुरवठा प्रकाश गायकवाड यांनी सांगितले की कोणत्याही दुकानदारांनी गोदामात जायचे नाही जे धान्य मिळेल ते घेऊनजा नाहीतर दुकान बंद करीन अशी धमकी देतात.गोदाम किपर व नायब तहसीलदार यांची दोघांची सांगड जमलेली असून कमी वजनाच्या कट्टे आम्हाला देण्यात येत आहेत गोदाम किपरला नायब तहसीलदार यांचे पाठबळ असल्यामुळे ते दुकानदार यांना कमी वजनाचे 45 ते 46 किलोचे कट्टे देऊन उरलेले धान्य बाजारामध्ये विकतो कमी वजनाचे कट्ट्याचे फोटो घेऊन व दुकानदार ग्रुपवर टाकले तरी कोणीही त्याची दखल घेत नाही तरी मे.जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला न्याय देऊन कारवाई करून त्यांना पुरवठा विभागातून काढावे नसता ते असेच आम्हाला त्रास देत राहतील असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर स्वस्त धान्य दुकानदार प्रभाकर रोडे, उर्मिला कराळे, ज्ञानोबा रणखांबे, शिवाजी सोपानराव आदींच्या स्वाक्षरी आहेत.


No comments:
Post a Comment