सोनपेठ येथे प्रथमच मराठा सेवा संघ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरात प्रथमच मराठा सेवा संघ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा सर्व कार्यक्रम मनकर्णिका नगर,स्व.बाळासाहेब ठाकरे चौकाच्या समोर,परळी रोड सोनपेठ येथे पहिले पुष्प दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रविवार रोजी निबंध स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष परमेश्वर कदम, उद्घाटक अनिल शिंदे, प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.बाबासाहेब काळे, प्रमुख उपस्थिती ओमप्रकाश लष्करे,जयपाल सर, सुरज गायकवाड, प्रकाश पवार.दुसरे पुष्प शिव कुटुंब मेळावा दिनांक 20 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी वेळ रात्री 7 ते 9 मराठा सेवा संघ तालुका शाखा सोनपेठ आयोजित शिव कुटुंब मेळाव्यासाठी सर्वच्या सर्व 32 कक्षाच्या कार्यकारणीसाठी जास्तीत जास्त विचारांशी निगडित असणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही शिव विनंती केली आहे.तिसरे पुष्प व्याख्यान व गुणगौरव सोहळा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 मंगळवार रोजी वेळ सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश दादा विटेकर, उद्घाटक प्रा.डा. मुंजाभाऊ धोंडगे, शिव व्याख्याते सुभाषराव ढगे, प्रमुख उपस्थिती रंगनाथ दाजी रोडे, मधुकर मामा निरपणे,उप शिक्षणाधिकारी शौकत पठाण.चौथे पुष्प दिनांक २२ फेब्रुवारी 2023 बुधवार रोजी सायंकाळी 7 ते 10 शि.भ.प. मधुकर महाराज बारुळकर शिव कीर्तनकार नांदेड, प्रमुख उपस्थिती माजी आमदार व्यंकटराव कदम तसेच सोनपेठ तालुक्यातील सर्व कीर्तनकार यांचा सत्कार सोहळा होणार आहे.

No comments:
Post a Comment