जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ आणि परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिजामाता पब्लिक स्कूल व ज्यु.कॉलेज येथे दोन दिवसाचे भव्य वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले.स्नेह संमेलनामध्ये पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून प्रेक्षकांची मने जिंकणारे नृत्य कला अविष्कार सादर केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष. मा.आ.सुरेश वरपूडकर, कार्यक्रमाचे उद्घाटक मा.मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, प्रमुख अतिथी म्हणून मा.निर्मलाताई विटेकर,माजी जि.प.अध्यक्ष परभणी मा.नायब तहसीलदार अनिल घनसावंघ, मा.राजेभाऊ अंभोरे, सौ.सुस्मिताताई केदारे, संस्थेचे सचिव प्रा.डॉ.मुंजाभाऊ धोंडगे सर, मुख्याध्यापिका सौ.विद्याताई धोंडगे मॅडम,शाळेचे प्राचार्य अजय सर,प्राचार्य.गणेश जयतपाळ सर, इतर मान्यवर, सर्व विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ. सुरेश वरपूडकर यांनी सोनपेठ परिसराच्या शैक्षणिक विकासामध्ये जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत व्यक्त केले." प्रमुख अतिथी मा.मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी या भव्य आयोजनाबद्दल सर्व शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.शाळेची प्राचार्य अजय सर यांनी शाळेच्या वर्षभरातील कामकाजाचा शैक्षणिक अहवाल सादर केला. तसेच संस्थेचे सचिव प्रो.डॉ.मुंजाभाऊ धोंडगे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गणेश सर यांनी केली.याप्रसंगी शेकडो च्या संख्येने पालक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.



No comments:
Post a Comment