Monday, February 27, 2023

सर्व जातींच्या ओबीसी समाज बांधवांनी आज प्रबोधन मंडल यात्रेचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहा - सुभाषआप्पा नित्रुडकर

सर्व जातींच्या ओबीसी समाज बांधवांनी आज प्रबोधन मंडल यात्रेचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहा - सुभाषआप्पा नित्रुडकर 


सोनपेठ (दर्शन) :- ओबीसींच्या जनजागृती व एकजुटीसाठी प्रबोधन मंडल यात्रा ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती, परभणी.आयोजित ही यात्रा परभणी जिल्ह्यातील ओबीसी चळवळीच्या इतिहासातील अविस्मरणीय यात्रा ठरणार आहे. त्यामुळे आपण आज दि.२८ फेब्रुवारी २०२३ मंगळवार रोजी सोनपेठ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुपारी ठिक ३ वाजता सर्व जातींच्या समाज बांधवांनी आपल्या सर्व ओबीसी बांधवासह मोठ्या संख्येने जमावे अशी विनंती सोनपेठ तालुका संयोजक सुभाषआप्पा नित्रुडकर यांनी केली आहे.
आपन आज २८ फेब्रुवारी  २०२३ ओबीसी आरक्षणाच्या हक्कासाठी काही दिवसापूर्वी परभणी येथे काढण्यात आलेल्या भव्य ओबीसी मोर्चाला जिल्ह्यातील तमाम ओबीसी समाजाने अतिशय भरभरून प्रतिसाद दिला होता.अर्थात तुम्ही सर्वांनी देखील तो मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले होते.आणि त्या सगळ्या अक्रोशाचे फलीत म्हणुन आपले राजकीय आरक्षण आपल्याला पुन्हा परत मिळाले आहे परंतू त्यासाठी नेमण्यात आलेल्या बाटीया आयोगाने नोंदविलेल्या निष्कर्षात आणि गांव पातळीवर माहिती संकलित करणाऱ्या यंत्रनेच्या हातुन जाणीवपूर्वक काही चुका करण्यात आल्या आहेत त्यामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी दाखवण्यात आली आहे.परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसींच्या जागांना फटका बसला आहे.पूर्वीच्या जनगणनेत जामची लोकसंख्या ५२% असतांना २०२२ च्या आकडेवारीत ती ३७% कशी दाखवण्यात आली. वास्तविक पाहता पूर्वीच्या लोकसंख्येपेक्षा आत्ताच्या लोकसंख्येत वाढ होने अपेक्षित असताना ती घटली कशी? हा जवाब आम्हाला शासनाला विचारायचा आहे.त्याच बरोबर ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा ही गेल्या कित्येक दिवसाची आपली मागणी आहे परंतू शासन जाणीवपूर्वक त्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.शासन कोणतेही असो त्यांनी कायम ओबीसींची दिशाभूल करण्याचे आणि त्यांना खेळवत ठेवण्याचेच काम केले आहे.या साऱ्या गोष्टीकडे आता आपल्याला डोळे उघडे ठेऊन पहावे लागणार आहे.जो पर्यंत आपण आपल्या मागण्यांसंदर्भात उग्र होणार नाहीत तोपर्यंत शासन व्यवस्था आपली हेळसांड थांबवणार नाही त्यासाठी आधी आपल्यातील विखुरलेल्या शक्तीला एकत्र करून परस्परात एकजुटीची भावना निर्माण करुन खालील जिव्हाळ्यांच्या मागण्यांसंदर्भात आपल्या ओबीसी बांधवात जनजागृती करावी या उदात्त हेतूने ही प्रबोधन मंडल यात्रा काढण्यात आली आहे.सदर मंडल यात्रा परमणी जिल्हातील सर्व तालुके आणि त्या मार्गावरील मोठ्या गावावरून जाणार आहे. ही यात्रा परभणी जिल्ह्यातील ओबीसी चळवळीच्या इतिहासातील अविस्मरणीय यात्रा ठरणार आहे. त्यामुळे आपण आज दि.२८ फेब्रुवारी २०२३ मंगळवार रोजी सोनपेठ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुपारी ठिक ३ वाजता सर्व जातींच्या समाज बांधवांनी आपल्या सर्व ओबीसी बांधवासह मोठ्या संख्येने जमावे अशी विनंती सोनपेठ तालुका संयोजक सुभाषआप्पा नित्रुडकर यांनी केली आहे.
मागण्या
(१) ओबीसीचे संपूर्ण आरक्षण कायम ठेवा.... 
२) ओबीसींची जातनिहाय जनगणना करा.....
३) मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागु करा.....
४) बाटीया आयोगासाठी संकलित केलेल्या माहितीची सत्यता तपासा....विनीत :- ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती, सोनपेठ.

श्रीहरीकोटा शैक्षणिक सहलीसाठी केंद्रस्तरीय अकरा विद्यार्थ्यांची निवड परीक्षा शांततेत

श्रीहरीकोटा शैक्षणिक सहलीसाठी केंद्रस्तरीय अकरा विद्यार्थ्यांची निवड परीक्षा शांततेत

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुका 6 केंद्रावर शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद परभणी श्रीहरीकोटा थुंबा म्युझियम,विश्वेश्वरय्या म्युझियम येथील शैक्षणिक सहलीसाठी केंद्रस्तरीय निवड परीक्षा दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 ते 12 या वेळेत संपन्न झाल्या,सोनपेठ शहरातील केंद्र कन्या येथे एकूण विद्यार्थी 853 तर केंद्रीय कन्या शाळेत एकूण 333 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली,सोनपेठ तालुक्यातील प्रत्येकी 6 केंद्रातून परीक्षा होत आहेत या प्रत्येक केंद्रातून 11 विद्यार्थी यामध्ये मुली लोंढे मधुरा विश्वांभर,भोसले श्रावणी संदिप,रुद्राणी शिवलिंग राजमाने,भोसले भक्ती विलास,कोरडे भावना दत्तात्रय तर मुलं धबडे विवेक अजय,पोपळघट शुभम किसनराव,कसपटे ओमकार देवानंद, मस्के ओमकार महादेव,पवार विशाल दत्ता,कराळे आदित्य अंकुश आदिंजन पात्र ठरले आहेत.हेच तालुका स्तरावरील परीक्षा देऊन 10 विद्यार्थ्यांची पुन्हा जिल्हास्तरावर परीक्षेतून पुन्हा 3 विद्यार्थ्यांची निवड होणार आहेत, 9 तालुक्यातून 27 विद्यार्थी श्रीहरीकोटा थुंबा म्युझियम, विश्वेश्वरय्या म्युझियम येथील शैक्षणिक सहलीसाठी पात्र होणार आहेत या परीक्षा गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण यांच्या मार्गदर्शनात सोनपेठ तालुक्यातील 6 केंद्रप्रमुखांच्या देखरेखित संपन्न झाल्या आहेत.





सर्व जातींच्या ओबीसी समाज बांधवांनी उद्या प्रबोधन मंडल यात्रेचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहावे - सुभाषआप्पा नित्रुडकर

सर्व जातींच्या ओबीसी समाज बांधवांनी उद्या प्रबोधन मंडल यात्रेचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहावे - सुभाषआप्पा नित्रुडकर 






सोनपेठ (दर्शन) :-

ओबीसींच्या जनजागृती व एकजुटीसाठी प्रबोधन मंडल यात्रा ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती, परभणी.आयोजित ही यात्रा परभणी जिल्ह्यातील ओबीसी चळवळीच्या इतिहासातील अविस्मरणीय यात्रा ठरणार आहे. त्यामुळे आपण दि.२८ फेब्रुवारी २०२३ मंगळवार रोजी सोनपेठ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुपारी ठिक ३ वाजता सर्व जातींच्या समाज बांधवांनी आपल्या सर्व ओबीसी बांधवासह मोठ्या संख्येने जमावे अशी विनंती सोनपेठ तालुका संयोजक सुभाषआप्पा नित्रुडकर यांनी केली आहे.
आपन २८ फेब्रुवारी  २०२३ ओबीसी आरक्षणाच्या हक्कासाठी काही दिवसापूर्वी परभणी येथे काढण्यात आलेल्या भव्य ओबीसी मोर्चाला जिल्ह्यातील तमाम ओबीसी समाजाने अतिशय भरभरून प्रतिसाद दिला होता.अर्थात तुम्ही सर्वांनी देखील तो मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले होते.आणि त्या सगळ्या अक्रोशाचे फलीत म्हणुन आपले राजकीय आरक्षण आपल्याला पुन्हा परत मिळाले आहे परंतू त्यासाठी नेमण्यात आलेल्या बाटीया आयोगाने नोंदविलेल्या निष्कर्षात आणि गांव पातळीवर माहिती संकलित करणाऱ्या यंत्रनेच्या हातुन जाणीवपूर्वक काही चुका करण्यात आल्या आहेत त्यामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी दाखवण्यात आली आहे.परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसींच्या जागांना फटका बसला आहे.पूर्वीच्या जनगणनेत जामची लोकसंख्या ५२% असतांना २०२२ च्या आकडेवारीत ती ३७% कशी दाखवण्यात आली. वास्तविक पाहता पूर्वीच्या लोकसंख्येपेक्षा आत्ताच्या लोकसंख्येत वाढ होने अपेक्षित असताना ती घटली कशी? हा जवाब आम्हाला शासनाला विचारायचा आहे.त्याच बरोबर ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा ही गेल्या कित्येक दिवसाची आपली मागणी आहे परंतू शासन जाणीवपूर्वक त्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.शासन कोणतेही असो त्यांनी कायम ओबीसींची दिशाभूल करण्याचे आणि त्यांना खेळवत ठेवण्याचेच काम केले आहे.या साऱ्या गोष्टीकडे आता आपल्याला डोळे उघडे ठेऊन पहावे लागणार आहे.जो पर्यंत आपण आपल्या मागण्यांसंदर्भात उग्र होणार नाहीत तोपर्यंत शासन व्यवस्था आपली हेळसांड थांबवणार नाही त्यासाठी आधी आपल्यातील विखुरलेल्या शक्तीला एकत्र करून परस्परात एकजुटीची भावना निर्माण करुन खालील जिव्हाळ्यांच्या मागण्यांसंदर्भात आपल्या ओबीसी बांधवात जनजागृती करावी या उदात्त हेतूने ही प्रबोधन मंडल यात्रा काढण्यात आली आहे.सदर मंडल यात्रा परमणी जिल्हातील सर्व तालुके आणि त्या मार्गावरील मोठ्या गावावरून जाणार आहे. ही यात्रा परभणी जिल्ह्यातील ओबीसी चळवळीच्या इतिहासातील अविस्मरणीय यात्रा ठरणार आहे. त्यामुळे आपण दि.२८ फेब्रुवारी २०२३ मंगळवार रोजी सोनपेठ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुपारी ठिक ३ वाजता सर्व जातींच्या समाज बांधवांनी आपल्या सर्व ओबीसी बांधवासह मोठ्या संख्येने जमावे अशी विनंती सोनपेठ तालुका संयोजक सुभाषआप्पा नित्रुडकर यांनी केली आहे.
मागण्या
(१) ओबीसीचे संपूर्ण आरक्षण कायम ठेवा.... 
२) ओबीसींची जातनिहाय जनगणना करा.....
३) मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागु करा.....
४) बाटीया आयोगासाठी संकलित केलेल्या माहितीची सत्यता तपासा....विनीत :- ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती, सोनपेठ.

Sunday, February 19, 2023

मराठा सेवा संघाच्या विचार मंचावर सा.सोनपेठ दर्शन शिवजन्मोत्सव विशेषांकाचे विमोचन

मराठा सेवा संघाच्या विचार मंचावर सा.सोनपेठ दर्शन शिवजन्मोत्सव विशेषांकाचे विमोचन 

सोनपेठ (दर्शन) :- मराठा सेवा संघ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यातील पुष्प पहिले विचार मंचावर साप्ताहिक सोनपेठ दर्शन शिवजन्मोत्सव विशेषांकाचे विमोचन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री परमेश्वर कदम,उद्घाटक शिवश्री अनिल शिंदे,प्रमुख पाहुणे शिवश्री ओमप्रकाश लष्करे, प्राचार्य शिवश्री गणेश जयतपाल, उपप्राचार्य शिवश्री सुरज गायकवाड, मुख्याध्यापक शिवश्री प्रकाश पवार,मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष तथा मुख्याध्यापक शिवश्री अंकुश परांडे,मराठा सेवा संघ सचिव शिवश्री पंजाब सुरवसे,शिवश्री प्रा.जिवन भोसले,माजी जिल्हा अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड शिवमती पुष्पाताई इंगोले व संपादक शिवश्री किरण स्वामी दिसत आहेत. 

Saturday, February 18, 2023

जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ आणि परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिजामाता पब्लिक स्कूल व ज्यु.कॉलेज येथे दोन दिवसाचे भव्य  वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले.स्नेह संमेलनामध्ये पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून प्रेक्षकांची मने जिंकणारे नृत्य कला अविष्कार सादर केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष. मा.आ.सुरेश वरपूडकर,  कार्यक्रमाचे उद्घाटक मा.मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, प्रमुख अतिथी म्हणून मा.निर्मलाताई विटेकर,माजी जि.प.अध्यक्ष परभणी मा.नायब तहसीलदार अनिल घनसावंघ, मा.राजेभाऊ अंभोरे, सौ.सुस्मिताताई केदारे, संस्थेचे सचिव प्रा.डॉ.मुंजाभाऊ धोंडगे सर, मुख्याध्यापिका सौ.विद्याताई धोंडगे मॅडम,शाळेचे प्राचार्य अजय सर,प्राचार्य.गणेश जयतपाळ सर, इतर मान्यवर, सर्व विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.  विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ. सुरेश वरपूडकर यांनी सोनपेठ परिसराच्या शैक्षणिक विकासामध्ये जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत व्यक्त केले." प्रमुख अतिथी मा.मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी या भव्य आयोजनाबद्दल सर्व शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.शाळेची प्राचार्य अजय सर यांनी शाळेच्या वर्षभरातील कामकाजाचा शैक्षणिक अहवाल सादर केला. तसेच संस्थेचे सचिव प्रो.डॉ.मुंजाभाऊ धोंडगे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गणेश सर यांनी केली.याप्रसंगी शेकडो च्या संख्येने पालक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

Friday, February 17, 2023

सोनपेठ येथे प्रथमच मराठा सेवा संघ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा

सोनपेठ येथे प्रथमच मराठा सेवा संघ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरात प्रथमच मराठा सेवा संघ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा सर्व कार्यक्रम मनकर्णिका नगर,स्व.बाळासाहेब ठाकरे चौकाच्या समोर,परळी रोड सोनपेठ येथे पहिले पुष्प दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रविवार रोजी निबंध स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष परमेश्वर कदम, उद्घाटक अनिल शिंदे, प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.बाबासाहेब काळे, प्रमुख उपस्थिती ओमप्रकाश लष्करे,जयपाल सर, सुरज गायकवाड, प्रकाश पवार.दुसरे पुष्प शिव कुटुंब मेळावा दिनांक 20 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी वेळ रात्री 7 ते 9 मराठा सेवा संघ तालुका शाखा सोनपेठ आयोजित शिव कुटुंब मेळाव्यासाठी सर्वच्या सर्व 32 कक्षाच्या कार्यकारणीसाठी जास्तीत जास्त विचारांशी निगडित असणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही शिव विनंती केली आहे.तिसरे पुष्प व्याख्यान व गुणगौरव सोहळा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 मंगळवार रोजी वेळ सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश दादा विटेकर, उद्घाटक प्रा.डा. मुंजाभाऊ धोंडगे, शिव व्याख्याते सुभाषराव ढगे, प्रमुख उपस्थिती रंगनाथ दाजी रोडे, मधुकर मामा निरपणे,उप शिक्षणाधिकारी शौकत पठाण.चौथे पुष्प दिनांक २२ फेब्रुवारी 2023 बुधवार रोजी सायंकाळी 7 ते 10 शि.भ.प. मधुकर महाराज बारुळकर शिव कीर्तनकार नांदेड, प्रमुख उपस्थिती माजी आमदार व्यंकटराव कदम तसेच सोनपेठ तालुक्यातील सर्व कीर्तनकार यांचा सत्कार सोहळा होणार आहे.

Saturday, February 11, 2023

संत सेवालाल महाराज माहिती Type Here Searchसं संत सेवालाल महाराज माहिती संत सेवालाल महाराज

सिंधू संस्कृती ही भारताची सर्वात सुसंस्कृत आणि प्राचीन संस्कृती मानली जाते. गोर-बंजारा ही या संस्कृतीशी संबंधित एक संस्कृती आहे आणि हा गोर बंजारा समाज खरोखरच संपूर्ण जगात पुरी आहे आणि वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

जसे महाराष्ट्रातील बंजारा, कर्नाटकमधील लामणी, आंध्रमधील तल्लाडा, पंजाबमधील बाजीगर, उत्तर प्रदेशमधील नाईक समाज आणि बाह्य जगातील राणी. या समाजाच्या पूर्वीच्या काळात बौद्ध आणि महावीर हे पिथगौर नावाच्या गौर्धर्माचे पहिले संस्थापक होते. यानंतर, दगुरु नावाचा दुसरा धार्मिक नेता ग्यारवी शतकात झाला आहे. दुसर्‍या धार्मिक शिक्षकाने शिक्षण आणि मंत्र आणि समाजाला महत्त्व दिले. त्या मंत्र गोरबोलीमध्ये शिकच शिकवाच शिखे राज धडावच, शिखा जेरी सज्पोली, घियानापोली, याचा अर्थ असा आहे की समाज शिक्षण प्राप्त करुन आपला समाज शिकवितो.

त्याचबरोबर समाजाला राजचा गौरव मिळू शकेल. पीठगौर यांनी चंद्रगुप्त मौर्य, हर्षवर्धन सारख्या महान विराट राजाला जन्म दिला. त्याच प्रकारे, दगुरुंच्या कल्पनांनी आला उदाल, राजा गोपीचंद यासारखे महान योद्धा तयार केले. १२ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत गौर बंजारामध्ये खूप मोठे योद्धा बनले. महाराणा प्रतापचा सेनापती जयमल फंतिहा आणि राजा रतनसिंगचा सर सेनापती आणि राणी रूपमतीचा भाऊ गोर बंजारा गौरा बादल. १२ शताब्दी पासून तर १७ शताब्दी शतकातील गौर हे बंजारा समाज, उत्तरेकडील लखीशस बंजारा आणि दक्षिणेकडील जंगी, भंगी (भुकीयस) आणि मध्यभारतीचे भगंदरस वडतिया हे मोठे व्यापारी होते.

बंजारा समाज

हे सर्व व्यापारी भारतातील बड्या राजांना आणि सम्राटांना रसद (अन्नधान्य) पुरवत असत. पण सर्वसामान्यांची चिंता ही गौर बंजारा समाजातील संत सेवालाल महाराजांची होती, म्हणूनच त्यांनी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी व त्यांच्या कल्याणकारी विचारांची स्थापना केली आणि त्याच महान सतगुरू, समाज सुधारक, क्रांतिकारक, अर्थशास्त्रज्ञ, आयुर्वेद आणि बहुजन (कोर-गोर) संत संत सेवालाल यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते. भौगोलिक आणि ऐतिहासिक माहितीमुळे गोर बंजारा समाज मुख्यत: राज्याच्या सीमेवर होता, त्यांना या परिस्थितीचा फायदा व्यवसायात मिळायचा आणि त्याच गोष्टीच्या दृष्टीकोनातून तो फायदेशीरही 

श्री संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्यदैवत आहेत.तर त्यांनी बंजारा समाजामध्ये असलेल्या प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखविला.जगण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गात असणाऱ्या बंजारा समाजाला जगण्याचा मार्ग दाखविला प्रगतीशील देशासोबत कसे चालता येईल हे हि सांगितले एवढेच नाही तर त्यांनी त्या काळात सांगितलेल्या गोष्टी ह्या काळात सुद्धा लागू पडत आहेत

बंजारा समाजातील व्यक्ती हा कधीही दुसर्यावर विसंबला नाही त्याचे कारण हेच कि त्यांचा पाठीमागे साक्षात श्री संत सद्गुरू सेवालाल महाराज हे उभे होते,मद्यपान करून पत्नीवर अत्याचार करणारे , हुंड्यासाठी बायकोला माहेरी पाठवणारे, कार्यक्रम असल्यावर प्राणिजात ची हत्या करणारे अश्या अनेक लोकांची सेवालाल महाराज यांनी जगण्याचा मार्ग दाखविला.

कौटुंबिक माहिती व बालपण

वालाल महाराज यांचे वडील रामजी नायक यांचा मुलगा भीमा नायक एक मोठा व्यापारी होता. त्याला जवळजवळ सर्व भारतीय भाषांचे ज्ञान होते. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ४००० ते ५००० गायी आणि बैल आहेत. कोण धान्याच्या वाहतुकीसाठी वापरला जात असे आणि ५२ तांड्यांचा नायक होता. त्यांना नायकडा (एक गावचा नायक आणि खेड्यांचा नायक) असे म्हटले जाते. एका गावात (तांडे यांचे) लोकसंख्या सुमारे ५०० होते. प्रत्येक तांड्यासाठी, एक माणूस आणि एक स्त्री गोर उपदेशक म्हणून काम करीत असे, त्यांना जवळ (५२) भेरू (माणूस) आणि ६४ जोगानी (स्त्री) असे संबोधत. या ५२ भेरू आणि ६४ जोगानींचे एकत्रिकरण होते. आणि त्यांची स्थापना मुख्य नाईक अंतर्गत झाली. म्हणूनच संत सेवालाल आजोबांना रामशहा नायक म्हटले गेले. (५२ तांड्यांचा संघप्रमुख) भीम नायक हेही ४१ तांड्यांचे संघप्रमुख होते. ऐतिहासिक कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की भीमा नायक यांची इंग्रजांकडे किंमत २ लाख आहे. मर्चंट करार केला होता

धर्मणीयाडी(आई)

सेवालालच्या आईचे नाव धरमणी होते, ती जयराम बदाटिया (सुवर्णा कप्पा, कर्नाटक) यांची मुलगी होती. भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळजवळ १२ वर्षे मूलबाळ नव्हते, पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेमुळे धर्मनी व भीमा नाईक यांना सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे

पत्नी

श्री संत सेवालाल महाराज यांची लग्नाची कथा जरा वेगळीच आहे.त्यांना खुपदा सर्वांकडून लग्न करावे अशी इच्छा जाहीर केली मात्र सेवालाल महाराज यांनी कधीही त्यांच्या बोलण्यावर लग्न केले नाही त्यासाठी सुद्धा एक कारण असे होते कि.त्याचीच एक कथा एकदा आई जगदंबा सेवालाल महाराज यांना लग्नासाठी विनवणी करत होती कि सेवालाल तू आता लग्न करून घे मात्र सेवालाल महाराज हे त्यांच्या बोलण्याला टाळण्याचा प्रयत्न करत होते.

मात्र आई जगदंबा पूर्णपणे विचार करूनच आली होती.तिने सेवालाल ला सांगितले कि तू स्त्री शी लग्न करण्याची इच्छा करशील तिच्याशी तुझं लग्न केलं जाईल मात्र त्यावर सेवालाल महाराज म्हणाले., कि आई ह्या जगात सर्वजन मला भाऊ ह्या नावाने संबोधता त्यावर मी त्यांचा भाऊच आलो ना आता तूच सांग जर जगात माझ्या सर्व बहिणीच आहे तर मी लग्न कुणाशी करू.ह्या उत्तराने आई जगदंबा भारावून गेली.आई जगदंबा मात्र सेवालाला महाराज यांना विनवणी करताच राहिली.शेवटी आई जगदंबा सेवालाल महाराज यांना मुलगी दाखवण्यासाठी स्वर्गात देखील घेऊन गेली.मात्र त्या नंतर जे झाले ते खूप वाईट होते.

सेवालाल महाराज यांचे भाऊ

धर्मी सात महाराज (मधले भाऊ)
रामचंद्र सात महाराज (धाकटे भाऊ)

हे पण वाचा:- संत सेवालाल महाराज मंदिर माहिती 


सेवालाल महाराज यांचे वचन

कोई केनी भजो पूजो मत। – भावार्थ: कोनाची पुजा आर्जा करू नक। देव मंदीरात नाही माणसात आहे।

रपीया कटोरो पांळी वक जाय।- भावार्थः एका रूपयाला एक वाटी पाणी विकेल।

कसाईन गावढी मत वेचो। – भावार्थः खाटीक ला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा।

जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो। – भावार्थः जिवंत नवरा असणाऱ्या स्त्री ला आपली बायको म्हणून घरात आणू नका।

चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो। – भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका।

केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो। – भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका

जाणंजो छाणंजो पछच माणजो। – भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा।

ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव | – भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोनी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल

मी त्याचा रक्षण करेल. पाना आड पान मी त्याला तारेल।


सेवालाल महाराज यांचे मूळ सिद्धांत

सेवा बल्लीज म्हणून ओळखल्या जाणार्‍या बंजारा जीवनासाठी त्यांनी 22 प्रमुख तत्त्वे दिली

जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा.

निसर्गाच्या अनुषंगाने नैसर्गिक जीवन जगा.

कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका.

सन्मानाने आयुष्य जगा.

खोटे बोलू नका, प्रामाणिक रहा ( बोलली बसा ) आणि इतरांचे सामान चोरू नका.

इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करु नका.

स्त्रियांचा सन्मान करा, आणि मुली जिवंत देवी आहेत.

काळजी करू नका आणि निर्भयपणे जगू नका, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा.

लोभ आणि भौतिक लैंगिक लैंगिक सुखसोयीची छटा दाखवा.

पाण्याचे रक्षण करा आणि तहानलेल्यांना पाणीपुरवठा करा आणि कधीही पाणी विकण्यास गुंतवू नका जे सर्वात मोठे गुन्हा / पाप आहे.

भुकेलेल्यांना अन्न द्या आणि गरजू लोकांना मदत करा.

वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा.

जंगलाला कधीही सोडू नका आणि जंगल नष्ट करू नका, जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वत: ला नष्ट करीत आहात.

विषारी पदार्थांचे सेवन करू नका आणि मद्यपान पूर्णपणे टाळा.

अवैध संबंधात गुंतू नका. किंवा कुणाला गुंतूही देऊ नका.

मनन केल्याने आंतरिक शांती मिळेल, आणि अभ्यास करा, ज्ञान मिळवा आणि ज्ञान इतरांना वाटा

आधुनिक जीवनशैली आणि सांत्वन देऊन आमिष बनू नका आणि शारीरिक कृतीत व्यस्त रहा.

माणुसकीवर प्रेम करा आणि पैशावर नव्हे तर इतर सहकारी व्यक्तींबरोबर कामगिरी करा.

आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा.

पालकांनो तुमचा आदर करा, तुमच्या कुटूंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करू नका.

समुदायाच्या संस्कृतीत व भाषेचे रक्षण करा, गोर भासा / गोरबोली बोला आणि निसर्गाशी जोडलेले सर्व सण साजरे करा आणि निसर्गास

हानी पोहचणारे असे सण टाळा.

नियमांचे पालन केले पाहिजे आणि गोरची ओळख टिकवून ठेवावी,

निसर्गाशी जोडले पाहिजे आणि त्याचा गैरफायदा घेऊ नये.

सेवालाल हे अनुकरणीय सत्यता,

धैर्य मानवतेच्या शिस्त, चिंतनशील, एक महान संगीतकार, अंधश्रद्धा विरुद्ध लढाई करणारे, एक बुद्धीप्रामाण्यवादी

आणि एक अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून काढणारे आहेत.

असे शीतला आणि सती देवी आणि सती देवी , आई जगदंबा यांच्या कथेत सुद्धा वाचायला मिळेल.

Monday, February 6, 2023

माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र आभिवादन.....!

माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र आभिवादन.....!


सोनपेठ (दर्शन) :-

माता रमाई भीमराव आंबेडकर (7 फेब्रुवारी 1897- 27 मे , इ.स. 1935) या भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पत्नी.
बालपण..........
रमाईचा जन्म गरीब कुटुंबात झाला. दाभोळजवळील वंणदगावात नदी काठी महारपुरा वस्तीमध्ये भिकु धुत्रे (वलंगकर) पत्नी रुक्मिणी सोबत राहत असत. त्यांना ३ मुली व १ मुलगा. मोठी मुलगी दापोलीत दिली होती. होती. रमा, गौरा व शंकर. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारा पर्यंत पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रुक्मिणी अजारी होती. त्यातच तिचा मृत्यु झाला. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. गौरा व शंकर अजाण होते. काही दिवसात वडिल भिकू यांचे निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीला जातात.
विवाह........‌
इ.स. १९०८ या वर्षी. रामजी सुभेदार भिमरावांसाठी मुलगी पाहत होते. सुभेदारांना समजले भायखळा मार्केटजवळ वलंगकरांकडे लग्नाची मुलगी आहे. सुभेदारांना पोरकी रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भिमरावांचे लग्न भायखळ्याच्या मार्केट मध्ये झाले.
कष्टमय जीवन.........
" १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते. त्यावेळी रमाईची खुप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत.त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तीने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दु:खांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता, अथांग प्रद्न्यान, आणि मृत्यु यांचे सर्जनशिल ज्वलंत प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईनं अनेक मरणं पाहिली. प्रत्येक मरणानं तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यु. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यु. १९१४_१७ साली बाबा अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यु. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यु. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. १९२१ बाबांचा मुलगा बाळ गंगाधर, व १९२६ मध्ये राजरत्नचा मृत्यु पाहीला. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकटी पडली. घर चालवण्यासाठी तीन शेण गोवर्या वेचल्या. सरपणासाठी वणवण फिरली.पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जाई. बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सुर्योदयापुर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्या थापायला वरळीला जात असे. मुलांसाठी उपास करत असे
निर्वाण........
रमाईची शरिर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खुपच विकोपाला गेला. बाबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वत: बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दु:खाचा फार मोठा आघात झाला,राजगृहासमोर (दादर) लाखो लोक जमले होते. बाबासाहेब रमाईला औषधे व मोसंबीचा रस पाजत होते. बाबासाहेब रमाईला औषधे व मोसंबीचा रस पाजत होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वा. रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यावधी रंजल्या गांजल्याच रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारच्या २ वा. रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसा ढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्याद रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले।

Thursday, February 2, 2023

सोनपेठ गोदाम किपर व नायब तहसीलदार पुरवठा यांच्यावर कारवाईची मागणी

सोनपेठ गोदाम किपर व नायब तहसीलदार पुरवठा यांच्यावर कारवाईची मागणी 



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ गोदाम किपर व नायब तहसीलदार पुरवठा यांच्यावर कारवाई करा स्वस्त धान्य दुकानदार यांचे मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन, निवेदनात सोनपेठ तालुक्यात स्वस्त धान्य पुरवठा करणारे शासकिय गोदामचे गोदाम किपर हे प्रत्येक दुकानदारास 45 ते 46 किलो वजनाचा (धान्यांचा) कट्टा देतात.वजन का कमी दिली असे विचारले असता नायब  तहसीलदार पुरवठा प्रकाश गायकवाड यांना फोन करतात व नायब तहसीलदार आम्हाला कमी वजनाची कट्टे घेण्यासाठी धमकावतात.नाही घेतले तर तुमचे दुकान तपासणी करून दुकान रद्द करण्याची धमकी देतात त्यामुळे कोणताही दुकानदार तक्रार देण्यास पुढे येत नाही पण आता खूप अडचणीत दुकानदार असल्यामुळे आम्ही तक्रार करत आहोत.तसेच दुकान तपासणी फीस 3000/-(तीन हजार रुपये) तसेच कमिशन 10% मागितले जात आहे नाही दिले दुकान उडविण्याची धमकी देतात तसेच मुंबईचे पथक गोदाम तपासणीसाठी आले होते त्याबद्दल प्रत्येक दुकानदाराकडून नायब तहसीलदार पुरवठा प्रकाश गायकवाड यांनी 1000/- (एक हजार रुपये) घेतले तसेच कमी वजनाचे कट्टे (धान्याचे) घेण्यासाठी दुकानदार यांची मीटिंग घेऊन बैठकीत नायब तहसीलदार पुरवठा प्रकाश गायकवाड यांनी सांगितले की कोणत्याही दुकानदारांनी गोदामात जायचे नाही जे धान्य मिळेल ते घेऊनजा नाहीतर दुकान बंद करीन अशी धमकी देतात.गोदाम किपर व नायब तहसीलदार यांची दोघांची सांगड जमलेली असून कमी वजनाच्या कट्टे आम्हाला देण्यात येत आहेत गोदाम किपरला नायब तहसीलदार यांचे पाठबळ असल्यामुळे ते दुकानदार यांना कमी वजनाचे 45 ते 46 किलोचे कट्टे देऊन उरलेले धान्य बाजारामध्ये विकतो कमी वजनाचे कट्ट्याचे फोटो घेऊन व दुकानदार ग्रुपवर टाकले तरी कोणीही त्याची दखल घेत नाही तरी मे.जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला न्याय देऊन कारवाई करून त्यांना पुरवठा विभागातून काढावे नसता ते असेच आम्हाला त्रास देत राहतील असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर स्वस्त धान्य दुकानदार प्रभाकर रोडे, उर्मिला कराळे, ज्ञानोबा रणखांबे, शिवाजी सोपानराव आदींच्या स्वाक्षरी आहेत.

शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवा

शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवा


सोनपेठ (दर्शन) :-

जय भवानी मित्र मंडळ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा-2023 राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा सोनपेठ.स्पर्धा दिनांक -16 फेब्रुवारी 2023, वार गुरुवार रोजी स्पर्धेचे विषय.1) प्राणा-पेक्षाही स्वराज्य श्रेष्ठ,2) आनंदी जीवनाची अनोखी रीत,हवे साहित्य,गीत आणि  संगीत,3) 21व्या शतकातील खरा शिवभक्त हरवलाय,4) देव भेटेल तुजला आपुल्या घरी,आई-वडिलांच्या पावन चरणावरी ! 5 ) भारतीय राजकारणात प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर.पारितोषिके -प्रथम पारितोषिक -  5001 रू रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.द्वितीय पारितोषिक - 3001 रू रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.तृतीय पारितोषिक - 2001 रू रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.चतुर्थ पारितोषिक - 1001 रु रोख , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.पंचम पारितोषिक - 751 रु रोख , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.उत्तेजनार्थ पारितोषिक - 551रु रोख ,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.विशेष पारितोषिक :- 17 वर्षांच्या आतिल एका स्पर्धकास उत्कृष्ट वक्ता म्हणून 1100 रु चे विशेष पारितोषिक.स्पर्धेचे नियम -1.स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल.2.स्पर्धेचे माध्यम मराठी,हिंदी व इंग्रजी असेल.3.स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या स्पर्धकांनी पात्रता फेरी साठी वरील 5 विषया पैकी कोणत्याही एका विषयावर किमान 2 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ 9637692579 या whatsapp नंबर वर पाठवून नोंदणी करणे आवश्यक आहे.4.स्पर्धेत व्हिडिओ पाठवून नाव नोंदणी करण्याची अंतिम तारिख 7 फेब्रुवारी 2023असेल.5.पात्रता फेरीत नोंदणीकृत सहभागी स्पर्धकांच्या व्हिडिओ चे परीक्षण करून 20 स्पर्धकांची निवड अंतिम (मुख्य) फेरीसाठी 10 फेब्रुवारी 2023 रोजी केली जाईल! 6.मुख्य स्पर्धा दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी होईल.7.मुख्य स्पर्धेत सादरीकरणासाठी वेळ 5 + 2 = 7 मिनिटे असेल.8.परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहिल.9. स्पर्धेच्या नियमात ऐनवेळेस बदल करण्याचा हक्क संयोजकांकडे राखीव आहे.10.सोनपेठ शहरा बाहेरील स्पर्धकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाईल.11.स्पर्धेसाठी कुठलेही प्रवेश शुल्क नाही.12.सदरील स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपताच दिला जाईल व बक्षीस वितरण स्पर्धेच्या ठिकाणीच केले जाईल.मुख्य संयोजक :- जय भवानी मित्र मंडळ सोनपेठ - 8180929999 संयोजन समिती सन्माननीय सदस्य जय भवानी मित्र मंडळ सोनपेठ.अधिक माहितीसाठी संपर्क :- शिवश्री प्रशांतजी शिंगाडे मो.-9637692579. शिवश्री सुभाष कदम मो.-9970995515.स्पर्धेचे ठिकाण :- साहित्यरत्न शाहीर आण्णाभाऊ साठे चौक सोनपेठ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी.सोनपेठ तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवा असे आवाहन जय भवानी मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष बळीराम काटे व सर्व जय भवानी शिवजन्मोत्सव समिती सन्माननीय सदस्यांनी केले आहे.

सोनपेठ गोदाम किपर व नायब तहसीलदार पुरवठा यांच्यावर कारवाई करा

सोनपेठ गोदाम किपर व नायब तहसीलदार पुरवठा यांच्यावर कारवाई करा



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ गोदाम किपर व नायब तहसीलदार पुरवठा यांच्यावर कारवाई करा स्वस्त धान्य दुकानदार यांची मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन, सोनपेठ तालुक्यात स्वस्त धान्य पुरवठा करणारे शासकिय गोदामचे गोदाम किपर हे प्रत्येक दुकानदारास 45 ते 46 किलो वजनाचा (धान्यांचा) कट्टा देतात.वजन का कमी दिली असे विचारले असता नायब  तहसीलदार पुरवठा प्रकाश गायकवाड यांना फोन करतात व नायब तहसीलदार आम्हाला कमी वजनाची कट्टे घेण्यासाठी धमकावतात.नाही घेतले तर तुमचे दुकान तपासणी करून दुकान रद्द करण्याची धमकी देतात त्यामुळे कोणताही दुकानदार तक्रार देण्यास पुढे येत नाही पण आता खूप अडचणीत दुकानदार असल्यामुळे आम्ही तक्रार करत आहोत.तसेच दुकान तपासणी फीस 3000/-(तीन हजार रुपये) तसेच कमिशन 10% मागितले जात आहे नाही दिले दुकान उडविण्याची धमकी देतात तसेच मुंबईचे पथक गोदाम तपासणीसाठी आले होते त्याबद्दल प्रत्येक दुकानदाराकडून नायब तहसीलदार पुरवठा प्रकाश गायकवाड यांनी 1000/- (एक हजार रुपये) घेतले तसेच कमी वजनाचे कट्टे (धान्याचे) घेण्यासाठी दुकानदार यांची मीटिंग घेऊन बैठकीत नायब तहसीलदार पुरवठा प्रकाश गायकवाड यांनी सांगितले की कोणत्याही दुकानदारांनी गोदामात जायचे नाही जे धान्य मिळेल ते घेऊनजा नाहीतर दुकान बंद करीन अशी धमकी देतात.गोदाम किपर व नायब तहसीलदार यांची दोघांची सांगड जमलेली असून कमी वजनाच्या कट्टे आम्हाला देण्यात येत आहेत गोदाम किपरला नायब तहसीलदार यांचे पाठबळ असल्यामुळे ते दुकानदार यांना कमी वजनाचे 45 ते 46 किलोचे कट्टे देऊन उरलेले धान्य बाजारामध्ये विकतो कमी वजनाचे कट्ट्याचे फोटो घेऊन व दुकानदार ग्रुपवर टाकले तरी कोणीही त्याची दखल घेत नाही तरी मे.जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला न्याय देऊन कारवाई करून त्यांना पुरवठा विभागातून काढावे नसता ते असेच आम्हाला त्रास देत राहतील असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर स्वस्त धान्य दुकानदार प्रभाकर रोडे, उर्मिला कराळे, ज्ञानोबा रणखांबे, शिवाजी सोपानराव आदींच्या स्वाक्षरी आहेत.

जयभवानी मित्रमंडळ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा-2023 राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा

जयभवानी मित्रमंडळ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा-2023 राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा 


सोनपेठ (दर्शन) :-
जयभवानी मित्रमंडळ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा-2023 राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा सोनपेठ.स्पर्धा दिनांक -16 फेब्रुवारी 2023, वार गुरुवार रोजी
    स्पर्धेचे विषय
1) प्राणा-पेक्षाही स्वराज्य श्रेष्ठ,
2) आनंदी जीवनाची अनोखी रीत,हवे साहित्य,गीत आणि  संगीत,
3) 21व्या शतकातील खरा शिवभक्त हरवलाय,
4) देव भेटेल तुजला आपुल्या घरी,आई-वडिलांच्या पावन चरणावरी ! 
5 ) भारतीय राजकारणात प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर.
पारितोषिके -प्रथम पारितोषिक -  5001 रू रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
द्वितीय पारितोषिक - 3001 रू रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.तृतीय पारितोषिक - 2001 रू रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.चतुर्थ पारितोषिक - 1001 रु रोख , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.पंचम पारितोषिक - 751 रु रोख , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.उत्तेजनार्थ पारितोषिक - 551रु रोख ,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
विशेष पारितोषिक :- 17 वर्षांच्या आतिल एका स्पर्धकास उत्कृष्ट वक्ता म्हणून 1100 रु चे विशेष पारितोषिक.
स्पर्धेचे नियम -१.स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल.२.स्पर्धेचे माध्यम मराठी,हिंदी व इंग्रजी असेल.३.स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या स्पर्धकांनी पात्रता फेरी साठी वरील 5 विषया पैकी कोणत्याही एका विषयावर किमान 2 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ 9637692579 या whatsapp नंबर वर पाठवून नोंदणी करणे आवश्यक आहे.४.स्पर्धेत व्हिडिओ पाठवून नाव नोंदणी करण्याची अंतिम तारिख 7 फेब्रुवारी 2023असेल.५.पात्रता फेरीत नोंदणीकृत सहभागी स्पर्धकांच्या व्हिडिओ चे परीक्षण करून 20 स्पर्धकांची निवड अंतिम (मुख्य) फेरीसाठी 10 फेब्रुवारी 2023 रोजी केली जाईल!६.मुख्य स्पर्धा दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी होईल.७.मुख्य स्पर्धेत सादरीकरणासाठी वेळ ५ + २ = ७ मिनिटे असेल.८.परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहिल.९. स्पर्धेच्या नियमात ऐनवेळेस बदल करण्याचा हक्क संयोजकांकडे राखीव आहे.१०.सोनपेठ शहरा बाहेरील स्पर्धकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाईल.११.स्पर्धेसाठी कुठलेही प्रवेश शुल्क नाही.१२.सदरील स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपताच दिला जाईल व बक्षीस वितरण स्पर्धेच्या ठिकाणीच केले जाईल.मुख्य संयोजक :- जयभवानी मित्र मंडळ सोनपेठ - 8180929999 संयोजन समिती सन्माननीय सदस्य जयभवानी मित्र मंडळ सोनपेठ.अधिक माहितीसाठी संपर्क :- शिवश्री प्रशांतजी शिंगाडे मो. -9637692579.शिवश्री सुभाष कदम मो.-9970995515.स्पर्धेचे ठिकाण :- साहित्यरत्न शाहीर आण्णाभाऊ साठे चौक सोनपेठ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी.