पत्रकार म्हणजे सत्याचा आरसा - डॉ. जगदीश शिंदे
सोनपेठ (दर्शन) :-
समाजातील दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या घटना दुर्घटना घडत असतात. त्यांचा शोध घेऊन बातमीच्या स्वरुपात वर्तमानपत्रातून जगासमोर सत्यता मांडणारा आरसा म्हणजेच पत्रकार असल्याचे प्रतिपादन डॉ. जगदीश शिंदे यांनी केले. ते गुरुवारी सोनपेठ तालुका पत्रकार संघाचे कार्यालयात बोलत होते.ओंकार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.जगदीश शिंदे यांनी सोमवारी सोनपेठ येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात भेट घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांचें स्वागत बाबासाहेब गर्जे यांनी केले तर त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिवाळी भेट म्हणून मिठाई व प्रत्येकी एक घड्याळ भेट दिली.
यावेळी पुढे बोलताना डॉ. शिंदे यांनी सांगितले की, पत्रकार हा निस्वार्थी पणे समाजातील दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचा वेध घेऊन वर्तमान पत्राच्या माध्यमातून आमच्या समोर सत्यता मांडत असतो. आजच्या काळात पत्रकारांना वर्तमान पत्राच्या माध्यमातून कुठलेही मानधन दिल्या जात नसल्यामुळे पत्रकारांना आपली पत्रकारिता करत असताना वेगवेगळे व्यवसाय करणे उपयुक्त ठरेल अन्यथा केवळ पत्रकारितेवर अवलंबून राहिल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पाथरी येथील भगवानराव ढवळशंकर यांच्या सह सोनपेठ तालुक्यातील विविध वर्तमानपत्राचे पत्रकार उपस्थित होते.

No comments:
Post a Comment