Tuesday, November 23, 2021

जीवघेणा सोनपेठ रस्ता

जीवघेणा सोनपेठ रस्ता



रस्त्यामध्ये खड्डे आहेत 
का खड्ड्यात आहे रस्ता?
रस्त्यापायी प्रवाशांचा 
झाला की हो जीव सस्ता.

विकासापासून वंचित असं
सोनपेठच का राहिलं आहे?
तरीसुद्धा विकासाचं आम्ही
स्वप्न उद्याचं पाहिलं आहे. 

सोनपेठच्या विकासाला 
गती मिळणार आहे म्हणे?
तेच तेच प्रश्न रस्त्याचे
आज झाले आहेत जुने.

जीव मुठीत घेऊन सोनपेठकर
फक्त प्रतिक्षा करत आहे
खड्ड्यातून जीव वाचवतांना
रोजंच ईथे मरत आहे. 

झोपलेल्या प्रशासनाला 
सांगा कधी येणार कीव?
जीवघेणा सोनपेठ रस्ता 
आणखी किती घेणार जीव?

सांगा कधी थांबेल हो 
मृत्यूचे हे जीवघेणे सत्र?
कितीवेळा लिहू सांगा 
अंध प्रशासनाला पत्र?

✍🏻ऋषिकेश बालासाहेब सुरवसे 
संभाजी नगर, सोनपेठ जि.परभणी.
मो.८४११९४७९९६.

No comments:

Post a Comment