बहुचर्चित "जयंती" हा चित्रपट श्री चिञपटगृहात परळीकरांनी पहावा - विकास वाघमारे
लाॅकडाऊनमुळे गेली दोन वर्षे बंद असलेले चिञपटगृहे पुन्हा एकदा सुरू झाली आहेत.रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज,आद्य क्रांतिकारक महात्मा फुले,विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित "जयंती" चिञपट परळी शहरातील श्री चिञमंदिरात लागला असून परळीकरांनी हा चित्रपट पहाणयाचे आवाहन पञकार व कलाकार विकास वाघमारे यांनी केले आहे.
लेखक दिग्दर्शक शैलेश नरवाडे, वैभव छाया,मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मिती,सहनिर्माते डाॅ.आनंद बनकर, कार्यकारी निर्माते वैभव छाया,समीर शिंदे,सूरज भानुशाली आहेत.या चिञपटात रूतूराज आणि अभिनेत्री तितिक्षा यांच्या सह मिलिंद शिंदे,किशोर कदम,पॅडी कांबळे, अमर उपाध्याय, अंजली जोगळेकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत.
हा चित्रपट श्री चित्रमंदिर मध्ये बारा ते तीन,तीन ते सहा आणि सहा ते नऊ तसेच नऊ ते बारा अशा चार शो मध्ये चालू आहे. सिनेमा टॅक्स फ्री असल्याने तिकीट दर कमी आहे.असे आवाहन विकास वाघमारे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment