Wednesday, November 17, 2021

शासकीय महाविद्यालय निर्मितीसाठी मंत्रालयातील हाय पावर कमिटीचे स्वागत खा.फौजिया खान व विजय गव्हाणे यांनी केले

शासकीय महाविद्यालय निर्मितीसाठी मंत्रालयातील हाय पावर कमिटीचे स्वागत खा.फौजिया खान व विजय गव्हाणे यांनी केले





परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत जिल्हा  सामान्य रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी हाय पॉवर कमिटी परभणी येथे आली होती.खा.फौजिया खान, विजय गव्हाणे, रामेश्वर शिंदे यांनी समिती सदस्यांचा सत्कार करून चर्चा केली.
या कमिटीमध्ये  औरंगाबाद येथील शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ.काननबाला येळीकर, डॉ.अजय चंदनवाले (सहसंचालक वैद्यकीय शिक्षण संचनालय मुंबई), अंबाजोगाई आणि यवतमाळ येथील शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.शिवाजी सुक्रे  मंत्रालयातील आरोग्य सचिवांचे कक्ष अधिकारी डॉ. वाघमारे, डॉ. चिन्मयानंद यांचा समावेश होता  या कमिटीने जिल्हा सामान्य रुग्णालयाबरोबरच परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी येथील उड्डाणपुला जवळील जागा तसेच ब्राह्मणगाव येथील जागा  जिल्हाधिकारी  आंचल गोयल   यांनी सुचवल्याप्रमाणे पाहणी करण्यात आली. ती जागा अतिशय योग्य असल्याबाबतचे मत या कमिटीने व्यक्त केले. तसेच परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अद्यावत करण्यासाठी येथे असणाऱ्या सुविधा व आवश्यक असणाऱ्या सुविधा याबाबत सविस्तर माहिती घेतली आणि लवकरच  येथे उपलब्ध असलेल्या सुविधेमुळे महाराष्ट्रात अद्ययावत आणि चांगल्या दर्जाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  येथे सुरू होईल असे मत कमिटीतील सर्व सदस्यांनी व्यक्त केले.परभणी येथे सर्व सुविधांनी युक्त असे  अद्यावत जिल्हा सामान्य रूग्णालय उपलब्ध करून दिल्याबद्दल कमिटीने माजी मंत्री खासदार फौजिया खान यांचाही आवर्जून उल्लेख केला.तसेच परभणीकर संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन करून परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळवून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी आमदार विजय गव्हाणे, खासदार फौजिया खान,रामेश्वर शिंदे आदींनी कामिटीतील सर्व सदस्यांचा यथोचित सत्कार केला.

No comments:

Post a Comment