फेसबुक व्दारे मैत्री करुन आर्थिक फसवणुक करणारा आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीचा साथिदार जेरबंद
ठाणे / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
पोलीस ठाणे सिडको येथे गुरन 805/2021 कलम 420, 34 भादंवि सह कलम 66(C), 66 (D) IT Act माहिती तंत्रज्ञान कायदा प्रमाणे दाखल आहे. यातिल महिला फिर्यादिने तक्रार दिली होती कि आरोपीने फेसबुकव्दारे फिर्यादीसोबत मैत्री करून जर्मनी मधुन बोलत आहे असे सांगुन विश्वास बसण्यासाठी महागडे गिफ्ट पाठवल्याचे भासवुन फिर्यादी सोबत जवळिकता साधली व फिर्यादी कडून वेळोवेळी रक्कम भरण्यास भाग पाडुन फिर्यादीची एकुण 21,50,355/- रुपयाची आर्थिक फसवणुक केली होती.सदर गुन्हयाचा तपास क्लिष्ट व गुंतागुंतीचा असल्याने सदर गुन्हा मा.पोलीस आयुक्त यांनी सायबर पोस्टे येथे वर्ग केला, सदर गुन्हा सायबर पोस्टे येथे वर्ग झाल्यावर सायबर पोलीस ठाणे येथुन तांत्रिक विश्लेषन, नियोजन, परिश्रम व प्रयत्नाची शिकस्त करुन आरोपिच्या शोधाकरिता व तपासकामी दिल्ली येथे पथक रवाना झाले. सदर पथकाने गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे आशिषकुमार भगवानदिप मौर्य वय 21 वर्षे धंदा बेरोजगार, मुळ रा. ग्राम डेवरिया राऊत, पो. भोसला, तहसिल हरैय्या, जिल्हा बस्ती, उत्तरप्रदेश-272130 ह.मु. व्दारा चंदन गौरीशंकर साहू, मकान नं 720, बी ब्लॉक, कॅम्प. 04 ज्वालापुरी, नागलोई पश्चिम दिल्ली येथे सापळा रचला,पथकाची चाहूल लागताच सदर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीतास पथकाने 2 किमी पाठलाग करुन आरोपीस शिताफिने जेरबंद केले आहे आरोपीस ताब्यात घेऊन त्यास विचारपुस केली असता, तसेच घरझडती घेतली असता घरामध्ये एक मोबाईल हॅन्डसेड व त्यातिल दोन सिमकार्ड वेगवेगळया बँकेचे व व्यक्तिच्या नावाचे 40-ATM डेबिट कार्ड, 26 पासबुक 74 चेकबुक, व 04- हिशेब ठेवण्याची नोटबुक तसेच आरोपिच्या अंगझडतीमध्ये पॅनकार्ड, आधारकार्ड, 03-मोबाईल हैंडसेट व त्यातिल 06 सिमकार्ड, 02-डेबिट कार्ड अशा वस्तु मिळुन आल्याने त्या गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपी हा अशा प्रकारे त्याचे इतर विदेशातील साथीदारांसह संपूर्ण देशभरातील अनेक नागरिकांना नियोजनबध्दरित्या कट रचुन फसवणुक करत असे, तसेच यात विदेशी नागरीक असण्याची शक्यता तपासात निष्पन्न होण्याची शक्यता आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि श्री गौतम पातारे करत आहेत.सदरची कामगिरी मा पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त श्रीमती अर्पणा गिते, सहा पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री गौतम पातारे, सपोनि / अमोल सातोदकर, पोउपनि राहुल चव्हाण, पोउपनि वारे, पोउपनि सविता तांबे, पोह/खरे, पोह/साबळे, पोअं/गोकुळ " कुतरवाडे, अमोल सोनटक्के, रवि पोळ, सुशांत शेळके, मन्सुर शहा, विजय घुगे, वैभव वाघचौरे, राम काकडे, रियाज शेख, शिल्पा तेलोरे, संगिता दुबे, सोनाली वडनेरे व सायबर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी केली.विशाल सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांनी माहिती दिली.

No comments:
Post a Comment