Tuesday, November 23, 2021

जीवघेणा सोनपेठ रस्ता

जीवघेणा सोनपेठ रस्ता



रस्त्यामध्ये खड्डे आहेत 
का खड्ड्यात आहे रस्ता?
रस्त्यापायी प्रवाशांचा 
झाला की हो जीव सस्ता.

विकासापासून वंचित असं
सोनपेठच का राहिलं आहे?
तरीसुद्धा विकासाचं आम्ही
स्वप्न उद्याचं पाहिलं आहे. 

सोनपेठच्या विकासाला 
गती मिळणार आहे म्हणे?
तेच तेच प्रश्न रस्त्याचे
आज झाले आहेत जुने.

जीव मुठीत घेऊन सोनपेठकर
फक्त प्रतिक्षा करत आहे
खड्ड्यातून जीव वाचवतांना
रोजंच ईथे मरत आहे. 

झोपलेल्या प्रशासनाला 
सांगा कधी येणार कीव?
जीवघेणा सोनपेठ रस्ता 
आणखी किती घेणार जीव?

सांगा कधी थांबेल हो 
मृत्यूचे हे जीवघेणे सत्र?
कितीवेळा लिहू सांगा 
अंध प्रशासनाला पत्र?

✍🏻ऋषिकेश बालासाहेब सुरवसे 
संभाजी नगर, सोनपेठ जि.परभणी.
मो.८४११९४७९९६.

Monday, November 22, 2021

सर्व धर्मीय दिव्यांग वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन दिव्यांग बंधु व भगीनींनी लाभ घ्यावा

सर्व धर्मीय दिव्यांग वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन दिव्यांग बंधु व भगीनींनी लाभ घ्यावा



पाथरी / सोनपेठ (दर्शन) :-

पाथरी शहरात प्रथमच प्रहार अपंग दिव्यांग क्रांती आंदोलन (महाराष्ट्र राज्य व ओंकार सेवाभावी संस्था पाथरी-यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनानिमित सर्व धर्मीय दिव्यांग वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व दिव्यांग बांधवांना सुचित करण्यात येते की, आपण आपली नाव नोंदणी करून कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा,प्रमुख पाहुणे मा. ना.बच्चुभाऊ कडु (संस्थापक अध्यक्ष-प्रहार महिला कल्याण विकास क्षेत्र मा.शै.मा.प्रवर्ग वि.जा.भ.ज.आणि कल्याण) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.जगदिश शिंदे,प्रमुख उपस्थिती श्रीमती सुमन मोरे,मा.सुहास कोरेगावे,मा.संतोष राजगुरु सर,मा.बापुराव काने,मा.रामदास खोत,मा. सचिन परळकर,मा.शिवलिंग बोधणे,मा.मुकुंद खरात,मा.रहिम शेख,मा.शाहूराव गवारे,मा.विष्णु वैरागड,मा. शिवाजीराव स्वप्ने आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत,दिनांक ०३/१२/२०२१,वार शुक्रवार वेळ सकाळी ०९.०० ते सायं. ०५.०० वाजता.स्थळ महेबुब शहा फंक्शन हॉल, साई रोड, पाथरी,ता. पाथरी जि. परभणी नाव नोंदणी ठिकाण : ओमकार फोटो स्टुडिओ, पंचायत समिती कॉम्प्लेक्स, पाथरी, संपर्क: मो.9421384635.मो.9579068887. मो. 8482814343 7722076806.मो. 9145630661. मो.8530065617 मो. 9411841161 मो. 9552808071.तरी या सर्व धर्मीय दिव्यांग वधु-वर परिचय मेळाव्याचा दिव्यांग बंधु व भगीनींनी लाभ घ्यावा असे आवाहन दिपकभाऊ खुडे प्रहार अपंग दिव्यांग क्रांती आंदोलन तालुका प्रमुख यांनी केले आहे.

Wednesday, November 17, 2021

शासकीय महाविद्यालय निर्मितीसाठी मंत्रालयातील हाय पावर कमिटीचे स्वागत खा.फौजिया खान व विजय गव्हाणे यांनी केले

शासकीय महाविद्यालय निर्मितीसाठी मंत्रालयातील हाय पावर कमिटीचे स्वागत खा.फौजिया खान व विजय गव्हाणे यांनी केले





परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत जिल्हा  सामान्य रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी हाय पॉवर कमिटी परभणी येथे आली होती.खा.फौजिया खान, विजय गव्हाणे, रामेश्वर शिंदे यांनी समिती सदस्यांचा सत्कार करून चर्चा केली.
या कमिटीमध्ये  औरंगाबाद येथील शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ.काननबाला येळीकर, डॉ.अजय चंदनवाले (सहसंचालक वैद्यकीय शिक्षण संचनालय मुंबई), अंबाजोगाई आणि यवतमाळ येथील शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.शिवाजी सुक्रे  मंत्रालयातील आरोग्य सचिवांचे कक्ष अधिकारी डॉ. वाघमारे, डॉ. चिन्मयानंद यांचा समावेश होता  या कमिटीने जिल्हा सामान्य रुग्णालयाबरोबरच परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी येथील उड्डाणपुला जवळील जागा तसेच ब्राह्मणगाव येथील जागा  जिल्हाधिकारी  आंचल गोयल   यांनी सुचवल्याप्रमाणे पाहणी करण्यात आली. ती जागा अतिशय योग्य असल्याबाबतचे मत या कमिटीने व्यक्त केले. तसेच परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अद्यावत करण्यासाठी येथे असणाऱ्या सुविधा व आवश्यक असणाऱ्या सुविधा याबाबत सविस्तर माहिती घेतली आणि लवकरच  येथे उपलब्ध असलेल्या सुविधेमुळे महाराष्ट्रात अद्ययावत आणि चांगल्या दर्जाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  येथे सुरू होईल असे मत कमिटीतील सर्व सदस्यांनी व्यक्त केले.परभणी येथे सर्व सुविधांनी युक्त असे  अद्यावत जिल्हा सामान्य रूग्णालय उपलब्ध करून दिल्याबद्दल कमिटीने माजी मंत्री खासदार फौजिया खान यांचाही आवर्जून उल्लेख केला.तसेच परभणीकर संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन करून परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळवून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी आमदार विजय गव्हाणे, खासदार फौजिया खान,रामेश्वर शिंदे आदींनी कामिटीतील सर्व सदस्यांचा यथोचित सत्कार केला.

Friday, November 12, 2021

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी नांदेड येथून शासकीय वाहनाने जुना मोंढा पूर्णा येथे सकाळी 11.30 वाजता आगमन व राखीव. सकाळी 11.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे सुशोभिकरणाचे लोकार्पण (स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज चौक पूर्णा). दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे लोकार्पण (स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा) दुपारी 12.30 वाजता नगर परिषद पूर्णा यांच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण (स्थळ- रेल्वे स्टेशन रोड, पूर्णा) दुपारी 1:00 वाजता छत्रपती राजे संभाजी व्यापारी संकुल यांचे लोकार्पण (स्थळ- छत्रपती संभाजी महाराज चौक, पूर्णा) दुपारी 1.05 वाजता मुख्य रस्त्याचा लोकार्पण सोहळा, दुपारी 1.15 वाजता बुध्द विहार येथे भेट (स्थळ- बुध्द विहार पूर्णा) दुपारी 1.30 वाजता पूर्णा येथून मोटारीने परभणीकडे रवाना,  दुपारी 2.05 वाजता राजे संभाजी निवासी व्यायामशाळा लोकार्पण (स्थळ- रामकृष्ण नगर, वसमत रोड परभणी) दुपारी 2.20 वाजता रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा (स्थळ- खासदार श्री. संजय जाधव यांचे कार्यालय) दुपारी 2.35 वाजता शिवसेना कार्यकर्ता मेळावा (स्थळ- अक्षदा मंगल कार्यालय, परभणी) दुपारी 3.15 वाजता खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी राखीव (स्थळ- बाळासाहेब ठाकरे नगर, परभणी) सायंकाळी 4.00 वाजता परभणी महानगरपालिकेतर्फे स्वागत समारंभ,  सायंकाळी 4.25 वाजता आमदार सुरेश वरपुडकर यांचे निवासस्थानी राखीव, सायंकाळी 5.45 वाजता परभणी  येथून शासकीय वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील.
                  

बहुचर्चित "जयंती" हा चित्रपट श्री चिञपटगृहात परळीकरांनी पहावा - विकास वाघमारे

बहुचर्चित "जयंती" हा चित्रपट श्री चिञपटगृहात परळीकरांनी पहावा  - विकास वाघमारे

परळी / सोनपेठ (दर्शन) :-
लाॅकडाऊनमुळे गेली दोन वर्षे बंद असलेले चिञपटगृहे पुन्हा एकदा सुरू झाली आहेत.रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज,आद्य क्रांतिकारक महात्मा फुले,विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित "जयंती" चिञपट परळी शहरातील श्री चिञमंदिरात लागला असून परळीकरांनी हा चित्रपट पहाणयाचे आवाहन पञकार व कलाकार विकास वाघमारे यांनी केले आहे. 
        लेखक दिग्दर्शक शैलेश नरवाडे, वैभव छाया,मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मिती,सहनिर्माते डाॅ.आनंद बनकर, कार्यकारी निर्माते वैभव छाया,समीर शिंदे,सूरज भानुशाली आहेत.या चिञपटात रूतूराज आणि अभिनेत्री तितिक्षा यांच्या सह मिलिंद शिंदे,किशोर कदम,पॅडी कांबळे, अमर उपाध्याय, अंजली जोगळेकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. 
   हा चित्रपट श्री चित्रमंदिर मध्ये बारा ते तीन,तीन ते सहा आणि सहा ते नऊ  तसेच नऊ ते बारा अशा चार शो मध्ये चालू आहे. सिनेमा टॅक्स फ्री असल्याने तिकीट दर कमी आहे.असे आवाहन विकास वाघमारे यांनी केले आहे.

Saturday, November 6, 2021

पत्रकार म्हणजे सत्याचा आरसा - डॉ. जगदीश शिंदे

पत्रकार म्हणजे सत्याचा आरसा - डॉ. जगदीश शिंदे



सोनपेठ (दर्शन) :-

समाजातील दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या घटना दुर्घटना घडत असतात. त्यांचा शोध घेऊन बातमीच्या स्वरुपात वर्तमानपत्रातून जगासमोर सत्यता मांडणारा आरसा म्हणजेच पत्रकार असल्याचे प्रतिपादन डॉ. जगदीश शिंदे यांनी केले. ते गुरुवारी सोनपेठ तालुका पत्रकार संघाचे कार्यालयात बोलत होते.ओंकार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.जगदीश शिंदे यांनी सोमवारी सोनपेठ येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात भेट घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांचें स्वागत बाबासाहेब गर्जे यांनी केले तर त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिवाळी भेट म्हणून मिठाई व प्रत्येकी एक घड्याळ भेट दिली.
यावेळी पुढे बोलताना डॉ. शिंदे यांनी सांगितले की, पत्रकार हा निस्वार्थी पणे समाजातील दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचा वेध घेऊन वर्तमान पत्राच्या माध्यमातून आमच्या समोर सत्यता मांडत असतो. आजच्या काळात पत्रकारांना वर्तमान पत्राच्या माध्यमातून कुठलेही मानधन दिल्या जात नसल्यामुळे पत्रकारांना आपली पत्रकारिता करत असताना वेगवेगळे व्यवसाय करणे उपयुक्त ठरेल अन्यथा केवळ पत्रकारितेवर अवलंबून राहिल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पाथरी येथील भगवानराव ढवळशंकर यांच्या सह सोनपेठ तालुक्यातील विविध वर्तमानपत्राचे पत्रकार उपस्थित होते.

Wednesday, November 3, 2021

फेसबुक व्दारे मैत्री करुन आर्थिक फसवणुक करणारा आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीचा साथिदार जेरबंद

फेसबुक व्दारे मैत्री करुन आर्थिक फसवणुक करणारा आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीचा साथिदार जेरबंद 



ठाणे / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

पोलीस ठाणे सिडको येथे गुरन 805/2021 कलम 420, 34 भादंवि सह कलम 66(C), 66 (D) IT Act माहिती तंत्रज्ञान कायदा प्रमाणे दाखल आहे. यातिल महिला फिर्यादिने तक्रार दिली होती कि आरोपीने फेसबुकव्दारे फिर्यादीसोबत मैत्री करून जर्मनी मधुन बोलत आहे असे सांगुन विश्वास बसण्यासाठी महागडे गिफ्ट पाठवल्याचे भासवुन फिर्यादी सोबत जवळिकता साधली व फिर्यादी कडून वेळोवेळी रक्कम भरण्यास भाग पाडुन फिर्यादीची एकुण 21,50,355/- रुपयाची आर्थिक फसवणुक केली होती.सदर गुन्हयाचा तपास क्लिष्ट व गुंतागुंतीचा असल्याने सदर गुन्हा मा.पोलीस आयुक्त यांनी सायबर पोस्टे येथे वर्ग केला, सदर गुन्हा सायबर पोस्टे येथे वर्ग झाल्यावर सायबर पोलीस ठाणे येथुन तांत्रिक विश्लेषन, नियोजन, परिश्रम व प्रयत्नाची शिकस्त करुन आरोपिच्या शोधाकरिता व तपासकामी दिल्ली येथे पथक रवाना झाले. सदर पथकाने गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे आशिषकुमार भगवानदिप मौर्य वय 21 वर्षे धंदा बेरोजगार, मुळ रा. ग्राम डेवरिया राऊत, पो. भोसला, तहसिल हरैय्या, जिल्हा बस्ती, उत्तरप्रदेश-272130 ह.मु. व्दारा चंदन गौरीशंकर साहू, मकान नं 720, बी ब्लॉक, कॅम्प. 04 ज्वालापुरी, नागलोई पश्चिम दिल्ली येथे सापळा रचला,पथकाची चाहूल लागताच सदर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीतास पथकाने 2 किमी पाठलाग करुन आरोपीस शिताफिने जेरबंद केले आहे आरोपीस ताब्यात घेऊन त्यास विचारपुस केली असता, तसेच घरझडती घेतली असता घरामध्ये एक मोबाईल हॅन्डसेड व त्यातिल दोन सिमकार्ड वेगवेगळया बँकेचे व व्यक्तिच्या नावाचे 40-ATM डेबिट कार्ड, 26 पासबुक 74 चेकबुक, व 04- हिशेब ठेवण्याची नोटबुक तसेच आरोपिच्या अंगझडतीमध्ये पॅनकार्ड, आधारकार्ड, 03-मोबाईल हैंडसेट व त्यातिल 06 सिमकार्ड, 02-डेबिट कार्ड अशा वस्तु मिळुन आल्याने त्या गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपी हा अशा प्रकारे त्याचे इतर विदेशातील साथीदारांसह संपूर्ण देशभरातील अनेक नागरिकांना नियोजनबध्दरित्या कट रचुन फसवणुक करत असे, तसेच यात विदेशी नागरीक असण्याची शक्यता तपासात निष्पन्न होण्याची शक्यता आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि श्री गौतम पातारे करत आहेत.सदरची कामगिरी मा पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त श्रीमती अर्पणा गिते, सहा पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री गौतम पातारे, सपोनि / अमोल सातोदकर, पोउपनि राहुल चव्हाण, पोउपनि वारे, पोउपनि सविता तांबे, पोह/खरे, पोह/साबळे, पोअं/गोकुळ " कुतरवाडे, अमोल सोनटक्के, रवि पोळ, सुशांत शेळके, मन्सुर शहा, विजय घुगे, वैभव वाघचौरे, राम काकडे, रियाज शेख, शिल्पा तेलोरे, संगिता दुबे, सोनाली वडनेरे व सायबर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी केली.विशाल सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांनी माहिती दिली.