Thursday, June 8, 2023

बीड विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांचे अक्षम्य दुर्लक्ष,सोनपेठ मार्गे लांब पल्याच्या बस सुरू करण्याची मागणी

बीड विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांचे अक्षम्य दुर्लक्ष,सोनपेठ मार्गे लांब पल्याच्या बस सुरू करण्याची मागणी

सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील पत्रकार बांधवांनी वेळोवेळी दूरध्वनी द्वारे तसेच वेळोवेळी निवेदनासह बीड विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांना सूचना करूनही अक्षम्य दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. सोनपेठ शहरे परभणी जिल्ह्याच्या व बीड जिल्ह्याच्या टोकावरील शहर असल्याकारणाने तसेच रहदारीसाठी बीड जिल्ह्यातून एसटी महामंडळाच्या वतीने नेहमी सापत्नीक वागणूक मिळत असते, लॉकडाऊन च्या वेळी सोनपेठ शहरात परळी आगाराची बस रात्री आठ वाजता मुक्कामी बंद केली ती बस सर्व व्यापारी वर्ग व मजूर वर्ग यासाठी अत्यावश्यक असून ती पुन्हा सुरू करण्यासाठी सततची मागणी होत आहे, तसेच बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळात प्रथम स्थानी अशी नुकतीच बातमी वाचली परंतु सोनपेठ मार्गे लांब पल्ल्याच्या गाड्या बीड परभणी, बीड नांदेड,बीड हिंगोली,बीड वसमत तसेच परळी आगारातून परळी बुलढाणा, अंबाजोगाई आगारातून अंबाजोगाई मेहकर, अंबाजोगाई जालना, तसेच धारूर आगारातून धारूर परभणी, धारूर सोनपेठ, धारूर कंधार अशा जास्तीत जास्त बस सोडून तात्काळ सुरू करण्यात याव्यात बीड विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी मराठी पत्रकार परिषद तालुका शाखा सोनपेठ पत्रकार बांधवांनी दिलेल्या निवेदनाच्या प्रती सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ लांब पल्ल्याच्या बस सुरू कराव्यात तसेच परळी आगाराची रात्री आठची मुक्कामी बस सुरू करण्यात यावी अशी मागणी तमाम जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. मराठी पत्रकार परिषद तालुका शाखा सोनपेठ च्या वतीने या निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देऊन तात्काळ आपण बीड विभागीय नियंत्रण अजयकुमार मोरे यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना कराव्यात अशी विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment