गुरुपोर्णिमा सोहळा २०२३ श्री गुरु नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ
सोनपेठ (दर्शन) :-
सर्व भाविक सद् भक्तांना कळवण्यास आनंद होतो की सोमवार दि.०३/०७/२०२३ रोजी गुरुपोर्णिमा निमीत्य तपस्वी ष.ब्र.श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ यांच्या गुरुपुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.तरी सर्व शिष्य,भाविक भक्तमंडळींनी या दिव्य सोहळ्यास उपस्थित राहुन सद् गुरुकृपेचा लाभ घ्यावा.कार्यक्रम-सोहळा स्थान श्री गुरु नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे १} सकाळी ७ ते ९ सदगुरू श्री नंदिकेश्वर महाराज संजीवनी समाधिस रुद्राभिषेक , २} सकाळी ९:३० ते १२:१५ गुरुवर्य श्री नंदिकेश्वर महास्वामीजी यांच्या सानिध्यात संगीतमय सामुहिक इष्टलिंग महापुजा, ३} इष्टलिंग महापुजा नंतर लगेच सद्गुरु चे आशिर्वचन व जिवाची जन्म-मरण व्यथा चुकविणारा प्रसाद गुरुपादतीर्थ व दर्शन , ४} दुपारी ठीक १:३० ते ४ पर्य॔त पेठशिवणी शिष्य-भक्त गणा च्या वतीने महाप्रसाद गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेता श्रीस्वामीचा नाश होई षड्रिपूचा प्रमाणे भव्य गुरुपोर्णिमा कार्यक्रम सोहळा संपन्न होईल,आयोजक सर्व शिष्य सद् भक्तगण श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ.

No comments:
Post a Comment