Thursday, June 15, 2023

सोनपेठ शहरातील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राम भरोसे

सोनपेठ शहरातील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राम भरोसे 


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरात हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू,मा.ना.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यातील ३४२ ठिकाणी दूरद्रष्यप्रणाली द्वारे उदघाटन केल्या नंतर सोनपेठ शहरात एक हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे "आपला दवाखाना" सुरुवात करण्यात आली व या ठिकाणी आरोग्य अधिकारी डॉ श्रीमती इर्शाद सुलतान एम. बी. बी. एस. व परिचारीका साधना थोरात यांची शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली परंतु नव्याचे नवू दिवसाप्रमाणे काही दिवसांपूर्वी साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांनी प्रत्यक्ष लोकांच्या तक्रारी ची दखलघेत दुपारी तीन वाजता भेट दिली असता केवळ परिचारीका साधना थोरात याच एकट्या रुगनांची तपासणी व औषधोपचार करताना दिसुन आल्या यांचा पुरावा म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार यांना वाट्सअप वरती फोटो पाठवून सुचनाही करण्यात आली, परंतु आता पुन्हा स्थानिक जय भवानी मित्र मंडळाचे सदस्य यांनी सोशल मीडिया फेसबुक वर एक फोटो सोनपेठ शहरातील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचा फोटो सायंकाळी ठिक 7.08 वाजता काढून पाठवला आहे या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांची वेळ दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत असताना हा कधी सायंकाळी 6 वाजता तर कधी 7 वाजता बंद होत आहे, म्हणून सोनपेठ शहरातील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राम भरोसे असे म्हटले जाते आहे.या गंभीर बाबीकडे लवकरात लवकर वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन सुचित करावे की दुपारी 2 (दोन) वाजता आपला दवाखाना उघडून रात्री 10 (दहा) वाजता बंद केल्यावर परिसरात शहरातील सर्व गरजवंताला वेळेवर सेवा भेटेल आपन सायंकाळी 7 (सात) वाजता बंद केला व शहरातील गंभीर रुग्ण ज्याला प्राथमिक ईलाजाची अत्यंत आवश्यकता आहे असा आला व बंद दवाखाना पाहून तो प्राथमिक ईलाजापासुन वंचित राहीला व जीव गमावून बसला तर त्याला जबाबदार कोण ? राहिलं असा सवाल परिसरातील तसेच शहरातील नागरिकांना पडलेला दिसुन येतो आहे.जनतेतुन या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांची वेळ चोवीस तास करुन आणखी दोन डाॅक्टर्स व दोन परिचारीका यांच्या तात्काळ नियुक्ती करुन वेळ वाढविण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment