गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा- भाई तुषार गोळेगावकर
सोनपेठ (दर्शन) :-
स्पर्धेच्या काळात ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत श्री बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाई तुषार भैय्या गोळेगावकर यांनी तालुक्यातील मौजे लासीना येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात आज दि १० जुन रोजी मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक मंडळाचे अध्यक्ष पंडीतराव कदम हे होते तर उद्घाटक म्हणून श्री बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाई तुषार भैय्या गोळेगावकर हे होते तर व्यासपीठावर भागवतराव परांडे,व्यंकटी कदम, अनंतराव कदम, शिवाजीराव कदम, विठ्ठल कदम, सोपान परांडे, मुख्याध्यापक अंकुश परांडे, मुख्याध्यापक दिनकर देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना तुषार भैय्या गोळेगावकर म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपल्या संस्थेच्या वतीने खेड्यापाड्यात शाळा सुरू केल्या आहेत. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेस लक्ष देऊन शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे.त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना व शिष्यवृत्ती योजना लाभ दिला जातो ही अतिशय अभिमानाची बाब आहे. लासीना येथे शाळेसाठी आगामी शैक्षणिक वर्षात इमारत बांधकाम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच येत्या काळात वर्ग निहाय विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मत शेवटी बोलताना व्यक्त केले आहे. कार्यक्रमाच्या प्रस्ताविक परांडे सरांना केले आहे. यावेळी दिनकर देशपांडे विठ्ठल कदम, शिवाजी कदम, यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भगवान पैठणे यांनी तर आभार प्रदर्शन सुग्रीव दाढेल यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंजाजी डुकरे, सुभाष मकने दत्ता परतवाड, बळीराम कदम, देवानंद निरस, रामचंद्र काकडे, अनिल कुंडगीर आदींनी परिश्रम घेतले आहे.



No comments:
Post a Comment