Wednesday, June 28, 2023

गुरुपोर्णिमा सोहळा २०२३ श्री गुरु नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ

गुरुपोर्णिमा सोहळा २०२३ श्री गुरु नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ


सोनपेठ (दर्शन) :-

सर्व भाविक सद् भक्तांना कळवण्यास आनंद होतो की सोमवार दि.०३/०७/२०२३  रोजी गुरुपोर्णिमा निमीत्य तपस्वी ष.ब्र.श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ यांच्या गुरुपुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.तरी सर्व शिष्य,भाविक भक्तमंडळींनी या दिव्य सोहळ्यास उपस्थित राहुन सद् गुरुकृपेचा लाभ घ्यावा.कार्यक्रम-सोहळा स्थान श्री गुरु नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे १} सकाळी ७ ते ९ सदगुरू श्री नंदिकेश्वर महाराज संजीवनी  समाधिस रुद्राभिषेक , २} सकाळी ९:३० ते १२:१५ गुरुवर्य श्री नंदिकेश्वर महास्वामीजी यांच्या सानिध्यात संगीतमय सामुहिक इष्टलिंग महापुजा, ३} इष्टलिंग महापुजा नंतर लगेच सद्गुरु चे आशिर्वचन व जिवाची जन्म-मरण व्यथा चुकविणारा प्रसाद गुरुपादतीर्थ व दर्शन , ४} दुपारी ठीक १:३० ते ४ पर्य॔त  पेठशिवणी शिष्य-भक्त गणा च्या वतीने महाप्रसाद गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेता श्रीस्वामीचा नाश होई षड्रिपूचा प्रमाणे भव्य गुरुपोर्णिमा कार्यक्रम सोहळा संपन्न होईल,आयोजक सर्व शिष्य सद् भक्तगण श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ.

Tuesday, June 27, 2023

मराठा सेवा संघ आढावा बैठकीत विविध कक्षाच्या कार्यकारीणी जाहीर ; मराठा सेवा संघच्या परळी तालुकाध्यक्षपदी अंकुश जाधव तर शहराध्यक्षपदी संदीप काळे यांची निवड

मराठा सेवा संघ आढावा बैठकीत विविध कक्षाच्या कार्यकारीणी जाहीर ; मराठा सेवा संघच्या परळी तालुकाध्यक्षपदी अंकुश जाधव तर शहराध्यक्षपदी संदीप काळे यांची निवड



परळी / सोनपेठ (दर्शन)

परळी वैद्यनाथ येथे दि.२५/०६/२३ रोजी मराठा सेवा संघ आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी अशोक ठाकरे जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ,प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघ प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे सर तर प्रमुख उपस्थिती जागृती मल्टी स्टेटचे चेअरमन गंगाधर शेळके सर,जिल्हा कार्याध्यक्ष संजय नाना देशमुख,जिल्हा सचिव सचिन शेंडगे हे होते.सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेऊन उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन शिवस्वागत करण्यात आले.यावेळी अंकुश जाधव यांनी आपल्या प्रस्तावनेत मराठा सेवा संघांचे विचार प्रत्येक घरोघरी घेऊन जाण्यासाठी गाव तिथे शाखा हा संकल्प व्यक्त करुन येणार्या काळात महाराष्ट्र राज्यात परळी वैद्यनाथ तालुका सभासद व विविध कार्यक्रम घेण्यास सर्वप्रथम राहील असा मनोदय व्यक्त केला तर मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष अशोकजी ठाकरे यांनी आपल्या मनोगतात मराठा सेवा संघाचे सभासद,अजिवन सभासद,जिजाऊ सृष्टी निधी,याबाबत केंद्रीय कार्यकारीतील विविध ठरावाची माहीती देऊन परळी वैद्यनाथ तालुक्यातुन जास्तीतजास्त निधी व सभासद देण्याचे लक्ष दिले.जिल्हा कार्याध्यक्ष संजय नाना देशमुख यांनी आपल्या मनोगतात सर्वात जास्त सभासद आणि सर्वात जास्त जिजाऊ सृष्टीत निधी देण्याचे अश्वासन देऊन येणार्या काळात मराठा सेवा संघाचे शिव-फुले-शाहु-आबेंडकर-खेडेकर यांचे विचार सर्वसामान्याच्या घरोघर पोहचवु असा संकल्प व्यक्त केला.यावेळी संजय सुरवसे सरांनी म.से.सं तालुका व शहरचा कार्यआहवाल सादर करुन म.से.संघाचे विचार शहर व तालुका घरोघर पोहविण्याच सदैव तत्पर राहु असे अभिवचन दिले.मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक जागृती मल्टीस्टेट चे चेअरमन आदरनिय-सम्मानिय शिवश्री प्रा.गंगाधर शेळके सरांनी बहुजन समाजानी मराठा सेवा संघाचे शिव-फुले-शाहु-आबेंडकर यांचे विचार अंगिकारणे काळाची गरज असुन वेळोवेळी मराठा सेवा संघा कार्यक्रम घेऊन बहुजन समाजातील नवयुकांना प्रबोधन चळवळीत आणने खुप आवश्यक आहे असे आव्हान केले.तर मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रमुख पाहुणे आदरनिय-सम्मानिय शिवश्री अर्जुन तनपुरे सरांनी आपल्या मार्गदर्शन पर मनोगतात आजच्या काळात तरुणांनी मराठा सेवा संघाच्या चळवळी आणने व चळवळीचे महत्त्व समझविण्यासाठी मराठा सेवा संघाच्या कार्यशाळा घेणे आवश्यक असुन मराठा सेवा संघ बहुजन समाजाचे प्रबोधन करण्याचे काम गेली अनेक वर्ष करतोय ही खुप समाधानाची बाब असुन येणारा काळात तरुणाना फक्त मराठा सेवा संघाच्या शिव-फुले-शाहु-आबेंडकर-खेडेकर यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम करतील.परळी वैद्यनाथ तालुक्यात मराठा सेवा संघ चांदा पासुन ते बांद्या प्रयत्न पोचविण्या काम स्थानिक पदअधिकारी यांच्या वर  सोपवित असल्याचे जवाबदारीपुर्वक आदेश दिला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष अशोक ठाकरे यांनी मराठा सेवा संघच्या विविध कक्षाच्या कार्यकारी जाहीर केल्या त्यामध्ये पदमश्री विठ्ठलराव विखे कृषी परीषद जिल्हा अध्यक्षपदी- ईश्वर (जिजा) सोनवणे,मराठा सेवा संघ तालुका अध्यक्षपदी-अंकुश जाधव,शहर अध्यक्षपदी-संदीप काळे,तालुका कार्याध्यक्षपदी-हनुमंत इंगळे,तालुका सचिवपदी-राजेश पवार,शहर उपाध्यक्षपदी- पि.एच.यादव ,सयाजी गायवाड न्यायदान कक्ष तालुका अध्यक्षपदी- अँड. प्रदीपजी गिराम,जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्षपदी- पुजाताई काळे,पदश्री विठ्ठलराव विखे कृषी परीषद तालुका अध्यक्षपदी-सुंदर आमले,विर भगत सिंह विघार्थी परीषद शहर अध्यक्षपदी- स्वप्ननिल वानखडे,तानुबाई ब्रिजे पञकार परीषद तालुका अध्यक्षपदी- श्रीराम लांडगे,शहर अध्यक्षपदी-अमोल सुर्यवंशी,जगदगुरु तुकोबा साहीत्य परीषद तालुका अध्यक्षपदी- केशव कुकडे,संगित सुर्य केशवराव भोसले क्रिडा व कला कक्ष तालुका अध्यक्षपदी-महेश होनमाने,शहर अध्यक्षपदी-दिनेश कदम,मराठा उघोग कक्ष तालुका अध्यक्षपदी-विठ्ठल साबळे,आदीची निवड करुन 
 सर्व पदअधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या बैठकीचे आभार इश्वर (जिजा) सोनवणे यांनी केले.यावेळी मराठा सेवा संघाच्या विविध कक्षाचे पदअधिकारी यामध्ये संजय सुरवसे सर,सेवकराम जाधव,देवराव लुगडे,रमाकांत शिंदे,यशवंत पवार,संभाजी आमले,राजेभाऊ काळे आदी उपस्थित होते.

सर्व नुतन पदाधिकारी यांचे साप्ताहिक सोनपेठ दर्शन परीवार तसेच संपादक किरण रमेश स्वामी यांच्या वतीने शिव अभिनंदन!!!!!


Sunday, June 25, 2023

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन




सोनपेठ (दर्शन) :-

भारतीय समाजसुधारक आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

Sunday, June 18, 2023

सखाराम बाळाभाऊ पवार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

सखाराम बाळाभाऊ पवार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन


सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरातील कदम गल्ली येथील सखाराम बाळाभाऊ पवार यांचे आज दिनांक 18 जून 2023 रविवार रोजी दुपारी 2.45 वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने दुखद निधन झाले यांचे वय 65 वर्ष होते यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,एक मुलगा अनिकेत पवार, सुन, जावाई व नातरुंड असा मोठा परिवार आहे, यांच्या पार्थिवावर अंत्यविधी उद्या दिनांक 19 जून 2023 सोमवार रोजी सकाळी ठीक 8 वाजता करण्यात येणार आहेत, सखाराम बाळाभाऊ पवार यांना साप्ताहिक सोनपेठ दर्शन परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच सर्व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Thursday, June 15, 2023

सोनपेठ शहरातील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राम भरोसे

सोनपेठ शहरातील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राम भरोसे 


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरात हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू,मा.ना.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यातील ३४२ ठिकाणी दूरद्रष्यप्रणाली द्वारे उदघाटन केल्या नंतर सोनपेठ शहरात एक हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे "आपला दवाखाना" सुरुवात करण्यात आली व या ठिकाणी आरोग्य अधिकारी डॉ श्रीमती इर्शाद सुलतान एम. बी. बी. एस. व परिचारीका साधना थोरात यांची शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली परंतु नव्याचे नवू दिवसाप्रमाणे काही दिवसांपूर्वी साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांनी प्रत्यक्ष लोकांच्या तक्रारी ची दखलघेत दुपारी तीन वाजता भेट दिली असता केवळ परिचारीका साधना थोरात याच एकट्या रुगनांची तपासणी व औषधोपचार करताना दिसुन आल्या यांचा पुरावा म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार यांना वाट्सअप वरती फोटो पाठवून सुचनाही करण्यात आली, परंतु आता पुन्हा स्थानिक जय भवानी मित्र मंडळाचे सदस्य यांनी सोशल मीडिया फेसबुक वर एक फोटो सोनपेठ शहरातील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचा फोटो सायंकाळी ठिक 7.08 वाजता काढून पाठवला आहे या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांची वेळ दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत असताना हा कधी सायंकाळी 6 वाजता तर कधी 7 वाजता बंद होत आहे, म्हणून सोनपेठ शहरातील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राम भरोसे असे म्हटले जाते आहे.या गंभीर बाबीकडे लवकरात लवकर वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन सुचित करावे की दुपारी 2 (दोन) वाजता आपला दवाखाना उघडून रात्री 10 (दहा) वाजता बंद केल्यावर परिसरात शहरातील सर्व गरजवंताला वेळेवर सेवा भेटेल आपन सायंकाळी 7 (सात) वाजता बंद केला व शहरातील गंभीर रुग्ण ज्याला प्राथमिक ईलाजाची अत्यंत आवश्यकता आहे असा आला व बंद दवाखाना पाहून तो प्राथमिक ईलाजापासुन वंचित राहीला व जीव गमावून बसला तर त्याला जबाबदार कोण ? राहिलं असा सवाल परिसरातील तसेच शहरातील नागरिकांना पडलेला दिसुन येतो आहे.जनतेतुन या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांची वेळ चोवीस तास करुन आणखी दोन डाॅक्टर्स व दोन परिचारीका यांच्या तात्काळ नियुक्ती करुन वेळ वाढविण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसत आहेत.

Saturday, June 10, 2023

गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा- भाई तुषार गोळेगावकर

गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा- भाई तुषार गोळेगावकर






सोनपेठ (दर्शन) :-

स्पर्धेच्या काळात ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी  शिक्षकांना प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत श्री बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाई तुषार भैय्या गोळेगावकर यांनी तालुक्यातील मौजे लासीना येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात आज दि १० जुन रोजी मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक मंडळाचे अध्यक्ष पंडीतराव कदम हे होते तर उद्घाटक म्हणून श्री बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाई तुषार भैय्या गोळेगावकर हे होते तर व्यासपीठावर भागवतराव परांडे,व्यंकटी कदम, अनंतराव कदम, शिवाजीराव कदम, विठ्ठल कदम, सोपान परांडे, मुख्याध्यापक अंकुश परांडे, मुख्याध्यापक दिनकर देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना तुषार भैय्या गोळेगावकर म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपल्या संस्थेच्या वतीने खेड्यापाड्यात शाळा सुरू केल्या आहेत. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेस लक्ष देऊन शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे.त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना व शिष्यवृत्ती योजना लाभ दिला जातो ही अतिशय अभिमानाची बाब आहे. लासीना येथे शाळेसाठी आगामी शैक्षणिक वर्षात इमारत बांधकाम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच येत्या काळात वर्ग निहाय विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मत शेवटी बोलताना व्यक्त केले आहे. कार्यक्रमाच्या प्रस्ताविक परांडे सरांना केले आहे. यावेळी दिनकर देशपांडे विठ्ठल कदम, शिवाजी कदम, यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भगवान पैठणे यांनी तर आभार प्रदर्शन सुग्रीव दाढेल यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंजाजी डुकरे, सुभाष मकने दत्ता परतवाड, बळीराम कदम, देवानंद निरस, रामचंद्र काकडे, अनिल कुंडगीर आदींनी परिश्रम घेतले आहे.

Thursday, June 8, 2023

सोनपेठ पोस्ट ऑफिसच्या सर्व सुविधासाठी पर्यायी व्यवस्थेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा - सब पोस्टमास्टर डी.एम.माने.

सोनपेठ पोस्ट ऑफिसच्या सर्व सुविधासाठी पर्यायी व्यवस्थेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा - सब पोस्टमास्टर डी.एम.माने.


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ पोस्ट ऑफिस येथे गेली एक-दीड महिना बीएसएनएल सेवा विस्कळीत झाल्यामुळे ग्राहकांना नाहक अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले परंतु आता माननीय डाक अधीक्षक साहेब परभणी व सहाय्यक डाक अधीक्षक साहेब परभणी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ पोस्ट ऑफिसच्या सर्व सुविधांसाठी पर्यायी व्यवस्थेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सब पोस्टमास्टर डी .एम. माने यांनी केले आहे.सोनपेठ पोस्ट ऑफिस मध्ये स्पीड पोस्ट पार्सल व्यवस्था ही ब्रांच ऑफिस शेळगाव व डिघोळ पोष्ट मास्तर यांना बोलावून यांच्या मशीन द्वारे तात्पुरती पुरवल्या जात आहे यामध्ये दोनशे सत्तर 270 पार्सल बुकिंग केले आहेत तसेच आर.डी.योजना, सुकन्या योजना,पैसे जमा,उचल अथवा फिक्स डिपाॅझिट यांची व्यवस्था गंगाखेड व पाथरी डाक घर येथे जाऊन सब पोस्टमास्टर डी.एम.माने हे स्वतः ऑनलआईन करत आहेत.महिला सन्मान योजना 19 नेटवर्क बंद असतानाही सुरू करण्यात आले.त्याचबरोबर सुकन्या संमृधी योजनेचे 20 नवीन खाते सुरू करण्यात आले आहेत. तरी सोनपेठ पोस्ट ऑफिसच्या सर्व प्रकारच्या सुविधेसाठी सुरू असलेल्या पर्यायी व्यवस्थेचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सब पोस्टमास्टर डी .एम. माने यांनी केले आहे.

बीड विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांचे अक्षम्य दुर्लक्ष,सोनपेठ मार्गे लांब पल्याच्या बस सुरू करण्याची मागणी

बीड विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांचे अक्षम्य दुर्लक्ष,सोनपेठ मार्गे लांब पल्याच्या बस सुरू करण्याची मागणी

सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील पत्रकार बांधवांनी वेळोवेळी दूरध्वनी द्वारे तसेच वेळोवेळी निवेदनासह बीड विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांना सूचना करूनही अक्षम्य दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. सोनपेठ शहरे परभणी जिल्ह्याच्या व बीड जिल्ह्याच्या टोकावरील शहर असल्याकारणाने तसेच रहदारीसाठी बीड जिल्ह्यातून एसटी महामंडळाच्या वतीने नेहमी सापत्नीक वागणूक मिळत असते, लॉकडाऊन च्या वेळी सोनपेठ शहरात परळी आगाराची बस रात्री आठ वाजता मुक्कामी बंद केली ती बस सर्व व्यापारी वर्ग व मजूर वर्ग यासाठी अत्यावश्यक असून ती पुन्हा सुरू करण्यासाठी सततची मागणी होत आहे, तसेच बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळात प्रथम स्थानी अशी नुकतीच बातमी वाचली परंतु सोनपेठ मार्गे लांब पल्ल्याच्या गाड्या बीड परभणी, बीड नांदेड,बीड हिंगोली,बीड वसमत तसेच परळी आगारातून परळी बुलढाणा, अंबाजोगाई आगारातून अंबाजोगाई मेहकर, अंबाजोगाई जालना, तसेच धारूर आगारातून धारूर परभणी, धारूर सोनपेठ, धारूर कंधार अशा जास्तीत जास्त बस सोडून तात्काळ सुरू करण्यात याव्यात बीड विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी मराठी पत्रकार परिषद तालुका शाखा सोनपेठ पत्रकार बांधवांनी दिलेल्या निवेदनाच्या प्रती सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ लांब पल्ल्याच्या बस सुरू कराव्यात तसेच परळी आगाराची रात्री आठची मुक्कामी बस सुरू करण्यात यावी अशी मागणी तमाम जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. मराठी पत्रकार परिषद तालुका शाखा सोनपेठ च्या वतीने या निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देऊन तात्काळ आपण बीड विभागीय नियंत्रण अजयकुमार मोरे यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना कराव्यात अशी विनंती केली आहे.

Thursday, June 1, 2023



श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सन 2023 आळंदी ते पंढरपूर