श्रीहरीकोटा अंतराळ केंद्राच्या सहलीसाठी सोनपेठ तालुक्यातील विवेक धबडे,गोपाळ पवार व रुद्राणी राजमाने पात्र
चि.विवेक अजय धबडे.जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ.
चि.गोपाळ दामोदर पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवठाना.
चि.गोपाळ दामोदर पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवठाना. सोनपेठ (दर्शन) : -
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत औरंगाबाद विभागातील जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून तीन विद्यार्थी श्रीहरीकोटा अंतराळ केंद्र,उपग्रह प्रक्षेपण केंद्र,थुंबा येथील स्पेस म्युझियम व विश्वेश्वरय्या इंडस्ट्रीयल ॲड टेक्नीकल म्युझियम येथे भेट देऊन येथील कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत.त्यासाठी केंद्रस्तरावर परीक्षेत प्रत्येक केंद्रातून 10 विद्यार्थी पुन्हा त्यांची तालुकास्तरीय परीक्षेतून 10 विद्यार्थी तसेच नुकतीच शेवटची जिल्हास्तरीय परीक्षेतून सोनपेठ तालुक्यातील तीन विद्यार्थी पात्र प्रथम विवेक अजय धबडे जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ, द्वितीय गोपाळ दामोदर पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवठाना तर तृतीय रुद्राणी शिवलिंग राजमाने जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ यासाठी प्रयत्न करणारे जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक श्रीमती म्हात्रे मॅडम व श्रीमती माळी मॅडम तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवठाना मुख्याध्यापक हनुमंत केदार, प्रमुख मार्गदर्शक श्रीमान गुरव सर व विवेक धबडे,गोपाळ पवार व रुद्राणी राजमाने या विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रा.विठ्ठल भुसारे,तहसीलदार सारंग चव्हाण,गट विकास अधिकारी मदनराव कदम,उप जिल्हाधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण,वैद्यकीय अधीक्षक डॉ.सिध्देश्वर हालगे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष पवार, पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड,मुख्याधिकारी विठ्ठल केदारे,गट साधन केंद्र सर्व कर्मचारी वर्ग,सर्व केंद्र प्रमुख, सर्व मुख्याध्यापक,सर्व शिक्षक शिक्षिका शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी, उपाध्यक्षा सौ.वंदना नवनाथ शिंदे,सदस्य मुस्ताक चाॅदसाब खुरेशी,राजाभाऊ सिद्धेश्वर बर्वे, डॉ. सतीश अरबाड,महादेव दत्ता चव्हाण,बाबासाहेब मरीबा कसबे,प्रकाश दगडूबा शिंदे तसेच सदस्या सौ.मंगल समाधान गायकवाड,सौ.सरस्वती वैजनाथ चौंडे,सौ.अनिता धोंडीराम सुरवसे,सौ.अनुसया सुभाष होनमणे आणि विद्यार्थी प्रतिनिधी कु.हर्षा परमेश्वर पैंजणे आदिसह सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील श्रीहरिकोटा सहलीसाठी शुभकामना व्यक्त होताना दिसत आहेत.


No comments:
Post a Comment