आदि जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सवा निमित्ताने त्रिवार वंदन! वीरशैव धर्म स्थापक पंचाचार्य
सोनपेठ (दर्शन) :-
स्कंद पुराणाच्या प्रमाणवचनाने धर्माला ग्लानी आल्यान्ंतर भगवान शिव आपले विशेष अंश असलेला शिवगणाच्या रूपात अवतरित होवून प्रत्येक युगात धर्माची स्थापना केलेली आहे . या सनातन वीरशैव धर्माचे संस्थापक पाच आचार्य आहेत.
शिवाच्या सद्योजात वामदेव अघोर तत्पुरूष व र्इशान्य मुखाच्या रूपाने विराजमान कुल्यपाक येथील श्री सोमेश्वरलिंग, वट क्षेत्रातील श्री सिध्देश्वर लिंग, द्राक्षाराम क्षेत्रातील श्री रामनाथलिंग, सुधाकुण्ड क्षेत्रातील श्री मल्लीकार्जून लिंग व काशी क्षेत्रातील श्री विश्वनाथ लिंग या पाचही लिंगातून अनुक्रमे १) श्री जगदगुरू रेवणाराध्य २) श्री जगदगुरू मरूळाराध्य ३) श्री जगदगुरू एकोरामाराध्य ४) श्री जगदगुरू पंडीताराध्य ५) श्री जगदगुरू विश्वाराध्य असे पाच आचार्य प्रत्येक युगात वेगवेगळ्या नावाने अवतरित होवून वीरशैव धर्माची स्थापना व धर्मप्रसार केलेले आहेत.
श्री श्री श्री १00८ जगदगुरू रेवणाराध्य :-
शिवाच्या आदेशानुसार श्री जगद्गुरू रेवणाराध्य वीरशैव धर्माच्या स्थापनेसाठी आन्ध्र प्रदेशातील सुप्रसिध्द क्षेत्र कोल्लीपाक सोमेश्वर लिंगातून अवतार घेवून आले. कॄतायुगात एकाक्षर शिवाचार्य, त्रेतायुगात एकवत्र शिवाचार्य‚ व्दापारयुगात रेणुक शिवाचार्य आणि कलीयुगात रेवणाराध्य शिवाचार्य या नावाने प्रसिध्द आहेत. व्दापारयुगात त्यांनी अवतार घेतल्यानंतर श्री जगदगुरूनी मलयपर्वतावर श्री अगस्त्य महर्षीना वीरशैव सिध्दांताचा उपदेश केला. तोच ग्रंथ शिवयोगी शिवाचार्य यांनी संग्रहित केलेला तो उपदेश म्हणजेच " सिध्दात शिखामणी " या नावाने ग्रंथ प्रसिध्द आहे. धर्म प्रचारासाठी त्यांनी कर्नाटकातील बाळेहोनूर येथे पीठाची स्थापना केली. हे पीठ रंभापूरी पीठ या नावाने प्रसिध्द आहे. हया पीठाची शाखा रेणुक शाखा आहे. या पीठाचे सिंहासन वीर सिंहासन आहे. हे वीरगोत्राचे आद्यगुरू होत. हया पीठाचे झेंडयाचा रंग हिरवा आहे. दंड अस्वत्य (पिवळा) दंड आहे. कमंडलु , वेद ऋगवेद आहे. हया आचार्याचे सूत्र पडविड सूत्र आहे. हया शाखेचे तत्व पॄथ्वी आहे. आज या पीठावर प.पु.श्री श्री श्री १00८ जगद्गुरू वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी अधिकारावर आहेत.
Website: www.rambhapuripeetha.info
श्री श्री श्री १00८ जगदगुरू मरूळाराध्य :-
शिवाच्या आज्ञेवरून मरूळाराध्य वीरशैव धर्माच्या स्थापनेसाठी क्षिप्रा नदीच्या काठी विराजमान असलेल्या वट क्षेत्रातील सिध्देश्वर लिंगातून प्रत्येक युगात अवतार घेत आले. कॄतायुगात द्वअक्षर शिवाचार्य येतायुगात द्विवत्र शिवाचार्य‚ व्दापारयुगात दारूक शिवाचार्य व कलियुगात मरूळाराध्य शिवाचार्य या नावाने प्रसिध्द आहेत. त्यांनी धर्म प्रसारासाठी मध्यप्रदेशात उज्जयिनी पीठाची स्थापना केली. ते आता कर्नाटकातील विजयनगर जिल्हयातील उजनी नगरात आहे. हे नंदी गोत्राचे आद्यगुरू आहेत. हयाची शाखा दारूक शाखा आहे. याचे सिंहासन सध्दर्म सिंहासन या नावाने प्रसिध्द् आहे. हया पीठाचे वृष्टी सूत्र आहे. वेद यजुर्वेद आहे. आप तत्व आहे. आता या पीठावर प.पु.श्री श्री श्री १00८ जगदगुरू सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी विराजमान आहेत.
Website: www.ujjainisaddharmapeetha.com
श्री श्री श्री १00८ जगदगुरू एकोरामाराध्य :-
श्री जगदगुरू एकोरामाराध्य यांनी शिवाच्या आदेशानुसार वीरशैव धर्म स्थापनेसाठी द्राक्षाराम क्षेत्रातील श्री रामनाथ लिंगातून अवतार घेतला. कॄतायुगात त्रयक्षर शिवाचार्य तर त्रेतायुगात त्रिवत्र शिवाचार्य‚ व्दापारयुगात घंटाकर्ण शिवाचार्य व कलीयुगात एकोरामाराध्य शिवाचार्य या नावाने अवतार घेतला. धर्म प्रसारासाठी यांनी हिमालायात धर्म पीठाची स्थापना केली. ते केदारपीठ या नावाने प्रसिध्द आहे. यालाच वैराग्यसिंहासन नावाने ओळखले जाते. हे पीठ पुरातन फार आहे. टेहरी नरेश या पीठाचे शिष्य होते. नरेशाच्या तिलकोत्सवाच्या समारंभात ' रावल ' ही उपाधी बहाल करत होते म्हणून या पीठाच्या जगदगुरूना ' रावल ' या उपाधीनेही संबोधतात. हया पीठाचा झेंडयाचा रंग निळा आहे. सिंहासन वैराग्यसिंहासन होय. हया पीठाचे वेद सामवेद आहे. हे भुंगि गोत्राचे आद्यगुरू होत. हयाचा दंड वेणुचा आहे. आज या पीठावर प.पू.श्री श्री श्री १00८ रावल भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी अधिकारावर आहेत.
श्री श्री श्री १00८ जगदगुरू पंडिताराध्य :-
शिवाच्या आज्ञेनुसार प.पु.जगदगुरू पंडिताराध्य वीरशैव धर्म स्थापना करण्यासाठी श्री शैल क्षेत्रात असलेल्या श्री मल्लीकार्जून ज्योतिर्लिंगातून अवतरले. कॄतायुगात त्यांनी चतुरक्षर शिवाचार्य‚ त्रेतायुगात चतुर्वक्र शिवाचार्य‚ व्दापारयुगात धेनुकर्ण शिवाचार्य व कलियुगात पण्डीताराध्य शिवाचार्य या नावाने ओळखले जातात. हया पीठाची धेनुकर्ण शाखा आहे. हया पीठाच्या झेंडयाचा रंग पांढरा आहे. यांचे वॄषभ गोत्र होय. हे चतुरक्षर शिवाचार्य प्रवर आहेत. हया पीठाचा अथर्ववेद आहे. हया पीठाचे सूर्यसिंहासन आहे. आज या पीठावर प.पू. श्री श्री श्री १00८ जगदगुरू डॉ.चन्नसिद्धराम पंडिताराध्य महास्वामीजी अधिकारावर आहेत.
Website: www.srishailapeetham.org
श्री श्री श्री १ 00८ जगदगुरू विश्वाराध्य :-
वीरशैव धर्माच्या स्थापनेसाठी शिवाच्या आज्ञेनुसार श्री जगदगुरू विश्वाराध्य काशीक्षेत्रातील विश्वनाथ ज्योर्तिलिंगातून अवतार घेतले.कॄतायुगात पंचाक्षर शिवाचार्य, त्रेतायुगात पंचवक्र शिवाचार्य या नावाने प्रासिध्द आहेत. वीरशैव धर्माच्या प्रचारासाठी यानी काशीपीठाची स्थापना केली. काशीमध्ये अत्य्ंत पवित्र व ' आन्ंद कानन ' या नावाने प्रासिध्द असलेल्या या क्षेत्रात हे पीठ आहे. आता हे जंगमवाडी मठ या नावाने प्रसिध्द आहे. आता या जंगमवाडी मठात आपल्या वीरशैव धर्माचे एक स्वतंत्र अभ्यासकेंद्र चालवले जाते. पीठाचे विश्वकर्ण शाखा आहे. हया पीठाचा झेंडयाचा रंग पिवळा आहे. स्कंद गोत्राचे आध्यगुरू मानले जातात. हयाचा दंड बिल्ब दंड आहे. हे ज्ञानसिंहासन पीठ आहे. सध्या या पीठावर ज्ञानसिंहासन नावाप्रामाणे ज्ञानी असलेले प.पु.श्री श्री श्री १00८ जगदगुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी विराजमान आहेत. यांचे उत्तराधिकारी श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य आहेत.
Website: www.shrisiddhanthashikhamani.com
अशा प्रकारे वीरशैव धर्माचे संस्थापक हे पाच मूल पंचाचार्य होत. यांनाच आपण वीरशैव धर्माचे पाच जगदगुरू म्हणुन संबोधतो.

No comments:
Post a Comment