बहुजन बांधवांनो वैचारिक ठेवा जतन करण्यासाठी चलो परभणी - अंकुशराव परांडे
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुका मराठा सेवा संघ आयोजित राज्यस्तरीय महाअधिवेशन संदर्भात बैठक संपन्न, दि:15/12/2022 रोजी मराठा सेवा संघ तालुका शाखा सोनपेठ राज्यस्तरीय महाअधिवेशन संदर्भात लाईफ लाईन कोचिंग,परळी रोड सोनपेठ, या ठिकाणी बैठक ठिक संध्याकाळी 7:00 वा. घेण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघ सोनपेठ तालूका अध्यक्ष अंकूशराव परांडे सरांनी बहुजन बांधवांना वैचारिक ठेवा जतन करण्यासाठी चलो परभणी असा नारा देत दि.23,24 व 25 तिन दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशन
राजलक्ष्मी लॉन्स, पाथरी रोड परभणी. {डेन्टल कॉलेजच्या बाजूला} संपन्न होणार आहे.अधिवेशनाविषयी सखोल माहीती देऊन कार्यक्रम यशयस्वी करण्यासाठी सोनपेठ तालूक्यातून मोठ्या संख्येने यूवा वर्ग, स्वयंसेवक,महीलांनी शूध्दा आपली प्रार्थनीय उपस्थित दाखवायची आहे असे संबोधून, सेवासघांची पूढील वाटचाल कशी आहे म्हणजेच {उदा.आर्थिक दूर्बलांसाठी शिक्षणासाठी शाळा, निवासी व्यवस्था,ग्रंथालय} असे सखोल मार्गदर्शन केले.तसेच अधिवेशनाला तालूक्यातून शहरातून व ग्रामीण भागातून अधिकाधिक निधी कसा जमा होईल याविषयी चर्चासत्रातून नियोजन करण्यात आले.यावेळी आभार प्रदर्शन श्री जाधव सरांनी केले, कार्यक्रमाला मराठा सेवासंघ तालूका सचिव पंजाबराव सुरवसे, आदोडे सर, प्रशांत होशनाळे सर,गौरव जाधव सर,आरगडे सर,प्रा. जिवन भोसले सर, मोरे सर,मकने सर, योगेश जाधव सर,सोनपेठचे प्रसिध्द व्यापारी राजाभाऊ लांडे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment