डिघोळमध्ये विकासकामांचा धडाका ! युवानेते उपसरपंच अजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून विविध विकासकामे प्रगतीपथावर
डिघोळच्या मुख्य रस्त्यासाठी आ.बाबाजानी दुर्राणी यांचा भरघोस निधी
सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे विविध विकासकामांना युवानेते तथा उपसरपंच अजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून सुरुवात झाली आहे.तर विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत.गावाच्या सर्वांगिण विकासाचा विडा उचललेल्या देशमुख यांच्या नेतृत्वावर भविष्यात प्रत्येक निवडणुकीत विश्वास दाखवण्याचे आवाहन यावेळी विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी साप्ताहिक सोनपेठ दर्शनशी बोलतांना व्यक्त केले.सोनपेठ तालुक्यातील विविध गावात आ.दुर्राणी यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी उपलब्ध झाला असल्याने या गावातील महत्वाकांक्षी कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागतील अशी अपेक्षा यावेळी उपसरपंच अजयकुमार देशमुख यांनी बोलतांना व्यक्त केली.पुढे त्यांनी असे सांगितले की,मागील पंचवीस वर्षांपासून डिघोळ येथे मुख्य रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असे.विशेषतः पावसाळ्यात याचा अधिकचा त्रास होता आजपर्यंत लोकप्रतिनींनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष आणि ग्रामस्थांची मागणी होऊनही करण्यात येत नसणाऱ्या रस्त्यासाठी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी पुढाकार घेत निधी दिला आहे.या रस्त्याचे काम नुकतेच सुरु करण्यात आले असून ग्रामस्थांच्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अजयकुमार देशमुख यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरीक,पदाधिकारी, मित्रमंडळाचे प्रतिनिधी सदस्य,सरपंच प्रतिनिधी भागवत शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.






No comments:
Post a Comment