प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांना यावर्षीचा महात्मा गांधी नॅशनल अवॉर्ड जाहीर
सोनपेठ (दर्शन) :-
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांना यावर्षीचा महात्मा गांधी नॅशनल अवॉर्ड फॉर अडमिनिस्ट्रेटर ऑफ द इयर 2021' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार दरवर्षी भारतीय प्रशासकाला त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी दिला जातो. या पुरस्काराला साजेसे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इंग्रजी विषयातील लेखक, संशोधक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील च नव्हे तर भारताबाहेरील विद्यार्थ्यांनी ही पी. एच् डी. प्राप्त केल्या आहेत. महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सातत्याने विविध शैक्षणिक प्रयोग करून परिसरातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन एक कुशल प्रशासक म्हणून कार्य करत आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्ष परमेश्वर कदम उपाध्यक्षा ज्योतीताई कदम, कै रमेश वरपूडकर वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय सर्व प्राध्यापक, प्राध्यापीका, शिक्षकेतर कर्मचारी, साप्ताहिक सोनपेठ दर्शन परीवार आदिसह सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

No comments:
Post a Comment