Saturday, December 17, 2022

बहुजन बांधवांनो वैचारिक ठेवा जतन करण्यासाठी चलो परभणी - अंकुशराव परांडे

बहुजन बांधवांनो वैचारिक ठेवा जतन करण्यासाठी चलो परभणी - अंकुशराव परांडे

 
सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुका मराठा सेवा संघ आयोजित राज्यस्तरीय महाअधिवेशन संदर्भात बैठक संपन्न, दि:15/12/2022 रोजी मराठा सेवा संघ तालुका शाखा सोनपेठ राज्यस्तरीय महाअधिवेशन संदर्भात लाईफ लाईन कोचिंग,परळी रोड सोनपेठ, या ठिकाणी बैठक ठिक संध्याकाळी 7:00 वा. घेण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघ सोनपेठ तालूका अध्यक्ष अंकूशराव परांडे सरांनी बहुजन बांधवांना वैचारिक ठेवा जतन करण्यासाठी चलो परभणी असा नारा देत दि.23,24 व 25 तिन दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशन
राजलक्ष्मी लॉन्स, पाथरी रोड परभणी. {डेन्टल कॉलेजच्या बाजूला} संपन्न होणार आहे.अधिवेशनाविषयी सखोल माहीती देऊन कार्यक्रम यशयस्वी करण्यासाठी सोनपेठ तालूक्यातून  मोठ्या संख्येने यूवा वर्ग, स्वयंसेवक,महीलांनी शूध्दा आपली प्रार्थनीय उपस्थित दाखवायची आहे असे संबोधून, सेवासघांची पूढील वाटचाल कशी आहे म्हणजेच {उदा.आर्थिक दूर्बलांसाठी शिक्षणासाठी शाळा, निवासी व्यवस्था,ग्रंथालय} असे सखोल मार्गदर्शन केले.तसेच अधिवेशनाला तालूक्यातून शहरातून व ग्रामीण भागातून अधिकाधिक निधी कसा जमा होईल याविषयी चर्चासत्रातून नियोजन करण्यात आले.यावेळी आभार प्रदर्शन श्री जाधव सरांनी केले, कार्यक्रमाला मराठा सेवासंघ तालूका सचिव पंजाबराव सुरवसे, आदोडे सर, प्रशांत होशनाळे सर,गौरव जाधव सर,आरगडे सर,प्रा. जिवन भोसले सर, मोरे सर,मकने सर, योगेश जाधव सर,सोनपेठचे प्रसिध्द व्यापारी राजाभाऊ लांडे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांना यावर्षीचा महात्मा गांधी नॅशनल अवॉर्ड जाहीर

प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांना यावर्षीचा महात्मा गांधी नॅशनल अवॉर्ड जाहीर


सोनपेठ (दर्शन) :-

कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाचे मार्गदर्शक  प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांना यावर्षीचा महात्मा गांधी नॅशनल अवॉर्ड फॉर अडमिनिस्ट्रेटर ऑफ द इयर 2021' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार दरवर्षी भारतीय प्रशासकाला त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी दिला जातो. या पुरस्काराला साजेसे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इंग्रजी विषयातील  लेखक, संशोधक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील च नव्हे तर भारताबाहेरील विद्यार्थ्यांनी ही पी. एच् डी. प्राप्त केल्या आहेत. महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सातत्याने विविध शैक्षणिक प्रयोग करून परिसरातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन एक कुशल प्रशासक म्हणून कार्य करत आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्ष परमेश्वर कदम उपाध्यक्षा ज्योतीताई कदम, कै रमेश वरपूडकर वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय सर्व प्राध्यापक, प्राध्यापीका, शिक्षकेतर कर्मचारी, साप्ताहिक सोनपेठ दर्शन परीवार आदिसह सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

Friday, December 16, 2022

माझ्या शहरासाठी माझे योगदान न.प.आयोजित विविध स्पर्धेत सहभाग नोंदवा - विठ्ठल केदारे

माझ्या शहरासाठी माझे योगदान न.प.आयोजित विविध स्पर्धेत सहभाग नोंदवा - विठ्ठल केदारे


सोनपेठ (दर्शन) :- 

स्वच्छ भारत अभियान व माजी वसुंधरा अभियान तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्षा अंतर्गत सोनपेठ नगर परिषद आयोजित विविध स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी केले आहे.मा. उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक शैलेशजी लाहोटी यांच्या मार्गदर्शनात "स्वच्छ अंगण सुंदर पैठणी" स्पर्धा या स्पर्धेत प्रत्येक वार्ड मधील आपले घर स्वच्छ ठेवते ती ग्रहीणी सहभाग नोंदवून परीक्षणांती प्रत्येक वार्डा मध्ये एक पैठणी बक्षीस जिंकावी तसेच "माझ्या शहरासाठी माझे योगदान" "स्वच्छ,सुंदर वार्ड" स्पर्धा यामध्ये महिला बचत गट, मित्र मंडळ , सामाजिक संस्था अथवा वार्ड मधील विविध ग्रुप सहभाग नोंदवून परीक्षणांती पहिले बक्षीस रोख 11,111/- तसेच इतर तीन बक्षिसे जिंकू शकता, "स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज" स्पर्धा यामध्ये सामाजिक संघटना विविध ग्रुप नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच भिंतचित्र रेखाटन स्पर्धा व आपल्या कलागुणांना वाव, वृध्दिंगत करा आपल्या सोनपेठ शहराचे नाव यामध्ये जिंगल स्पर्धा, शॉर्ट मूव्ही स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा व म्युरल स्पर्धा अशा विविध कलाकृती जमा करण्यासाठी दिनांक 19 /12 /22 सोमवार पर्यंतच मुदत स्पर्धा दुसऱ्या दिवशी दि.20/12/22 स्पर्धेचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे मंगळवार रोजी सकाळी 10 ते 11:30 होतील तरी उपरोक्त सर्व अशा विविध स्पर्धेसाठी गृहिणीने, महिला बचत गटांने व मित्र मंडळ व संघटनांनी तसेच स्थानिक ग्रुप यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी शेवटची तारीख दि.20 डिसेंबर 22 मंगळवार पर्यंत आहे.नोंदणी साठी संपर्क सचिन पोरे मो.9156147146 साधावा.

Sunday, December 11, 2022

कै.विष्णुपंत रामभाऊ गट्टी यांचे वृद्धापकाळाने निधन

कै.विष्णुपंत रामभाऊ गट्टी यांचे वृद्धापकाळाने निधन

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील प्रसिद्ध व्यापारी तसेच श्री पार्डिकर महाविद्यालय सिरसाळाचे प्राध्यापक डॉ गणपत गट्टी यांचे वडील आणि डॉ दिपक गट्टी यांचे आजोबा कै.विष्णु गट्टी यांचे दि.10 डिसेंबर रोजी वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना डॉ गणपत, अनिल, रमेश हि तीन मुल व एक मुलगी उषा आहेत.
गीतांजली, पांडुरंग, ऋषिकेश, ऋतुजा, आकाश,आस्था,गोविंदराज, डॉ दीपक 
हे नातू आहेत.मधुकर,सत्यप्रेम हे त्यांचे पुतणे आहेत.असा त्याचा मोठा परीवार आहे. यांच्यावर अंतिम संस्कार दिनांक 11 डिसेंबर रोजी परभणी येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे करण्यात आले आहेत,गट्टी परिवार यांच्या दुःखात साप्ताहिक सोनपेठ दर्शन परिवार सहभागी आहे.

नाझमीन रशीद शेख मैदानी स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

नाझमीन रशीद शेख मैदानी स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
सोनपेठ (दर्शन) :-

कै.र.व.कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी नाझमीन रशीद शेख हीने परभणी येथे झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत २०० मीटर धावणे या मैदानी स्पर्धेत परभणी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तिच्या यशाबद्दल ह.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम,उपाध्यक्षा ज्योतिताई कदम,प्राचार्य डॉ.वसंत सातपुते,प्राचार्या शेख शकीला,डॉ.मुकुंदराज पाटील,क्रीडा संचालक डॉ.गोविंद वाकणकर,जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार,तालुका क्रिडा संयोजक शिवाजी तळेकर,क्रिडा संघ व्यवस्थापक प्रा.कैलास आरबाड,प्रा.एम.डी.मेहत्रे,प्रा.एस.डी. वाघमारे,प्रा.सुरेश मोरे,प्रा.संतोष वडकर यांच्या सह साप्ताहिक सोनपेठ दर्शन तसेच सर्वस्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

Saturday, December 10, 2022

बालासाहेब सोनवणे यांची लाल बावटा शेतमजूर युनियनच्या तालुका अध्यक्षपदी निवड

बालासाहेब सोनवणे यांची लाल बावटा शेतमजूर युनियनच्या तालुका अध्यक्षपदी निवड


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील सामाजिक कार्यकर्ते सोनवणे बालासाहेब वैजनाथ यांचें ग्रामीण मंजूर व मागास वर्गीय यांच्यासाठी करित असलेल्या कर्याबद्दल आणि गायरान धारकांच्या लढ्यामध्ये त्यांचे भरीव योगदान पाहुन.याकामाची दखल घेवून आणि सोनपेठ तालुक्यातील शेतमजूर व भूमिहीन यांचा लढा गतिमान करण्याच्या हेतूने बालासाहेब सोनवणे यांची लाल बावटा शेतमजूर युनियनच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे.येत्या काळात लाल बावटा शेतमजूर युनियनचे संमेलन घेवून तालुका कार्यकारीणी तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येत आहे.असे पत्र कॉम्रेड राजन क्षीरसागर कार्याध्यक्ष लाल बावटा शेतमजूर युनियन यांनी देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत या निवडीबद्दल बालासाहेब सोनवणे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

सोनपेठ येथे मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सोनपेठ येथे मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोनपेठ आयोजित मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसा निमित्त वर्ष 10 वे "भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा" आयोजक राष्ट्रवादी युवक कांग्रेस,सोनपेठ‌.मा.राजेश दादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.ॲड.श्रीकांत विटेकर यांच्या नेतृत्वाखाली उद्घाटन सोमवार दि.19/12/2022 रोजी सकाळी 10:10 मिनिटांनी स्थळ गणेश जीनींग मैदान, शेळगाव बायपास रोड,सोनपेठ.होईल.या खुल्या क्रिकेट स्पर्धेचे 1 ले बक्षीस 85,555/- तर दुसरे बक्षीस 55,555/-, मॅन ऑफ द सिरीज 7001/-, बेस्ट बॉलर 5001/-, बेस्ट बॅट्समन 5001/-,मॅन ऑफ द मॅच 3001/-, इन्ट्री फीस 1100/- रुपये राहिल.कमेटी संपर्क 7744013000,नियम व अटी- 1) पंचांचा निर्णय अंतिम राहील.2) खेळाडूंनी साहित्य सोबत आणावे. 3) खेळाडूची जीवितहानी जिम्मेदारी स्वतःवर राहील. 4) प्रत्येक सामना 8 षटकांचा राहील व अंतिम सामना 12 षटकांचा राहील. 5) दिलेल्या वेळेवर संघ हजर नसल्यास त्या संघास बाद घोषित करण्यात येईल) प्रत्येक सामन्याला कमिटीचा बॉल वापरावा लागेल. 7) हरलेला खेळाडू डबल खेळलेला आढळल्यास बाद करण्यात येईल. 8) फेकी (जर्क) बॉलिंग कदापि मान्य केली जाणार नाही.9) अंतिम निर्णय कमेटीचा राहील.लवकरात लवकर संपर्क साधावा उंबरे मोबाईल शॉपी 9595243048,आण्णा ग्राफिक्स 9049636000,वैष्णवी ज्वेलर्स 8698742222,भाऊ ज्वेलर्स 9423222562 आदिंना संपर्क साधावा.राष्ट्रवादि युवक काँग्रेस शहराध्यक्ष अशोक भुसारे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते परीश्रम घेताना दिसुन येत आहेत.

साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठी संपर्क साधावा संपादक किरण रमेश स्वामी सोनपेठ मो.9823547752.

Monday, December 5, 2022

डिघोळमध्ये विकासकामांचा धडाका ! युवानेते उपसरपंच अजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून विविध विकासकामे प्रगतीपथावर डिघोळच्या मुख्य रस्त्यासाठी आ.बाबाजानी दुर्राणी यांचा भरघोस निधी

डिघोळमध्ये विकासकामांचा धडाका ! युवानेते उपसरपंच अजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून विविध विकासकामे प्रगतीपथावर
डिघोळच्या मुख्य रस्त्यासाठी आ.बाबाजानी दुर्राणी यांचा भरघोस निधी

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे विविध विकासकामांना युवानेते तथा उपसरपंच अजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून सुरुवात झाली आहे.तर विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत.गावाच्या सर्वांगिण विकासाचा विडा उचललेल्या देशमुख यांच्या नेतृत्वावर भविष्यात प्रत्येक निवडणुकीत विश्वास दाखवण्याचे आवाहन यावेळी विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी साप्ताहिक सोनपेठ दर्शनशी बोलतांना व्यक्त केले.सोनपेठ तालुक्यातील विविध गावात आ.दुर्राणी यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी उपलब्ध झाला असल्याने या गावातील महत्वाकांक्षी कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागतील अशी अपेक्षा यावेळी उपसरपंच अजयकुमार देशमुख यांनी बोलतांना व्यक्त केली.पुढे त्यांनी असे सांगितले की,मागील पंचवीस वर्षांपासून डिघोळ येथे मुख्य रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असे.विशेषतः पावसाळ्यात याचा अधिकचा त्रास होता आजपर्यंत लोकप्रतिनींनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष आणि ग्रामस्थांची मागणी होऊनही करण्यात येत नसणाऱ्या रस्त्यासाठी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी पुढाकार घेत निधी दिला आहे.या रस्त्याचे काम नुकतेच सुरु करण्यात आले असून ग्रामस्थांच्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अजयकुमार देशमुख यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरीक,पदाधिकारी, मित्रमंडळाचे प्रतिनिधी सदस्य,सरपंच प्रतिनिधी भागवत शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.