फुलकळस केंद्रांतर्गत सर जॉन डाल्टन यांची जयंती उत्साहात साजरी
पूर्णा तालुक्यातील फुलकळस केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लिमला, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कमलापूर,आणि प्राथमिक शाळा ईटलापूर माळी येथे सर रसायनशास्त्राचे थोर शास्त्रज्ञ
सर जॉन डाल्टन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतची सविस्तर वृत्त असे की, मा. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
मा.शिवानंद टाकसाळे यांच्या प्रेरणेतून, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली चला करूया शास्त्रज्ञांची जयंती साजरी या उपक्रमांतर्गत आज थोर शास्त्रज्ञ सर जॉन डाल्टन यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यात लिमला शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता डिग्रसकर, पदवीधर शिक्षक गंगाधर काकडे ,तुकाराम काशीकर, सुनीता भेटे, व अर्चना पौळ. खडाळा शाळेतील मुख्याध्यापक नागनाथ नागरगोजे, शास्त्रज्ञ जयंती प्रमुख प्रल्हाद राठोड ,ज्ञानेश्वर साखरे, वर्षा पाटील राहुल काऊतकर, पांडुरंग मोरे, कैलास सुरवसे. ईठलापुर माळी येथे गोविंद कामुलवार,ओम धूळशेट्टे कमलापूर येथे विज्ञान शिक्षक महेश जाधव, मुख्याध्यापक बापूराव पलये , संतोष रत्नपारखे, नितीन चौकेवार, दत्ता अबुज, सचिन राठोड, शेख कलीम आदींची उपस्थिती होती.




No comments:
Post a Comment