सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस म्हणजे अंधेर नगरी अनबुझ रजा - प्रभाकर शिरसाट
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ चा भ्रष्टाचारी राक्षस हा सोनपेठ ला लुटण्यासाठी आसुसलेला व निवडून येण्यासाठी शासनाच्या योजनांची कशी वासलात लावतो व सत्तेचा गैरवापर किती व कसा करतो ते या प्रमाणे......
सोनपेठ शहराची लोकसंख्या ही जवळपास सोळा हजार च्या आत आहे व सोनपेठ शहरामध्ये एकूण घरे इमारती यांची मालमत्ता ही तीन हजार ते साडे तीन हजार आहे,
भ्रष्टाचारी राक्षसाने सोनपेठ शहरासाठी पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत तीन हजार घरकुले मंजूर करून घेतली आहेत,म्हणजे या तीन हजार घरकुलां मध्ये पति पत्नी व दोन मुले राहणार असे गृहीत जरी धरले तर या घरकुल मध्ये राहणाऱ्या नागरिकांची लोकसंख्या ही जवळपास बारा हजार होते म्हणजे सोनपेठ शहरातील एकूण 16 हजार लोक संख्या पैकी 12 हजार नागरीक हे घरकूल योजने तील घरामध्ये राहतील व उर्वरित 4 हजार नागरीक हे सोनपेठ शहरातील जी घरे व बहुमजली इमारती आहेत या मध्ये प्रत्येकी एका ईमारती मध्ये व प्रत्येकी एका घरामध्ये एक नागरीक या प्रमाणे राहतात असे आपण समजू या
म्हणजे सोनपेठ शहरांमध्ये प्रत्यक्षात तीन ते साडेतीन हजार घरे व ईमारती असताना बारा हजार नागरीक हे बेघर दाखवून भ्रष्टाचारी राक्षसाने तीन हजार घरकुले मंजूर करून आणली आहेत हे केवळ येणाऱ्या निवडणूकीत निवडून येण्यासाठी केलेले आहे,या तीन हजार घरकुला पैकी सहाशे घरकुले ही बोगस लाभार्थी यांचे नावावर आहेत हे विशेष होय,सोनपेठ शहरामध्ये स्ट्रीट लाईट ही दिवस रात्र चालू आहे यामुळे नगर परिषदेला दर वर्षी 30लाखा पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे ही दिवसाची स्ट्रीट लाईट बंद करण्यासाठी संपुर्ण सोनपेठ शहरातीलप्रत्येक विद्युत खांब्या वर एक तार गेल्या बावीस वर्षापासून भ्रष्टाचारी राक्षसाला ओढता आली नाही किती हा विकास म्हणावा लागेल,सोनपेठ शहरामध्ये दहिखेड सोमेश्वर मंदिर जवळ जी दोन सभागृहे बांधली आहेत ती जनतेसाठी खुली केली आहेत परंतू ती अजूनही नगर परिषदेकडे हस्तांतरण केली नाहीत,सोणखेड येथील शादी खाना व भोई समाजासाठी बांधलेले सभा गृह हे जनतेसाठी खुले केलेले आहे परंतू ही दोन्ही सभागृहे अजुनही नगर परिषदेकडे हस्तांतरण केली नाहीत म्हणजे ही सर्व सभागृहे ही कंत्राटदार यांचे हातावर आहेत या सर्व सभागृहाची बांधकामे ही नाममात्र कंत्राट दार यांचे नावावर होती परंतु प्रत्यक्षात ही सर्व कामे भ्रष्टाचारी राक्षसाचे कंत्राटी टीमने केली आहेत व या कामांची चौकशी झाली तर आपण अडचणीत येवू शकतो म्हणून ही सर्व सभागृहे नगरपरिषद कडे हस्तांतरित केली नाहीत, सोनखेड शादी खाना येथील रूपये किमतीचा जनरेटर मंजुर झालेला असताना तो आजही गायब आहे अनेकसभागृहाना रंग रांगोटी केली नाही अनेक सभागृहा मध्ये विद्युत पुरवठ्यासाठी निधि मंजूर असताना अद्याप ही विद्युत करण झाले नाही याचा निधी कोणी गायब केला हे वेगळे सांगण्याची गरज नाही या सर्व प्रकरणी भ्रष्टाचारी राक्षसाने स्वतःचा बचाव करण्यासाठी मोठी चालाखी केली आहे,भ्रष्टाचारी राक्षसाने सन 2001ते सन 2022पर्यंतची विकास कामांची कागद पत्रे म्हणजे प्रत्येक विकास कामांची प्रशासकीय मान्यता तांत्रीक मान्यता कार्यारंभ आदेश उप योजिता प्रमाण पत्रे अनेक कामांची देयके नष्ट केली आहेत,भ्रष्टाचारी राक्षस म्हणजे अंधेर नगरी अनबुझ राजा या कथेतील खरा राजा असावा असे त्याने गेल्या बावीस वर्षा मध्ये वर्तन केले आहे
धन्यवाद
आपला
प्रभाकर शिरसाट.
सामाजिक कार्यकर्ते तथा
जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य परभणी.


No comments:
Post a Comment