प्रा.सखाराम कदम यांचे शिवजयंती निमित्त आकाशवाणीवर भाषण
सोनपेठ (दर्शन):-
सोनपेठ येथील कै.रमेश वरपूडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे मराठी विभागातील प्रा. सखाराम बाबाराव कदम यांचे 'भारतीय आरमाराचे जनक धर्मसहिष्णू छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावरील व्याख्यान परभणी आकाशवाणी केंद्रावरून दिनांक 19 फेब्रुवारी 2022, शनिवार रोजी सायंकाळी ठीक 6 वाजून 30 मिनिटांनी प्रसारित करण्यात येणार आहे. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा! असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment