जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते मानाचा संदल
धार्मिक व पारंपारिक कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडतील - जिल्हाधिकारी आंचल गोयल
परभणी / सोनपेठ (दर्शन) : -
महान सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांची परभणी येथील दर्गाह सर्व धर्म समभावाचे, एकात्मतेचे प्रतिक असून सर्व जिल्हा वासियांची हे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी मोठ्या आनंदात या ठिकाणी होणाऱ्या उर्साला यावर्षी कोव्हिड-19 च्या संसर्गामुळे आपण परवानगी दिली नाही. तथापि या ठिकाणी जे धार्मिक व पारंपारिक अत्यावश्यक कार्यक्रम आहेत ते मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे घेतला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले. आज दि.1 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उर्सानिमित्त संदलला सुरुवात करण्यात आली. संदलचा तबक जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी डोक्यावर घेवून जिल्ह्यातील जनतेच्या निरोगी आरोग्यबद्दल प्रार्थना केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,तहसिन अहमद खान, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment