Saturday, February 12, 2022

माता रमाई जयंती निमित्त वडगाव (स्टे) येथे राबवले वेगवेगळे कार्यक्रम

माता रमाई जयंती निमित्त वडगाव (स्टे) येथे राबवले वेगवेगळे कार्यक्रम

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील मौजे वडगाव (स्टे) येथे दिनांक 7 फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 124 व्या जयंती निमित्त येथील सर्व महिलांनी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवला व वाण म्हणून माता रमाई चे पुस्तक एकमेकींना भेट दिली.तसेच आनंदा सामाजिक व सांस्कृतिक संस्थे चे संस्थापक अध्यक्ष प्रा.आनंद वाव्हळे यांचे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या संस्थेच्या वतीने दिनांक 7 फेब्रुवारी 2022 ते 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत विनामूल्य सांस्कृतिक आयोजित करण्याचे जाहीर केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ.वंदना मदन वाव्हळे होत्या.महापुरुषांच्या प्रतिमेचे सर्व महिलांनी पूजन करून कार्यक्रम सुरुवात झाली. ध्वजारोहण बसपा चे जिल्हा अध्यक्ष गौतम उजगरे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनश्री वाव्हळे यांनी केले प्रस्ताविक पारस सुरंजे, आभार प्रदर्शन रोहिणी वाव्हळे यांनी केले.बाबासाहेबांच्या पूर्णकृतीस बाबुराव वाव्हळे हरंगूळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला.
समाजातील सर्व जेष्ठ महिलांचे पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वात कौशल्य शेषेराव वाव्हळे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांनी प्रबोधनात्मक गीत गायन केले.या कार्यक्रमासाठी मौजे हरंगूळ येथील रमाबाई वाव्हळे, वंदनाबाई वाव्हळे,नंदाबाई वाव्हळे, कुसुमबाई वाव्हळे, पार्वतीबाई गायकवाड यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कौशल्य सिरसाट, कु.वंदना वाव्हळे, कु.रोहिणी वाव्हळे, कु. किरण वाव्हळे, कु.प्रतीक्षा वाव्हळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment