Monday, October 25, 2021

आज संत नामदेव महाराजांची आज जयंती.. ll संत नामदेव ll

आज संत नामदेव महाराजांची आज जयंती.. 

               ll  संत नामदेव ll 



           तुम्हीच बंडखोरी करुन उभे केले होते संतांचे आंदोलन.तुम्हीच होतात भागवत धर्माचे संस्थापक.तुम्हीच तर म्हणाला होतात "आम्हा सापडले वर्म l करु भागवत धर्म ll "
तुमचा विना भारतभर बोलला.तुमचा टाळ त्रैलोक्यात निनादला.तुमच्या किर्तनात तथागत विठ्ठल दंग झाला.तुमच्या किर्तनरुपी रात्रीच्या शाळेमुळे लोकप्रबोधनाची आरोळी सर्वत्र घुमली.प्रत्येक जातिजमातीचा शब्दशस्त्रे घेवून समाजात क्रांतीची बिजे पेरायला लागला.
तुम्हीच मध्ययुगीन भारताच्या क्रांतीचे पथदर्शक ठरलात.आरतीचे जनक तुम्हीच.डोइचा पदर खांद्यावर घेवून लोकलाज सोडून प्रबोधनासाठी भरबाजारात येण्याची भाषा करणारी जना तुमचीच शिष्या.मंगळवेढ्याच्या वेशीत हाडांच्या ढिगाऱ्यात तळमळणारा तुमचा सखा जिवलग चोखोबा.चोखोबा धन्य झाला पंढरपुरात विठठलचरणी केवळ तुमच्याच मुळे.
          पण आज रस्त्याने माऊली माऊली म्हनून जातिव्यवस्थेला सुरुंग लावनारे तुमचे वारकरी घरी,गावी अस्प्रश्यता पाळतात.चोखोबांच्या समाधीवर डोके टेकवणारे वारकरी गावी अस्प्रश्यता पाळतात.हल्लीचा विना आता पहिल्यासारखा बोलत नाही.किलोकिलोचे टाळ वाजवून वाजवून छटाकावर आले.आणि टाळ वाजवणार्याने मनगटे झिजून गेली.ओरडून ओरडून घसा बसला.पन विठ्ठल काही किर्तनात नाचेना.हा काही आमुचा धंदा नव्हे किंवा हे काही पोटासाठी नव्हे आसे म्हणणाऱ्या किर्तनकारांच्या पोटाला रुमाल बांधूनही त्या रुमालावर पोट लोंबायला लागले.*देती घेती ते नरका जाती* .आसे आसुनही किर्तनाची फिस तमाशापेक्षाही जास्त झाली.नामदेवा तुमचा वारकरी वारीकरी झाला.तुमचा वारकर्यांचा मेळा भरकटला...पुन्हा या. पुन्हा..एका नव्या रुपाने. नव्या पर्वाच्या सुरुवातीसाठी. नव्या क्रांतीसाठी.वैदिकांच्या व्यवस्थेला हादरा देण्यासाठी.संपुर्ण भारत नामामय करण्यासाठी..
#नामदेवे_रचिला_पाया_तुका_झालाशी_कळस...म्हणन्यासाठी..तुम्ही या....

संदर्भ : नितिन सावंत परभणी 
9970744142
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment