लिंगायत समन्वय समितीतर्फे परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने जोरदार महामोर्चा
लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठीची राज्य सरकारने केंद्र शासनास शिफारस करावी, राज्यात लिंगायत धर्मीयांना अल्पसंख्यांकाचा दर्जा लागू करावा या प्रमुख मागणीसाठी लिंगायत समन्वय समितीच्या हजारो कार्यकर्त्यांनी रविवारी(ता.24)परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला.
येथील शनिवार बाजारातून निघालेल्या मोर्चात हजारो समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .छत्रपती शिवाजी रोड,छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा चौक, नारायण चाळ,स्टेशन रोडद्वारे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सभा झाली.या सभेत विविध वक्त्यांनी सरकारच्या उदासिनतेवर जोरदार टिका केली.
गेल्या अनेक वर्षांपासून लिंगायत धर्माच्या या संवैधानिक मान्यतेसाठी लिंगायत बांधव देशाच्या विविध राज्यात आंदोलन करत आहे. महाराष्ट्रात विशेषता आजपर्यंत 10 मोर्चे काढण्यात आले आहेत, या प्रत्येक महामोर्चात लाखो लिंगायत बांधव सहभागी झाले तरी केंद्र व राज्य सरकारने लिंगायत धर्म यांच्या मागण्यांबाबत अद्यापही सकारात्मक विचार केलेला नाही, असा आरोप समन्वय समितीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी केला. लिंगायत हा संयमशील समाज म्हणून ओळखला जात असला तरी त्यांच्या संयमाचा सरकारने अंत बघु नये, या पुढील काळात एक कोटींच्या वर असलेला लिंगायत अधिक आक्रमकपणे आंदोलन करील व त्यास सर्वस्वी सरकारचे उदासीन धोरण जबाबदार असेल असा इशारा समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी मोर्च्याच्या विसर्जना प्रसंगी दिला.
लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठीची राज्य सरकारने केंद्र शासनास शिफारस करावी, राज्यात लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा लागू करावा, राज्यात लिंगायत धर्म यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, मंगळवेढा येथील प्रस्तावित महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे,लिंगायत आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर आप्पाजी यांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच परभणी शहरात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभा करावा अशीही मागणी करण्यात आली.
या मोर्चात बसव धर्म पीठाचे अध्यक्ष महिला जगद्गुरु प.पू डॉक्टर गंगा माताजी, लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अँड. अविनाश बोसीकर ,महास्वामीजी जगद्गुरु श्री चंन्नवसवानंद, लिंगायत समाज समन्वय समितीचे राज्य समन्वयक माधवराव पाटील टाकळीकर,महास्वामीजी जगद्गुरु श्री बसवकुमार महास्वामीजी, खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील,विजयकुमार हत्तूरे, प्राध्यापक राजेश विभुते किर्तिकुमार बुरांडे,गंगाप्रसाद आणेराव, प्राध्यापक किरण सोनटक्के,बबलू सातपुते,प्रभाकर पाटील वाघीकर,सुभाष आप्पा नित्रुडकर यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते. या मोर्चाने परभणी शहर अक्षरशः दणानून निघाले.



No comments:
Post a Comment