अनिल राजे कदम यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका संघटकपदी निवड
परळी / सोनपेठ (दर्शन) :-
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना श्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या आदेशाने व परळी नगरपरिषदेचे गटनेते मा.श्री वाल्मिक आण्णा कराड,जि प गटनेते श्री अजयजी मुंडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशउपध्यक्ष डॉ.संतोष मुंडे सर,यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी तालुकाध्यक्ष श्री लक्ष्मणतात्या पौळ ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री गोविंदभाऊ कराड संजय गांधी निराधार चे अध्यक्ष मा राजेभाऊ चाचा पौळ मा वैजनाथ दाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली अनिल राजे कदम यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या परळी वै तालुका संघटक पदी निवड झाली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जनसामान्यांना पर्यंत पोहचवून, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढवायला हातभार लावील.अनिल राजे कदम यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या परळी वै तालुका संघटक पदी निवड केल्या बद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचे व मित्र परिवाराचे मनपुर्वक आभार ही अनिल राजे कदम यांनी व्यक्त केले आहेत.या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment