Sunday, October 31, 2021

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला सर्वोतोपरी सहकार्य करणार उरुळी कांचन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष खा.अमोल कोल्हे यांचे आश्वासन

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला सर्वोतोपरी सहकार्य करणार
उरुळी कांचन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष खा.अमोल कोल्हे यांचे आश्वासन
धुळे / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

माझ्या मतदार संघात देशभरातून दोन ते अडीच हजार पत्रकार येणार आहेत, येणाऱ्या पत्रकारांचे स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळत आहे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असून अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सुप्रसिद्ध अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांनी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त  एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.

मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथे होणाऱ्या ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची परिषदेची विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी मान्य केली.. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे हे उरळी कांचन  अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असतील.. अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार असून उरूळी कांचन शिरूर मतदार संघातच येते.. अमोल कोल्हे यांनी राजा शिवछत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी अशा मालिकांमधून काम केलेले असून अमोल कोल्हे हे नाव महाराष्ट्रात सर्व परिचित झालेले आहे..

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या एका शिष्टमंडळाने आज पुण्यात खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली.. या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनील जगताप, सोशल मिडिया परिषदेचे पुणे जिल्हा प्रमुख जनार्दन दांडगे, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब काळभोर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पुणे जिल्हा निमंत्रक के. डी . गव्हाणे आदिंचा  समावेश होता.. परिषदेच्या ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती एस.एम.देशमुख यांनी खा. अमोल कोल्हे यांना केली.. तसे लेखी पत्र त्यांना देण्यात आले.. अमोल कोल्हे यांनी ही विनंती मान्य केली..

१८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे परिषदेचे अधिवेशन होत असून त्याच्या पूर्व तयारीची  बैठक आज कोंढवा येथे घेण्यात आली.. अधिवेशन ऐतिहासिक आणि हायटेक करण्याचा निर्धार यावेळी एस.एम.देशमुख यांनी बोलून दाखविला.. बैठकीस कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, समन्वयक सुनील जगताप, सोशल मिडिया परिषदेचे जनार्दन दांडगे, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब काळभोर यांच्यासह पन्नासवर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


Friday, October 29, 2021

आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी UIDAI ने निश्चित केलेले दर ; जादा फीस आकारणा-या आधार केंद्रचालकाची लेखी तक्रार करा

आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी UIDAI ने निश्चित केलेले दर  ; जादा फीस आकारणा-या आधार केंद्रचालकाची लेखी तक्रार करा

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्हयात सद्यस्थितीत 46 आधार नोंदणी केंद्र चालु आहेत.आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक करणे, आधार कार्डवरील नाव,जन्मतारीख दुरुस्ती करणे ई. कामे आधार केंद्रात केली जातात.. आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी UIDAI ने दर निश्चित केलेले आहेत. आधार केंद्रचालक यांनी आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी UIDAI ने निश्चित केलेले दर आधार केंद्राच्या दर्शनी भागात लावावेत. आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी UIDAI ने निश्चित केलेले दर खालीलप्रमाणे आहेत.
1. आधार नोंदणी हि निशुल्क (फ्री) आहे.
2.0 ते 05 वर्षानंतरीच्या अनिवार्य बायोमेट्रीक हि अपटेड निशुल्क (फ्री) आहे.
3. फिंगर प्रिंट, फोटो अद्यावतीकरण - 100 रु. शुल्क आहे.
4. पत्ता, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक, अद्यावतीकरण 50 रु.शुल्क आहे.
5. आधार कार्ड डाऊनलोड आणि कलर प्रिंट 30 रु. शुल्क आहे.
नागरीकांनी आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी जी फीस आकारली जाते सदर फीसची पावती संबंधित केंद्रचालक यांचेकडून हस्तगत करून घ्यावी.पावतीवर दर्शविलेली रक्कम आधार केंद्रचालक यांना अदा करावी.आधार केंद्रचालक यांनी फीसची पावती संबंधित नागरीकांना द्यावी.नागरीकांनी आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी UIDAI ने निश्चित केलेल्या वरील दराप्रमाणेच संबंधित आधार केंद्रचालक यांना फीस अदा करावी.वरील शुल्कापेक्षा जादा फीस आकारणा-या आधार केंद्रचालक यांची लेखी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयास करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.या प्रसिद्धी पत्रकावर डॉ. संजये कुंडेटकर,उपजिल्हाधिकारी सामान्य तथा नोडल अधिकारी परभणी यांची स्वाक्षरी आहे.

Monday, October 25, 2021

आज संत नामदेव महाराजांची आज जयंती.. ll संत नामदेव ll

आज संत नामदेव महाराजांची आज जयंती.. 

               ll  संत नामदेव ll 



           तुम्हीच बंडखोरी करुन उभे केले होते संतांचे आंदोलन.तुम्हीच होतात भागवत धर्माचे संस्थापक.तुम्हीच तर म्हणाला होतात "आम्हा सापडले वर्म l करु भागवत धर्म ll "
तुमचा विना भारतभर बोलला.तुमचा टाळ त्रैलोक्यात निनादला.तुमच्या किर्तनात तथागत विठ्ठल दंग झाला.तुमच्या किर्तनरुपी रात्रीच्या शाळेमुळे लोकप्रबोधनाची आरोळी सर्वत्र घुमली.प्रत्येक जातिजमातीचा शब्दशस्त्रे घेवून समाजात क्रांतीची बिजे पेरायला लागला.
तुम्हीच मध्ययुगीन भारताच्या क्रांतीचे पथदर्शक ठरलात.आरतीचे जनक तुम्हीच.डोइचा पदर खांद्यावर घेवून लोकलाज सोडून प्रबोधनासाठी भरबाजारात येण्याची भाषा करणारी जना तुमचीच शिष्या.मंगळवेढ्याच्या वेशीत हाडांच्या ढिगाऱ्यात तळमळणारा तुमचा सखा जिवलग चोखोबा.चोखोबा धन्य झाला पंढरपुरात विठठलचरणी केवळ तुमच्याच मुळे.
          पण आज रस्त्याने माऊली माऊली म्हनून जातिव्यवस्थेला सुरुंग लावनारे तुमचे वारकरी घरी,गावी अस्प्रश्यता पाळतात.चोखोबांच्या समाधीवर डोके टेकवणारे वारकरी गावी अस्प्रश्यता पाळतात.हल्लीचा विना आता पहिल्यासारखा बोलत नाही.किलोकिलोचे टाळ वाजवून वाजवून छटाकावर आले.आणि टाळ वाजवणार्याने मनगटे झिजून गेली.ओरडून ओरडून घसा बसला.पन विठ्ठल काही किर्तनात नाचेना.हा काही आमुचा धंदा नव्हे किंवा हे काही पोटासाठी नव्हे आसे म्हणणाऱ्या किर्तनकारांच्या पोटाला रुमाल बांधूनही त्या रुमालावर पोट लोंबायला लागले.*देती घेती ते नरका जाती* .आसे आसुनही किर्तनाची फिस तमाशापेक्षाही जास्त झाली.नामदेवा तुमचा वारकरी वारीकरी झाला.तुमचा वारकर्यांचा मेळा भरकटला...पुन्हा या. पुन्हा..एका नव्या रुपाने. नव्या पर्वाच्या सुरुवातीसाठी. नव्या क्रांतीसाठी.वैदिकांच्या व्यवस्थेला हादरा देण्यासाठी.संपुर्ण भारत नामामय करण्यासाठी..
#नामदेवे_रचिला_पाया_तुका_झालाशी_कळस...म्हणन्यासाठी..तुम्ही या....

संदर्भ : नितिन सावंत परभणी 
9970744142
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Sunday, October 24, 2021

लिंगायत समन्वय समितीतर्फे परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने जोरदार महामोर्चा

लिंगायत समन्वय समितीतर्फे परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने जोरदार महामोर्चा


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठीची राज्य सरकारने केंद्र शासनास शिफारस करावी, राज्यात लिंगायत धर्मीयांना अल्पसंख्यांकाचा दर्जा लागू करावा या प्रमुख मागणीसाठी लिंगायत समन्वय समितीच्या हजारो कार्यकर्त्यांनी रविवारी(ता.24)परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला.
येथील शनिवार बाजारातून निघालेल्या मोर्चात हजारो समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .छत्रपती शिवाजी रोड,छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा चौक, नारायण चाळ,स्टेशन रोडद्वारे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सभा झाली.या सभेत विविध वक्त्यांनी सरकारच्या उदासिनतेवर जोरदार टिका केली.
गेल्या अनेक वर्षांपासून लिंगायत धर्माच्या या  संवैधानिक मान्यतेसाठी लिंगायत बांधव देशाच्या विविध राज्यात आंदोलन करत आहे. महाराष्ट्रात विशेषता आजपर्यंत 10 मोर्चे काढण्यात आले आहेत, या प्रत्येक महामोर्चात लाखो लिंगायत बांधव सहभागी झाले तरी केंद्र व राज्य सरकारने लिंगायत धर्म यांच्या मागण्यांबाबत अद्यापही सकारात्मक विचार केलेला नाही, असा आरोप समन्वय समितीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी केला. लिंगायत हा संयमशील समाज म्हणून ओळखला जात असला तरी त्यांच्या संयमाचा सरकारने अंत बघु नये, या पुढील काळात एक कोटींच्या वर असलेला लिंगायत अधिक आक्रमकपणे आंदोलन करील व त्यास सर्वस्वी सरकारचे उदासीन धोरण जबाबदार असेल असा इशारा समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी मोर्च्याच्या विसर्जना प्रसंगी दिला.
लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठीची राज्य सरकारने केंद्र शासनास शिफारस करावी, राज्यात लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा लागू करावा, राज्यात लिंगायत धर्म यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, मंगळवेढा येथील प्रस्तावित महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे,लिंगायत आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर आप्पाजी यांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच परभणी शहरात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभा करावा अशीही मागणी करण्यात आली.
या मोर्चात बसव धर्म पीठाचे अध्यक्ष महिला जगद्गुरु प.पू डॉक्टर गंगा माताजी, लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अँड. अविनाश बोसीकर ,महास्वामीजी जगद्गुरु श्री चंन्नवसवानंद, लिंगायत समाज समन्वय समितीचे राज्य समन्वयक माधवराव पाटील टाकळीकर,महास्वामीजी जगद्गुरु श्री बसवकुमार महास्वामीजी, खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील,विजयकुमार हत्तूरे, प्राध्यापक राजेश विभुते किर्तिकुमार बुरांडे,गंगाप्रसाद आणेराव, प्राध्यापक किरण सोनटक्के,बबलू सातपुते,प्रभाकर पाटील वाघीकर,सुभाष आप्पा नित्रुडकर यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते. या मोर्चाने परभणी शहर अक्षरशः दणानून निघाले.

Thursday, October 21, 2021

परभणी शहर जिल्हाध्यक्षपदी प्रताप देशमुख यांची नियुक्ती

परभणी शहर जिल्हाध्यक्षपदी प्रताप देशमुख यांची नियुक्ती






परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे परभणी शहर जिल्हाध्यक्ष पदी प्रताप देशमुख यांची नियुक्ती करण्यात येत आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.परभणी शहर जिल्हाध्यक्ष पदी प्रताप देशमुख यांची नियुक्ती बद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

परभणी शहर जिल्हाध्यक्षपदी प्रताप देशमुख यांची नियुक्ती

परभणी शहर जिल्हाध्यक्षपदी प्रताप देशमुख यांची नियुक्ती




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे परभणी शहर जिल्हाध्यक्ष पदी प्रताप देशमुख यांची नियुक्ती करण्यात येत आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.परभणी शहर जिल्हाध्यक्ष पदी प्रताप देशमुख यांची नियुक्ती बद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

Sunday, October 17, 2021

अनिल राजे कदम यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका संघटकपदी निवड

अनिल राजे कदम यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका संघटकपदी निवड 



परळी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना श्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या आदेशाने व परळी नगरपरिषदेचे गटनेते मा.श्री वाल्मिक आण्णा कराड,जि प गटनेते श्री अजयजी मुंडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशउपध्यक्ष डॉ.संतोष मुंडे सर,यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी तालुकाध्यक्ष श्री लक्ष्मणतात्या पौळ ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री गोविंदभाऊ कराड संजय गांधी निराधार चे अध्यक्ष मा राजेभाऊ चाचा पौळ मा वैजनाथ दाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली अनिल राजे कदम यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या परळी वै तालुका संघटक पदी निवड झाली.
    आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जनसामान्यांना पर्यंत पोहचवून, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढवायला हातभार लावील.अनिल राजे कदम यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या परळी वै तालुका संघटक पदी निवड केल्या बद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचे व मित्र परिवाराचे मनपुर्वक आभार ही अनिल राजे कदम यांनी व्यक्त केले आहेत.या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

Sunday, October 3, 2021

दिपावली सणाच्यानिमित्ताने फटाके विक्रीसाठी लागणाऱ्या परवान्यासाठी अर्ज करावेत

दिपावली सणाच्यानिमित्ताने फटाके विक्रीसाठी लागणाऱ्या परवान्यासाठी अर्ज करावेत


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्हृयात दि.4 नोव्हेंबर 2021 रोजीपासून दिपावली सण साजरा करण्यात येणार आहे. दिपावली सणानिमित्त इच्छुक व्यक्तींना पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी फटाके विक्रीसाठी तात्पुरते फटाके परवाने देण्यासंबंधी विस्फोटक अधिनियम 2008 मधील विहीत नमुन्यातील अर्ज मंगळवार दि.5 ऑक्टोबर 2021 रोजीपर्यंत स्विकारले जाणार आहेत. तरी जिल्ह्यात फटाके दुकाने लावण्यास इच्छुकांनी आपले अर्ज मुदतीत सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.
            फटाक्याच्या परवान्यासाठी प्रत्येक फटाके विक्री दुकानातील अंतर हे कमीत कमी तीन मिटरचे असावे. दुकाने मोकळ्या जागी व्यवस्थित कोणत्याही प्रतिबंधित इमारतीपासून 50 मीटरपेक्षा कमी अंतरावर नसावीत. प्रत्येक फटाके विक्री दुकानातील स्टॉक मर्यादा जास्तीत जास्त 100 किलो राहील. पोलिस अधिक्षकांचे कायदा व सुव्यवस्था, अर्जदाराची वर्तणूक आणि दुकानाचे बाबतीत अर्जदाराने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले किंवा कसे याबाबत सर्वकष अहवाल. महाराष्ट्र नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 281 अन्वये संबंधित महानगरपालिका व नगरपालिका यांचा परवाना. संबंधित तहसिलदार यांचे फटाक्याच्या दुकानासाठी अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेले रहिवाशीबाबत पुराव्याची खातरजमा करुन अर्जदार नमुद पत्त्यावर राहतात किंवा कसे? याबाबत आणि अज्रदार यांच्याकडून कसल्याही प्रकारची शासकीय थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र तसेच दुकानाच्या जागेच्या नकाशाची प्रमाणित प्रत. व्यवसाय कर अधिकारी व्यवसाय कर कार्यालय परभणी यांचे नाहरकत प्रमाणपत्र. परवानाधारकास परवान्यात नमुद केलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक राहील. फटाके विक्रेत्याने साठवणुक धारकाने विक्री करताना या फटाक्याच्या आवाजाची तिव्रता 125 डेसीबल पेक्षा जास्त नसावी व त्या प्रकारचे फटाके साठवणूक व विक्री करण्यात येवू नये. अशा अटी व शर्ती आहेत. सर्व विभाग प्रमुखांनी अहवाल विहीत कालावधीमध्ये सादर करावेत. असेही कळविण्यात आले आहे.