सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात सोमवारी महीलांसाठी कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे सोमवारी (दि.१४ जुलै 2025) महिलांसाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्जन डॉ.बोले हे लाभले आहेत,कुटूंब नियोजन करण्यासाठी सोनपेठ तालुक्यातील महिलांच्या बिन टाका कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया आता सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात केल्या जात आहेत. यासाठी पंचक्रोशीतील इच्छुक महिलांनी गावातील आशा कार्यकर्ती अथवा ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे पुर्व नाव नोंदणी करावी. सोनपेठ तालुक्यातील गरजवंत महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विठ्ठल कराड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment