Monday, June 9, 2025

फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) ऑनलाईन निघत नाही तरी यादीत नाव समाविष्ट करुन अडचण दुर करावी

फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) ऑनलाईन निघत नाही तरी यादीत नाव समाविष्ट करुन अडचण दुर करावी 
सोनपेठ (दर्शन) :- 

फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) ऑनलाईन निघत नाही तरी यादीत नाव समाविष्ट करुन अडचण दुर करावी या विषयी मा.जिल्हाधिकारी यांना मा.तहसीलदार मार्फत विनंती निवेदन देण्यात येते की, आम्ही शेतकरी कायम झालेले अतिक्रमित गायरान धारक शेतकरी शिवार सोनखेड येथील असून गट नं. २८, २९ व २०१ असून आम्हाला मागील सन १९८० च्या अगोदर पासून शासनाने कायम केले आहे. सातबारा व होल्डिंग तसेच फेरफार सर्व आमच्याकडे आहेत परंतु आमचे नावे शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी, आमचे नाव यादीमध्ये नसल्यामुळे आमचे शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) निघत नाहीत. सन २०२१ पासून अगोदरच पोटखराबी न उठवल्यामुळे सर्व शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिले आहेत परंतु आज फार्मर आयडीच्या अडचणीमुळे पी एम किसान सन्मान निधी योजना पण बंद पड़ते की काय ? अशी सर्वांना भीती वाटत आहे. तरी मा.साहेबांना आम्हा सर्वांची विनंती आहे की, आपण स्वतः आमच्या अर्जाकडे लक्ष घालून काय अडचण आहे ? ती पाहून आम्हाला भविष्यात येणारा खरीप पिक विमा भरण्यास मदत व्हावी व फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) आमच्या नावे मिळेल अशी व्यवस्था करावी हीच आम्हा सर्वांची कळकळीची विनंती केली आहे,निवेदनावर बालासाहेब सोनवणे, किसन मुंढे, बळीराम आगळे, दत्ता मुंढे, दीपक वडकर, साहेबराव आगळे, तुकाराम आगळे, ग्यानोबा भोकरे, सुंदराबाई बोकरे, भिकाजी बोकरे, नारायण आगळे, गोदाबाई आदमाने, दादाराव बोकरे, वामन बोकरे, आबाजी बोकरे, बळीराम आगळे, सूर्यभान रणदिवे व आशिष भैय्या मुंढे आदिच्या स्वाक्षरी आहेत.
__________________________________________
सा

No comments:

Post a Comment