हाफेज अली शेर कुरेशी यांची एम.आय.एम.च्या सोनपेठ शहर समन्वयकपदी नियुक्ती
सोनपेठ (दर्शन) : - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी राज्यभरात नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हाफेज अली शेर कुरेशी यांची सोनपेठ शहर समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार आणि परभणी जिल्हा पर्यवेक्षक वसीम अहमद यांच्या सहनिमित्ताने करण्यात आली. याप्रसंगी परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस झैन यांच्या हस्ते हाफेज अली शेर कुरेशी यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
ही नियुक्ती दिनांक २७ जून २०२५ रोजी करण्यात आली असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि स्थानिक पातळीवरील कार्यवाहीला अधिक गतिमान करण्यासाठी हाफेज अली शेर कुरेशी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.
हाफेज अली शेर कुरेशी हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, विविध स्तरावर त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग पक्षाच्या संघटना विस्तारासाठी होणार असल्याचा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात सोनपेठमध्ये एमआयएम पक्ष अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास पक्ष नेत्यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment