लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
सोनपेठ (दर्शन) :- लोकनेते विलासराव देशमुख अर्बन निधी लिमिटेड सोनपेठ यांच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त दि.26 में 2025 सोमवार रोजी सोनपेठ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम हा लोकनेते विलासराव देशमुख अर्बन निधी लिमिटेड सोनपेठ यांच्या वतीने राबविण्यात आला, या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मिकांत देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर कदम, प्रमुख उपस्थितीत प्रा.मुंजाभाऊ धोंडगे, सरपंच विलास कोकाटे, बॅंकेचे अध्यक्ष जगन्नाथ कोलते पाटील, पत्रकार बांधव, कालिदास मस्के, मुंडे सर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव भोसले यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment