सोनपेठ (दर्शन) :- अन्नदान ही एक महत्त्वाचे आणि श्रेष्ठ दान मानले जाते, हे केवळ गरजूंना मदत करणे नाही तर सामाजिक, अध्यात्मिक आणि नैतिक दृष्ट्या ही याचे अनेक फायदे आहेत, अन्नदान केल्याने उपासमारी कमी होते तसेच समुदायातील गरीब आणि गरजवंतांना मदत होते, गरजवंतांना अन्न पुरवल्यास त्याची भूक कमी होते, अन्नदानामुळे समाजात एकजूटता वाढते अन्नदान हे पुण्य कर्म असून त्यामुळे जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होते, अन्नामुळे प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी पोषण मिळते, अन्नदान करणे हे केवळ एक दाण नाही तर एक सामाजिक आणि अध्यात्मिक कर्तव्य आहे, अन्नदान केल्यास आपण समाजाला एका प्रकारची मदत करू शकतो व आपल्या जीवनातही आनंद व समाधान अनुभव शकतो, अशीच एक संधी आपणास श्री गुरु नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे आठवे वीर माहेश्वर बालसंस्कार शिबिरांर्थी जंगम बट्टू 55 हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उन्हाळी सुट्टीत लाभ घेत आहेत, यांच्यासाठी आपण एक वेळ नाश्ता किंवा जेवण रुपात अन्नदान केल्यास आत्मिक आनंद मिळेल, आपण आपल्या वडीलधारी मंडळीच्या किंवा मुला बाळांच्या नावाने अन्नदान करू शकतो तरी श्री गुरु नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे इच्छुक अन्नदात्यांनी मो.76 66 64 10 88 संपर्क साधून आलेल्या संधीचे सोने करा असे आवाहन राष्ट्रीय जंगम समाज संघटना सोनपेठ तालुका शाखा समन्वयक नागनाथ स्वामी यांनी केले आहे, दिनांक 1 जुन 2025 रविवार रोजी या वीर माहेश्वर बालसंस्कार शिबिराचा समारोप आहे, कमीत कमी दिवस शिल्लक आहेत तरी आजच आपली तारीख राखून ठेवा अशी विनंती शेवटी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment