आमदार राजेश दादा विटेकर
सोनपेठ (दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांचेकडून) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळत आमदार राजेश विटेकर यांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला तरूण आमदार दिला आहे, सोनपेठ तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, सोनपेठ नगरीच्या भूमिपुत्राचा सात्कार सोहळा उद्या शुक्रवारी होत आहे. या सोहळ्यास सोनपेठ तालुक्यातील नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दशरथ पाटील सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,सोनपेठ.यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार राजेश दादा विटेकर यांचा सोनपेठ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संस्कृतीक सभागृहात उद्या शुक्रवार १९ जुलै २०२४ रोजी भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यास नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दशरथ पाटील सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,सोनपेठ.यांनी केले आहे.परभणी जिल्ह्यातील युवा नेतृत्व नवनिर्वाचित आमदार राजेश दादा विटेकर यांचे शुक्रवारी सोनपेठ शहरात आगमन होत आहे.त्यांच्या स्वागत सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे, आमदार राजेश दादा विटेकर यांचे सकाळी ११. तालुका माजलगाठ जिल्हा बिड येथे छत्रपती संभाजीनगर येथून आगमन होणार आहे.पुढे ते ढालेगाव, पाथरी, मानवत मार्गे पोखर्णी नृसिंह दर्शन घेऊन ते शिर्शी मार्ग दुपारी ४.०० वा. सोनपेठ येथे आगमन होईल. शहरातील कृषी उत्पन बाजार समितीच्या मोंढा येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. नंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक सभागृहात नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सरपंच, सर्व उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, आजी माजी पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दशरथ पाटील सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,सोनपेठ.यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment