शासकीय कापूस खरेदीसाठी ई पिक पाहणी करणे बंधनकारक शेतकऱ्यांना आवाहन - दशरथ पाटील सूर्यवंशी
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना 2024-25 हंगामात सीसीआय अथवा शासकीय खरेदी केंद्रात कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी सातबारावर कापसाची नोंद करणे आवश्यक आहे त्यासाठी खरीप हंगामातील पिकाची ई पीक पाहणी नोंदणी करावी अन्यथा कापूस विक्रीसाठी अडचणीचे ठरू शकते असे आवाहन सभापती दशरथ पाटील सूर्यवंशी कृषी उत्पन्न बाजार समिती सोनपेठ एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे, जनधन खाते आदी बँकांमध्ये ऑनलाईन पैसे जमा करण्यासाठी सीमा असल्याने शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक आधार कार्ड बँकेत लिंक करण्याची खातर जमा करून घ्यावी, सोनपेठ तालुक्यातील कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सीसीआय अथवा शासकीय खरेदी केंद्रात कापूस विक्री करण्यासाठी ई पीक पाहणी या मोबाईल ॲप द्वारे कापूस पिकाची नोंदणी करणे बंधनकारक आहे, त्यानुसार खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस अधिक पिकांची ही ई पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दशरथ पाटील सुर्यवंशी, उपसभापती उत्तमराव जाधव यांच्यासह सर्व संचालक मंडळ व सचिव अशोक गवळी आदींनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देणे आवश्यक आहे.

No comments:
Post a Comment